Telangana Election Exit Poll Result | तेलंगणात काँग्रेस आणि BRS मध्ये काँटे की टक्कर, भाजपच्या पदरी निराशा

Telangana Election Exit Poll Result 2023 | तेलंगणा विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने प्रचंड ताकद लावली. तर सत्ताधारी बीआरएस पक्षाकडूनही जोरदार शक्तीप्रदर्शन करण्यात आलं. तेलंगणा विधानसभा निवडणुकीचा निकाल येत्या 3 डिसेंबरला लागणार आहे. पण त्याआधी एक्झिट पोलच्या आकडेवारीनुसार, काँग्रेस आणि बीआरएस पक्षात या निवडणुकीत काँटे की टक्कर बघायला मिळत आहे. त्यामुळे कोण जिंकणार हे 3 डिसेंबरलाच स्पष्ट होणार आहे.

Telangana Election Exit Poll Result | तेलंगणात काँग्रेस आणि BRS मध्ये काँटे की टक्कर, भाजपच्या पदरी निराशा
Follow us
| Updated on: Nov 30, 2023 | 7:35 PM

हैदराबाद | 30 नोव्हेंबर 2023 : तेलंगणा विधानसभेच्या 119 जागांसाठी आज मतदान पार पडलं. राज्यातील सर्व जागांसाठी एकाच टप्प्यात मतदान पार पडलं. तेलंगणा विधानसभेच्या 119 जागांसाठी 2290 उमेदवारांनी आपलं नशीब आजमलं आहे. तेलंगणा राज्याची निर्मिती 2014 साली झाली. तेव्हापासून दोनवेळा झालेल्या निवडणुकीत भारतीय राष्ट्र समिती अर्थात बीआरएस पक्षाला यश मिळालं आहे. बीआरएसचे प्रमुख के. चंद्रशेखर राव तेलंगणाचे पहिले आणि दुसरे मुख्यमंत्री बनले आहेत. त्यानंतर आता के. चंद्रशेखर राव (केसीआर) पुन्हा तिसऱ्यांदा मुख्यमंत्रीपदाचा मान मिळवतात का? हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. तेलंगणा विधानसभेच्या 119 जागांसाठी आज संध्याकाळपर्यंत मतदान पार पडलं. त्यानंतर येत्या 3 डिसेंबरला मतदानाचा निकाल जाहीर होणार आहे. पण त्याआधीच विविध सस्थांनी केलेल्या सर्वेक्षणानुसार एक्झिट पोलची आकडेवारी समोर आली आहे. या आकडेवारीनुसार काँग्रेस आणि बीआरएस पक्षामध्ये काँटे की टक्कर बघायला मिळत आहे. तर भाजप हा पक्ष तीन नंबरला असण्याची शक्यता आहे.

एक्झिट पोलच्या आकडेवारीनुसार तेलंगणात काँग्रेस आणि बीआरएसमध्ये काट्याची टक्के बघायला मिळणार आहे. तर काँग्रेस हा तीन नंबरचा पक्ष ठरणार आहे. पॉलस्ट्रेटच्या पोलनुसार, बीआरएस पक्षाला 48 ते 58 जागांवर यश मिळण्याची शक्यता आहे. तर काँग्रेसला 49 ते 59 जागांवर यश मिळण्याची शक्यता आहे. तर भाजपला 5 ते 10 जागांवर यश मिळण्याची शक्यता आहे. तसेच एमआयएम पक्षाला 6 ते 8 जागांवर यश मिळण्याची शक्यता आहे.

काँग्रेस बाजी मारणार?

सीएनएक्सच्या आकडेवारीनुसार, तेलंगणात काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरण्याची शक्यता आहे. काँग्रेसला 54 जागांवर यश मिळण्याची शक्यता आहे. बीआरएस पक्षाला 52 जागांवर यश मिळणार आहे. भाजपला या निवडणुकीत 7 जागांवर यश मिळण्याची चिन्हं आहेत. तर एमआयएम पक्षाला 6 जागांवर यश मिळण्याची शक्यता आहे.

बीआरएसच्या सत्तेला सुरुंग लागणार?

तेलंगणा राज्यात बीआरएस पक्षाची ताकद चांगली आहे. बीआरएस हा तिथला स्थानिक पक्ष आहे. पण बीआरएस पक्षाला शह देण्यासाठी आणि बीआरएसच्या सत्तेला सुरुंग लावण्यासाठी काँग्रेसने प्रचंड प्रयत्न केले. काँग्रेसचे नेते राहुल गांधी, सोनिया गांधी यांनी या निवडणुकीकडे विशेष लक्ष दिलं होतं. तसेच कर्नाटकचं अर्ध्यापेक्षा जास्त मंत्रिमंडळ तेलंगणात प्रचारासाठी अनेक दिवस मुक्कामी होतं. काँग्रेसने या निवडणुकीत तेलंगणाच्या नागरिकांची मनधरणी करण्याचे प्रचंड प्रयत्न केले. त्यामुळे या निवडणुकीत बीआरएस पक्षाला काँग्रेसचं या निवडणुकीत कडवं आव्हान असेल हे तेव्हाच स्पष्ट झालं होतं. येत्या 3 डिसेंबरला निवडणुकीचा निकाल स्पष्ट होणार आहे. सध्या तरी एक्झिट पोलच्या समोर आलेल्या आकडेवारीनुसार बीआरएस आणि काँग्रेसमध्ये काँटे की टक्कर दिसत आहे. त्यामुळे 3 तारखेला चित्र स्पष्ट होणार आहे.

तेलंगणा विधानसभा निवडणूक निकाल 2023 : एक्झिट पोलचे अंदाज काय?

1) पॉलस्ट्रेटची आकडेवारी काय सांगते?

BRS – 48 ते 58 जागा काँग्रेस – 49 ते 59 जागा भाजप – 5 ते 10 जागा एमआयएम – 6 ते 8 जागा

2)  CNX ची आकडेवारी काय सांगते?

BRS – 52 जागा काँग्रेस – 54 जागा भाजप – 7 जागा AIMIM –  6 जागा

Non Stop LIVE Update
बटेंगे तो कटेंगेच्या वक्तव्यावरून पंकजा मुंडेंचा यू-टर्न? म्हणाल्या...
बटेंगे तो कटेंगेच्या वक्तव्यावरून पंकजा मुंडेंचा यू-टर्न? म्हणाल्या....
'पंकजाताईंनी मोठ मन केल म्हणून मी...', सभेतून धनंजय मुंडे काय म्हणाले?
'पंकजाताईंनी मोठ मन केल म्हणून मी...', सभेतून धनंजय मुंडे काय म्हणाले?.
चित्रपटात काम केलं असत.., सदा सरवणकरांच्या मुलीचा अमित ठाकरेंना टोला
चित्रपटात काम केलं असत.., सदा सरवणकरांच्या मुलीचा अमित ठाकरेंना टोला.
'रामदास कदम सरपटणारा साप, निवडणुकीनंतर...',ठाकरे गटाच्या नेत्याची टीका
'रामदास कदम सरपटणारा साप, निवडणुकीनंतर...',ठाकरे गटाच्या नेत्याची टीका.
'राणे पिता-पुत्र हे गाडग्यासारखे..', ठाकरे गटाच्या बड्या नेत्याची टीका
'राणे पिता-पुत्र हे गाडग्यासारखे..', ठाकरे गटाच्या बड्या नेत्याची टीका.
भाजपच्या किती जागा येणार?,कोण होणार CM?; विनोद तावडेंनी थेट सांगितलं..
भाजपच्या किती जागा येणार?,कोण होणार CM?; विनोद तावडेंनी थेट सांगितलं...
डोंबिवलीत भाजपचं कार्यालय फोडल, कोणी केल्ला हल्ला? घटना CCTV मध्ये कैद
डोंबिवलीत भाजपचं कार्यालय फोडल, कोणी केल्ला हल्ला? घटना CCTV मध्ये कैद.
एकनाथ शिंदेंच्या आमदारानं पैसे वाटले? विधानसभेच्या तोंडावर अडचणी वाढल्
एकनाथ शिंदेंच्या आमदारानं पैसे वाटले? विधानसभेच्या तोंडावर अडचणी वाढल्.
पंकजा मुंडेंकडून भाऊ धनंजय मुंडेंना खास गिफ्ट, सभेतून काय केली घोषणा?
पंकजा मुंडेंकडून भाऊ धनंजय मुंडेंना खास गिफ्ट, सभेतून काय केली घोषणा?.
पवार कुटुंबातील कटुता भविष्यात दूर होणार? अजित पवारांचं मोठं वक्तव्य
पवार कुटुंबातील कटुता भविष्यात दूर होणार? अजित पवारांचं मोठं वक्तव्य.