देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राच्या राजकारणातील पुरुष आनंदीबाई, संजय राऊत यांचे जहरी शब्द, 5 पॉइंट
Sanjay Raut : लोकसभा निवडणुकीच्या निकालाच चित्र स्पष्ट झाल्यानंतर महाराष्ट्रात आरोप-प्रत्यारोपाच राजकारण सुरु झालय. आज खासदार संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर खूप तिखट शब्दात टीका केली. राऊतांनी फडणवीस यांच्यावर केलेली टीका पाच पॉइंटमध्ये.
लोकसभा निवडणुकीचा निकाल स्पष्ट झालाय. केंद्रात भाजपाप्रणीत NDA आघाडीच सरकार येण्याच मार्ग सुकर झाला आहे. कारण त्यांच्याकडे 272 या बहुमताच्या मॅजिक फिगरपेक्षा जास्त खासदार आहेत. काँग्रेसप्रणीत इंडिया आघाडीला विरोधी पक्षात बसाव लागेल असं चित्र आहे. 2019 च्या तुलनेत इंडिया आघाडीच्या जागा 2024 मध्ये मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. त्यामुळे विरोधकांचा आत्मविश्वास वाढला आहे. संजय राऊत यांनी आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत भाजपा नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर बोचरी टीका केली. देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल बोलताना जहरी शब्दांचा वापर केला. संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेतून फडणवीस यांच्याविरोधात मांडलेले पाच मुद्दे जाणून घ्या.
पेशवेकाळातल्या आनंदीबाई
“पेशवेकाळात आनंदीबाई होत्या, त्यांची आठवण ज्यासाठी काढली जाते, तसे देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राच्या राजकारणातील पुरुष आनंदीबाई आहेत”
त्याचा बदला घेतला
“देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रात सूडाच राजकारण केलं. त्याचा बदला राज्यातील जनतेने घेतला. जनतेला संधी मिळाली, तेव्हा त्यांनी दाखवून दिलं. तुमच फडतूस राजकारण चालणार नाही. आता फडणवीसांच्या पुढे-मागे नाचणारे महाराष्ट्राचे शत्रू आहेत”
महाराष्ट्राच्या राजकारणातील खलनायक
“देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राच्या राजकारणातील खलनायक आहेत. मोदी-शाहंवर जितका राग नाही, तितका महाराष्ट्रातील जनतेचा फडणवीसांवर राग आहे. विदर्भात काय झालं? नितीन गडकरींची जागा सोडली, तर विदर्भात फडणवीस यांचा भाजपा रसातळाला गेला. त्याला जबाबदार फडणवीस आहेत”
त्यांनीच तुमच्यावर अश्रू ढाळण्याची वेळ आणली
“जे दोन पक्ष तुम्ही फोडले. त्यांनीच तुमच्यावर अश्रू ढाळण्याची वेळ आणली. तुम्हाला फडणवीस अजून बरच पहायच आहे. महाराष्ट्राच्या इतिहासात तुमचं नाव काळ्याकुट्ट अक्षरात लिहिल जाईल. तुम्ही महाराष्ट्राची, मराठी माणसाच्या स्वाभिमानाची वाट लावली”
तुमच्या घरात काय चाललय ते पाहा
“महाराष्ट्रात जाती-धर्म, सूडाच राजकारण त्यांनी केलं. राज्य रसातळाला नेलं. आमच्यावर कारवाया करण्यापेक्षा तुमच्या घरात काय चाललय ते पाहा. हिंदूह्दय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांची शिवेसना फोडली. याचा सूड सातत्याने महाराष्ट्र घेत राहिलं. लोकसभा निवडणुकीत राज्यातील जनतेने त्यांना किंमत मोजायला लावली”