ठाणे: ठाणे महापालिकेची निवडणूक (Thane Municipal Corporation Elections) दिवाळीच्या आसपास कधीही होऊ शकते. पण त्या आधीच शिवसेनेत (Shiv sena) शिमगा झाल्याने निवडणुकीचे फटाके कोणत्या गटात जाऊन फोडायचे असा प्रश्न निवडणुकीच्या रणमैदानात उतरण्यासाठी इच्छूक असणाऱ्यांना पडला आहे. जसजशी निवडणूक जवळ येईल तस तसं कोण कुणाकडे असणार हे स्पष्ट होईल. आता तरी ठाण्यातील झाडून सर्व नगरसेवक शिंदे गटात (cm eknath shinde) आहेत. त्यामुळे शिंदे गटाचं पारडं जड असल्याचं चित्र आहे. अजून शिवसेनेच्या चिन्हाचा फैसला व्हायचा आहे. उद्धव ठाकरे यांनाच जर शिवसेनेचं धनुष्यबाण हे चिन्हं मिळालं तर आज शिंदेंसोबत असलेले नगरसेवक उद्याही शिंदे यांच्यासोबत असतीलच यांची काही शाश्वती नाही. कारण नवखे चिन्हं घेऊन निवडणूक लढवण्याची कोणीही रिस्क घेणार नाही. त्यामुळेच यावेळी ठाणे महापालिकेची निवडणूक रंगतदार होण्याची चिन्हे आहेत.
जुन्या प्रभाग क्रमांक 18मध्ये शिवसेनेचं वर्चस्व होतं. या प्रभागातील चारही वॉर्डात शिवसेनेचे चारही नगरसेवक निवडून आले होते. त्यापैकी दोन महिला होत्या तर दोन पुरुष होते. अ वॉर्डातून दीपक वेतकर, ब वॉर्डातून जयश्री फाटक, क वॉर्डातू सुखदा मोरे आणि ड वॉर्डातून राम रेपाळे विजयी झाले होते. गेल्यावेळी या प्रभागातून चार जणांना पालिकेत जाण्याची संधी मिळाली होती. यावेळी फक्त तिघांनाच संधी मिळणार आहे. गेल्यावेळी चार वॉर्डांचा एक प्रभाग होता. यावेळी तीन वॉर्डांचा एक प्रभाग आहे. शिवाय प्रभागाची फेररचना झाल्याने या प्रभागाचे स्वरुपच बदलून गेलं आहे. त्यामुळे विद्यमान नगरसेवक आणि इच्छुकांना सेफ मतदारसंघ शोधावा लागणार आहे.
प्रभाग क्रमांक 18 अ
पक्ष | उमेदवार | विजयी उमेदवार |
---|---|---|
शिवसेना | ||
भाजप | ||
काँग्रेस | ||
राष्ट्रवादी | ||
मनसे | ||
अपक्ष/इतर |
या प्रभागातून निवडणूक लढवू इच्छिणाऱ्यांसाठी संधीच संधी आहे. प्रभाग क्रमांक 18 अ हा वॉर्ड सर्वसाधारण महिलांसाठी राखीव झाला आहे. ब हा वॉर्ड आणि क हा वॉर्ड सर्वांसाठी खुला झाला आहे. या प्रभागात लढण्याची संधी निर्माण झाल्याने आता स्वत:साठी किंवा पत्नी, मुलगी आणि सुनेसाठी अनेकजण प्रयत्न करताना दिसत आहेत. त्यामुळे या प्रभागातील लढत अधिक रंजक होण्याची चिन्हे आहेत.
प्रभाग क्रमांक 18 ब
पक्ष | उमेदवार | विजयी उमेदवार |
---|---|---|
शिवसेना | ||
भाजप | ||
काँग्रेस | ||
राष्ट्रवादी | ||
मनसे | ||
अपक्ष/इतर |
नव्या प्रभाग क्रमांक 18मध्ये 41 हजार 458 लोक राहतात. त्यापैकी अनुसूचित जातीची लोकसंख्या 1338 इतकी आहे. तर अनुसूचित जमातीची लोकसंख्या 167 एवढी आहे. त्यामुळे नव्या प्रभागातील मतदार कोणत्या तीन उमदेवारांना आपला नगरसेवक म्हणून निवडतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
प्रभाग क्रमांक 18 क
पक्ष | उमेदवार | विजयी उमेदवार |
---|---|---|
शिवसेना | ||
भाजप | ||
काँग्रेस | ||
राष्ट्रवादी | ||
मनसे | ||
अपक्ष/इतर |
प्रभाग क्रमांक 18मध्ये साकेत, रुस्तमजी, राबोडी क्रांती नगर, आकाशगंगा, पंचगंगा केविला, वृंदावनचा काही भाग आदी परिसर येतात. त्यामुळे या परिसरातील मतदार कुणावर मेहरबान होणार आणि कुणावर नाही हे आताच सांगता येणार नाही.