‘ज्यादिवशी आम्ही रस्त्यावर उतरु, त्या दिवशी तुमचा…’ मौलाना तौकीर रजाच चिथावणीखोर वक्तव्य

इस्लामिक धर्मगुरु तौकीर रजा खान यांनी पुन्हा एकदा चिथावणीखोर वक्तव्य केलं आहे. "तम्ही दिल्लीला या, माझी विनंती आहे. आपली संपत्ती ताब्यात घेण्याची कोणाच्या बापामध्ये ताकद नाही" असं तौकीर रजा म्हणाले.

'ज्यादिवशी आम्ही रस्त्यावर उतरु, त्या दिवशी तुमचा...' मौलाना तौकीर रजाच चिथावणीखोर वक्तव्य
tauqeer raza provocative statementImage Credit source: PTI
Follow us
| Updated on: Nov 11, 2024 | 3:31 PM

इस्लामिक धर्मगुरु तौकीर रजा खान यांनी मुस्लिमांना रविवारी एकजूट होऊन दिल्लीला घेराव घालण्याच आवाहन केलं आहे. तौकीर रजा खान आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत असतात. “आपली मागणी मान्य करुन घ्यायती असेल, तर सर्व मुस्लिमांनी एकजूट होऊन दिल्लीला घेराव घातला पाहिजे” असं मुस्लिम धर्मगुरु आणि इत्तेहाद-ए-मिल्लत परिषदेचे प्रमुख तौकीर रजा यांनी म्हटलं आहे. तौकीर रजा जयपूरमध्ये एक वक्तव्य केलय. तौकीर रजा यांनी यावेळी पुन्हा एकदा चिथावणीखोर वक्तव्य केलं. ‘

“कोणाच्या बापाची औकात नाही की आमची संपत्ती जप्त करेल. आमची संख्या का लपवता? ज्यादिवशी आम्ही रस्त्यावर उतरु, त्या दिवशी तुमचा आत्मा कापेल. आमते तरुण घाबरट नाहीत. आम्ही आमच्या तरुणांना नियंत्रणात ठेवलं आहे. ज्या दिवशी ते तुमच्या नियंत्रणाबाहेर जातील, त्यांना रोखणं तुमच्या अवाक्यातली गोष्ट नसेल” असं तौकीर रजा यांनी म्हटलं आहे.

‘आपली संपत्ती ताब्यात घेण्याची कोणाच्या बापामध्ये ताकद नाही’

“संसदेच सत्र सुरु होतय. जर, तुम्हाला तुमची ताकद दाखवायची असेल, तुम्हाला तुमच्या मनासारख्या गोष्टी करुन हव्या असतील तर तुम्हाला दिल्लीला यावं लागेल” असं तौकीर रजा म्हणाले. ते उत्तर प्रदेशातील धर्मगुरु आहेत. “तुम्ही दिल्लीत येऊन तुम्हाला जे हवं ते मिळवण्याचा प्रयत्न केला, तर तसं घडेल. पण जर तुम्ही देखावा करत बसाल, तर काही होणार नाही. सरकार बेईमान आहे. कुरान आणि अल्लाहच अपमान करणार सरकार सत्तेवर आहे. जर, तुम्हाला त्रास होत असेल, तुम्ही प्रामाणिक असाल तर तुम्ही दिल्लीला या, माझी विनंती आहे. आपली संपत्ती ताब्यात घेण्याची कोणाच्या बापामध्ये ताकद नाही” असं तौकीर रजा म्हणाले.

‘तुमचा आत्मा कापेल’

“आम्ही आधी तिरंगा घेऊन येणार. जर ते ऐकले नाहीत तर प्रशासनाकडे जाणार. त्यानंतर जे होईल, ते ठरवण तुमची जबाबदारी असेल. आमची संख्या का लपवता? ज्या दिवशी रस्त्यावर उतरु तुमचा आत्मा कापेल” असं तौकीर रजा म्हणाले.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.