TMC Election 2022, Ward 15 : शिंदेंची ताकद तर शिवसेनेचं वर्चस्व पणाला लागणार; प्रभाग क्रमांक 15चे रागरंग काय?

TMC Election 2022, Ward 15 : यावेळी तीन वॉर्डांचा एक प्रभाग आहे. शिवाय वॉर्डांची फेररचना झाली आहे. त्यामुळे या प्रभागात अनेक उलटफेर झाले आहेत. या प्रभागात नव्या विभागांचा समावेश झाला आहे.

TMC Election 2022, Ward 15 : शिंदेंची ताकद तर शिवसेनेचं वर्चस्व पणाला लागणार; प्रभाग क्रमांक 15चे रागरंग काय?
शिंदेंची ताकद तर शिवसेनेचं वर्चस्व पणाला लागणार; प्रभाग क्रमांक 15चे रागरंग काय?Image Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Aug 01, 2022 | 8:28 AM

ठाणे: शिवसेनेत (shivsena) मोठी फूट पडली आहे. ज्यांनी संपूर्ण ठाण्यात शिवसेना बांधली, ज्यांच्यामुळे ठाण्यात शिवसेनेने आपली पाळंमुळं घट्ट रोवली, त्या एकनाथ शिंदे यांनीच शिवसेनेत बंड केलं. शिंदे हे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (uddhav thackeray) यांच्यापासून वेगळे झाले. त्यानंतर शिंदे यांनी भाजपला पाठिंबा देऊन मुख्यमंत्रीपदही मिळवलं. शिंदेसोबत एखाद दोन अपवाद वगळता ठाण्यातील सर्वच नगरसेवक एकनाथ शिंदे यांच्या पाठीशी उभे आहेत. त्यामुळे यावेळच्या ठाण्याच्या महापालिका निवडणुकीत (TMC Election 2022) शिंदेंची ताकद तर शिवसेनेचं वर्चस्वपणाला लागणार आहे. म्हणूनच ही निवडणूक अत्यंत चुरशीची ठरणार आहे. शिवसेनेकडे नगरसेवक नाहीत. तर शिंदेंकडे नगरसेवक आहेत. आता शिवसैनिक कुणाच्या बाजूने जातात हे ही या निवडणुकीतून दिसून येणार आहे. तसेच ठाणे महापालिकेची निवडणूक एक प्रकारे शिंदे यांची परीक्षाच घेणारी ठरणार आहे.

मतदारसंघात उलटफेर

2017च्या महापालिका निवडणुकीत चार वॉर्डांचा एक प्रभाग होता. प्रभाग क्रमांक 15 अ मधून भाजपच्या सुवर्णा कांबळे विजयी झाल्या होत्या. ब मधून शिवसेनेचे एकनाथ भोईर विजयी झाले होते. क मधून भाजपच्या केवलादेवी रामनयन यादव आणि ड मधून भाजपचे विलास कांबळे विजयी झाले होते. सुवर्णा कांबळे या 2017मध्ये निवडून आल्या होत्या. पण 2018मध्ये त्यांचं नगरसेवकपद रद्द करण्यात आलं होतं. यावेळी तीन वॉर्डांचा एक प्रभाग आहे. शिवाय वॉर्डांची फेररचना झाली आहे. त्यामुळे या प्रभागात अनेक उलटफेर झाले आहेत. या प्रभागात नव्या विभागांचा समावेश झाला आहे. हा प्रभाग जुन्या प्रभाागासारखा राहिलेला नाही. त्यामुळे विद्यमान नगरसेवक याच प्रभाागतून लढतात की दुसऱ्या प्रभाागाची वाट धरतात हे पाहावं लागणार आहे.

प्रभाग 15 अ

हे सुद्धा वाचा
पक्षउमेदवारविजयी उमेदवार
शिवसेना
भाजप
काँग्रेस
राष्ट्रवादी
मनसे
अपक्ष/ इतर

आरक्षण पडले

प्रभाग क्रमांक 15 अमध्ये अनुसूचित जाती महिला, ब हा वॉर्ड सर्वसाधारण महिला आणि क हा वॉर्ड खुला झाला आहे. त्यामुळे या वॉर्डातून उमेदवारी मिळवण्यासाठी अनेकांनी गुडघ्याला बाशिंग बांधलं आहे.

प्रभाग 15 ब

पक्षउमेदवारविजयी उमेदवार
शिवसेना
भाजप
काँग्रेस
राष्ट्रवादी
मनसे
अपक्ष/ इतर

मतदार ठरवणार झेंडा कुणाचा?

प्रभाग क्रमांक 15 मध्ये 35 हजार 993 इतकी आहे. त्यात अनुसूचित जातीची लोकसंख्या 4200 इतकी आहे. तर अनुसूचित जमातीच लोकसंख्या 482 एवढी आहे. त्यामुळे या मतदारसंघातील मतदार कुणाला कौल देणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

प्रभाग 15 क

पक्षउमेदवारविजयी उमेदवार
शिवसेना
भाजप
काँग्रेस
राष्ट्रवादी
मनसे
अपक्ष/ इतर

कोणत्या कोणत्या एरियाचा समावेश

प्रभाग क्रमांक 15मध्ये अंबिका नगर, ज्ञानेश्वर नगर, विम्बल्डन पार्क, हनुमान नगर, शिवशक्ती नगर, यशोधन सर्कल आदी परिसर या विभागात येतात.

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.