Sanjay Raut : वन नेशन, वन इलेक्शनुळे खर्च वाचेल, त्यावर राऊत म्हणाले ‘नरेंद्र मोदी हे कधी….’
Sanjay Raut : "आमच्या पूर्वजांनी, घटनाकारांनी अत्यंत काळजीपूर्वक घटनेत या तरुतुदी केल्या आहेत. मोदी यांनी नवीन संविधान,नवीन कायदा लिहू नये. भाजपा भविष्यात हरणार हे स्पष्ट झाल्यामुळे ते असे फंडे आणत आहेत" असं संजय राऊत म्हणाले.
उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊन वन नेशन, वन इलेक्शन संदर्भात बोलले आहेत. “2029 साली एकत्र निवडणुका घेतील. जे मोदी आणि त्यांचं सरकार चार राज्यांची निवडणूक एकत्र घेऊ शकले नाहीत. मुंबई महापालिकेसह 14 पालिकांच्या निवडणुका घेऊ शकत नाही. जम्मू-काश्मीरमध्ये तीन वर्ष निवडणूक घेऊ शकले नाहीत. मणिपूरला जे सरकार पळून जातय, त्ंयांनी वन नेशन वन इलेक्शनचा फंडा आणाव हे आश्चर्यकारक आहे” अशा शब्दात खासदार संजय राऊत यांनी मोदी सरकारवर ताशेरे ओढले. “हिंदुस्थान मोठा महान देश आहे. प्रचंड लोकसंख्या आहे. अनेक राज्य आहेत, इथे विविधता आहे, भाषा-प्रांत संस्कृती वेगळी आहे. संविधान बदलण्याचा प्रयत्न सुरु आहे, संविधानातील मार्गदर्शक तत्व बदलली जात आहेत. लोकसभा राज्याच्या निवडणुका यासाठी एकत्र घ्यायच्या आहेत, कारण EVM मुळे एकाचवेळी निवडणूका जिंकायच्या आहेत” असं संजय राऊत म्हणाले.
“महापालिका निवडणुका आधी एकत्र घेऊन दाखवा. राज्याच्या निवडणुका एकत्र घेऊन दाखवा. वन नेशन वन इलेक्शन हे लोकशाही विरोधी आहे. भविष्यात नो इलेक्शन नो नेशन नारा असेल. त्याची ही तयारी आहे. इंडिया आघाडीचे सगळे पक्ष एकत्र येऊन यावर चर्चा करु. संसेदत प्रस्ताव येण्याधी चर्चा करु. भाजपाच प्रत्येक पाऊल संविधानाला आव्हान देणारं आहे. घटनाकार, संविधान निर्मात्यांनी ज्या तरतुदी केल्या, त्या लोकाशाहीच्या दृष्टीने आवश्यक होत्या. मोदी सरकार संविधानावर हल्ला करत आहे” असा आरोप संजय राऊत यांनी केला.
मोदी हे कधी झाले अर्थ पंडीत?
एकाचवेळी निवडणुका झाल्यामुळे खर्च वाचेल या प्रश्नावर संजय राऊत यांनी उत्तर दिलं. “मोदी यांना अर्थशास्त्र कधीपासून कळायला लागलं? मोदी हे कधी झाले अर्थ पंडीत? आमच्या पूर्वजांनी, घटनाकारांनी अत्यंत काळजीपूर्वक घटनेत या तरुतुदी केल्या आहेत. मोदी यांनी नवीन संविधान,नवीन कायदा लिहू नये. भाजपा भविष्यात हरणार हे स्पष्ट झाल्यामुळे ते असे फंडे आणत आहेत” अशा शब्दात संजय राऊत यांनी प्रहार केला.
‘मूळात हे देशविरोधी कृत्य’
शिवसेना उद्धव ठाकरे गटाचा वन नेशन वन इलेक्शनला विरोध आहे हे संजय राऊत यांनी स्पष्ट केलं. “हे पाऊल संविधान, घटना विरोधी आहे. देशाच्या एकात्मतेच्या विरोधी आहे. मूळात हे देशविरोधी कृत्य आहे. तुम्हाला एकाचवेळी या निवडणुका जिंकायच्या म्हणून हे फंडे करत असाल तर देशाच्या दृष्टीने उपयोगाच नाही. निवडणूक ही लूट नाही, ही लोकशाहीची गरज आहे. लाडक्या उद्योगापतीच्या माध्यमातून देशाची लूट सुरु आहे ती थांबवली पाहिजे” असं संजय राऊत म्हणाले.