Maharashtra Police : राज्याच्या पोलीस खात्यावर ठाकरे गटाच्या खासदाराचा अत्यंत गंभीर आरोप

Maharashtra Police : "शरद पवारांना केंद्र सरकारने झेड प्लस सुरक्षा दिली, वास्तविक त्याची गरज नव्हती. महाराष्ट्राच्या पोलिसांवर गृहमंत्र्यांचा विश्वास नाही हे त्यातून दिसून येतं. शरद पवारांना केंद्रीय सुरक्षा द्यावी लागते, 5०-60 पोलीस त्यांच्यासोबत राहणार"

Maharashtra Police : राज्याच्या पोलीस खात्यावर ठाकरे गटाच्या खासदाराचा अत्यंत गंभीर आरोप
police
Follow us
| Updated on: Aug 23, 2024 | 10:51 AM

“बदलापूरची जी दुर्घटना घडली, दोन लहान मुलींवर अत्याचार झाले. त्या संदर्भात 12 दिवस ती महिला फिरत होती. पोलीस गुन्हा नोंदवायला तयार नव्हते. कारण ती शाळा सत्ताधाऱ्यांच्या संदर्भातील माणसाची होती. संस्थेचे प्रमुख असतात, पदाधिकारी असतात, त्यांचा हात असतो असं मी म्हणणार नाही. पण गुन्हा घडल्यावर गुन्ह्याची नोंद करुन घेणं हे पोलिसांच काम आहे. आमची संस्था बदनाम होईल म्हणून गुन्हा नोंदवण्यापासून रोखत असाल, पोलीस त्यात मदत करत असतील, पोलिसांवर दबाव असेल तर तो अत्यंत गंभीर गुन्हा आहे” असं संजय राऊत म्हणाले. “गुन्ह्याच्या प्रक्रियेसाठी पोलीसही जबाबदार आहेत. ठाणे, कल्याण, डोंबिवली, पालघर इथले पोलीस हे पोलीस नसून मिंधे गँगचे सदस्य आहेत. आयुक्तांपासून सगळ्यांनीच कायद्याच्या रक्षणाची शपथ घेतलेली असते. इथले पोलीस खाकी वर्दीतले निर्जीव लोक आहेत” अशी टीका संजय राऊत यांनी केली.

“त्यांच्या अंगावर खाकी वर्दी आहे म्हणून ठाण्यातल्या पोलिसांना आपण पोलीस म्हणतो. पालघर, ठाणे इथे पोलीस प्रशासन अस्तित्वात नाही. मुख्यमंत्री आणि त्यांचे मोजके लोक सांगतिल तो कायदा असं चालू आहे. राज्याच्या अनेक जिल्ह्यात पोलिसांना घरगड्या सारखं वागवलं जातं. अशी परिस्थिती येते, तेव्हा अराजकता निर्माण होते” असा आरोप संजय राऊत यांनी केला.

शरद पवारांना झेड प्लस सुरक्षेची गरज नव्हती

“शरद पवारांना केंद्र सरकारने झेड प्लस सुरक्षा दिली, वास्तविक त्याची गरज नव्हती. महाराष्ट्राच्या पोलिसांवर गृहमंत्र्यांचा विश्वास नाही हे त्यातून दिसून येतं. शरद पवारांना केंद्रीय सुरक्षा द्यावी लागते, 5०-60 पोलीस त्यांच्यासोबत राहणार. महाराष्ट्रातले पोलीस आमच्या मुलीबाळींच रक्षण करु शकत नाही तसच आमच्या प्रमुख नेत्यांच रक्षण करु शकत नाहीत. यावर केंद्राने मोहर उमटवलीय” असा संजय राऊत यांनी दावा केला.

पोलीस खात्यावर काय गंभीर आरोप केले?

“राज्याच्या पोलीस महासंचालक महिला आहेत, त्या जाहीरपणे सांगतात, मी संघाची कार्यकर्ती आहे, तर तुम्ही काय अपेक्षा करणार?. पोलीस अधिकाऱ्यांच्या नेमणुका कुटुंबाची पार्श्वभूमी संघ परिवाराशी संबंधित आहे का? हे पाहून केल्या जातात. कर्तव्यदक्ष अधिकाऱ्याच हे क्वालिफिकेशन असेल, तर पोलीस दलात निराशा पसरणार” असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे. “पोलीस खातं भ्रष्टाचाराने बरबटलं आहे. पैसे दिल्याशिवाय बढती, बदल्या होत नाहीत. बढती, बदल्या का थांबल्या आहेत, कारण टेंडरला हवा तसा प्रतिसाद मिळालेला नाही. हे असं असल्यामुळे बदलापूर, कोल्हापुर, अंबरनाथ, अमळनेर सारख्या घटना घडणार” असं संजय राऊत म्हणाले.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.