Ashok Chavan | ‘अशोक चव्हाणांच्या शहीद भूखंड घोटाळ्यावर मोदीच बोललेले, आता…’, ठाकरे गटाचा थेट सवाल

Ashok Chavan | "त्यांनी काँग्रेसच शुद्धीकरण चालवलय. काँग्रेसमध्ये ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप आहेत, त्यांना सोबत घेऊन महात्मा गांधींच्या शुद्धीकरणाच स्वप्न भाजपा साकार करतोय" "काँग्रेसशी थेट युती टाळून भाजपा अशा प्रकारे युती करतोय. भाजपा देशाच राजकारण नासवतोय"

Ashok Chavan | 'अशोक चव्हाणांच्या शहीद भूखंड घोटाळ्यावर मोदीच बोललेले, आता...', ठाकरे गटाचा थेट सवाल
PM Narendra Modi
Follow us
| Updated on: Feb 13, 2024 | 10:38 AM

संभाजीनगर : महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण भाजपामध्ये प्रवेश करतील अशी चर्चा आहे. त्यांनी आमदारकीचा आणि काँग्रेस सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. अशोक चव्हाण यांची काँग्रेसला सोडचिठ्ठी हा महाविकास आघाडीसाठी मोठा धक्का आहे. आता यावरुन ठाकरे गटाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी भाजपा, नरेंद्र मोदींवर हल्लाबोल केला आहे. “आम्हाला फार मोठा पेच आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आता देशाला काय तोंड दाखवतील? नांदेडमध्ये जाऊन कारगिल युद्धातील शहीदांच्या भूखंडावर अशोक चव्हाण यांनी कसा घोटाळा केला? शहीदांचा कसा अपमान केला? हे मोदी यांनी स्वत: येऊन सांगितलं. भाजपाने शहीदांच्या अपमानाविरुद्ध आंदोलन सुरु केलं. आज काय झालं? अशोक चव्हाणांना घेऊन त्याच शहीदांचा अपमान धुवून काढला का?” असा सवाल संजय राऊत यांनी विचारला.

“सगळ्या भ्रष्टाचाऱ्यांना आपल्या पक्षात घेऊन भाजपा जगातल्या राजकारणात नवीन आदर्श निर्माण करतोय. काँग्रेसमुक्त भारत ही घोषणा त्यांनी बदलायला पाहिजे. त्यांनी काँग्रेसच शुद्धीकरण चालवलय. काँग्रेसमध्ये ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप आहेत, त्यांना सोबत घेऊन महात्मा गांधींच्या शुद्धीकरणाच स्वप्न भाजपा साकार करतोय” अशी टीका संजय राऊत यांनी केली. “काँग्रेसशी थेट युती टाळून भाजपा अशा प्रकारे युती करतोय. भाजपा देशाच राजकारण नासवतोय” “भाजपाला वाटत असेल अशा प्रकाराने त्यांना 400 पार उडी मारता येईल. अशाने भाजपा 200 पार सुद्धा जणार नाही” असा दावा संजय राऊत यांनी केला.

‘कुठे नेऊन ठेवलाय भाजपा माझा’

“देवेंद्र फडणवीस यांनी सिंचन, आदर्श घोटाळा कसा झाला हे सांगितलय. फडणवीस, चंद्रशेखर बावकुळे यांनी मोठ्या पड्द्यावर या क्लिप ऐकाव्यात. मोदी काय बोलले ते ही ऐकावं. महाराष्ट्राला खड्डयात घातलच, पण कुठे नेऊन ठेवलाय भाजपा माझा” अशी घणाघाती टीका संजय राऊत यांनी केली. “कारगिल युद्धातील शहीदांच्या भूखंडावर अशोक चव्हाण यांच्या प्रेरणेने 32 माळ्याचा घोटाळा उभा राहिला. मोदींना देशात तोंड लपवून फिरावं लागेल, ज्यांच्यावर घोटाळ्याचे आरोप केले, त्यांनाच मोदींनी पवित्र करुन घेतलय, हे राज्याच, देशाच दुर्देव आहे” असं संजय राऊत म्हणाले.

शिंदे गटाचा अजितदादांना सरकारमधून बाहेर काढण्याचा प्लान, कोणाचा आरोप
शिंदे गटाचा अजितदादांना सरकारमधून बाहेर काढण्याचा प्लान, कोणाचा आरोप.
जरांगेंविरोधात सगळा समाज उभा करायला वेळ लागणार, कोणी दिली उघड धमकी
जरांगेंविरोधात सगळा समाज उभा करायला वेळ लागणार, कोणी दिली उघड धमकी.
'सुरतलुटी वेळी शिवरायांनी पत्र लिहीले...,' काय म्हणाले जयंत पाटील
'सुरतलुटी वेळी शिवरायांनी पत्र लिहीले...,' काय म्हणाले जयंत पाटील.
रंगारी बदक चाळीच्या बाप्पाचं लंबोदर रुप पाहण्यासाठी भक्तांची रिघ
रंगारी बदक चाळीच्या बाप्पाचं लंबोदर रुप पाहण्यासाठी भक्तांची रिघ.
गडकरी यांच्या घरी कच्च्याबच्च्यांनी गणपती आणलाय...
गडकरी यांच्या घरी कच्च्याबच्च्यांनी गणपती आणलाय....
कास पठाराचा हंगाम सुरु, मोठ्यांसाठी आणि शाळकरी मुलांसाठी किती शुल्क ?
कास पठाराचा हंगाम सुरु, मोठ्यांसाठी आणि शाळकरी मुलांसाठी किती शुल्क ?.
मी फुंकलो असतो तरी राजे पडले असते, असं जरांगे म्हणाले, राऊत यांचा दावा
मी फुंकलो असतो तरी राजे पडले असते, असं जरांगे म्हणाले, राऊत यांचा दावा.
महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे नकोत, अमृता फडणवीस यांचे साकडे
महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे नकोत, अमृता फडणवीस यांचे साकडे.
गणरायाच्या आगमनाने सुखसमृद्धी येवो, एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे
गणरायाच्या आगमनाने सुखसमृद्धी येवो, एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे.
घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी, नैवेद्यासाठी 21 भाज्या खरेदीची घाई
घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी, नैवेद्यासाठी 21 भाज्या खरेदीची घाई.