MLA Disqualification Rules | पक्षांतर बंदीचे दहावे परिशिष्ट काय, आयाराम गयाराम का म्हटले जाते…

ten schedules in indian constitution (MLA Disqualification Rules) | राज्याचे लक्ष विधासभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या निकालाकडे लागले आहे. शिवसेना आमदार अपात्र प्रकरणाचा निकाल ते देणार आहे. या निकालात दहाव्या परिशिष्टाची व्याख्या कशी होणार ? याकडे कायदेतज्ज्ञांचे लक्ष आहे.

MLA Disqualification Rules | पक्षांतर बंदीचे दहावे परिशिष्ट काय, आयाराम गयाराम का म्हटले जाते...
Follow us
| Updated on: Jan 10, 2024 | 4:23 PM

मुंबई, दि. 10 जानेवारी 2024 | शिवसेना आमदारांसाठी बुधवारचा दिवस महत्वाचा आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर आमदार अपात्र प्रकरणाचा निकाल देणार आहे. घटनेच्या दहाव्या परिशिष्टानुसार हा निकाल होणार आहे. यामुळे घटनेच्या दहाव्या परिशिष्टाची चर्चा सध्या जोरात सुरु आहे. भारतीय घटनेत दहाव्या सूचित पक्षांतर बंदी कायद्याचा उल्लेख आहे. हे दहावे परिशिष्ट 1985 मध्ये 52 व्या घटनादुरुस्तीनुसार करण्यात आले. त्यामध्ये पक्ष बदल करणाऱ्या सदस्यांना अपात्र ठरविणे आणि पक्षांतर बंदी काय आहे, याचा उल्लेख आहे. राजकीय लाभ किंवा पदासाठी पक्षांतर करणाऱ्या लोकप्रतिनिधीला अपात्र करण्याचा अधिकार आहे. आमदारांना अपात्र ठरवण्याचा अधिकार अध्यक्षांना दिला आहे. परंतु अध्यक्षांच्या निर्णयास सर्वोच्च न्यायालयात दाद मागण्याची तरतूद आहे.

दहाव्या परिशिष्टात या नियमांचा अपवाद

पक्षांतर बंदी कायद्याच्या दहाव्या परिशिष्टामध्ये काही अपवाद दिले आहे. त्यानुसार दोन तृतीयांश आमदार किंवा खासदार दुसऱ्या पक्षात गेले तर त्यांचे सदस्यत्व रद्द होत नाही. परंतु शिवसेनेच्या प्रकरणात एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेलेले ४० आमदार एकत्र गेले नाही. त्यामुळे विधानसभा अध्यक्ष याचा कसा अर्थ लावणार ? हे निकालात स्पष्ट होईल.

हे सुद्धा वाचा

दहाव्या परिशिष्टानुसार कधी ठरतो अपात्र

  • दहाव्या परिशिष्टानुसार कोणत्या सदस्याने पक्षाच्या व्हिपचे पालन केले नाही
  • कोणताही सदस्याने पक्षाच्या व्हिपनंतर मतदान केले नाही
  • एखाद्या सदस्याने स्वेच्छेने आपल्या राजकीय पक्षाचे सदस्यत्व सोडले तर
  • निवडून आल्यानंतर अपक्ष उमेदवार दुसऱ्या राजकीय पक्षात सहभागी झाल्यास
  • सभागृहाचा सदस्य बनल्यानंतर सहा महिन्यात एखादा नामनिर्देशित सदस्य एखाद्या पक्षात सामील झाल्यास अपात्र ठरु शकतो.

आयाराम गयाराम का म्हटले जाते

पक्षांतर बंदी कायद्याबाबत आया राम गया राम हा एक वाक्प्रचार तयार झाला. हा कसा तयार झाला याची सत्यघटना आहे. भारतीय राजकारणात परिणाम करणारी ही घटना ठरली. 1967 मध्ये हरियाणाचे आमदार गयालाल यांनी एकाच दिवसात तीनदा पक्ष बदलला. त्यानंतर पक्षांतरबंदी कायद्याची मागणी झाली. त्यांच्या नावावरुन आया राम गया राम झाला.

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.