नागरिकांसोबत मग्रुरी खपवून घेतली जाणार नाही, उर्जामंत्र्यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम

| Updated on: Jun 12, 2021 | 6:46 AM

एखादा अधिकारी जर नागरिकांसोबत मग्रूरपणे वागत असेल, तर अशा अधिकाऱ्यांना खपवून घेणार नाही, असा सज्जड दम नितीन राऊतांनी यावेळी अधिकाऱ्यांना दिला. (Minister Nitin Raut Comment on authorities arrogance will not be tolerated)

नागरिकांसोबत मग्रुरी खपवून घेतली जाणार नाही, उर्जामंत्र्यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम
Nitin Raut
Follow us on

बीड : “कोरोना काळात नागरिकांची मोठी गैरसोय झाली आहे. पण अशावेळी एखादा अधिकारी नागरिकांसोबत मग्रूरपणे वागत असेल तर त्यांची मग्रुरी खपवून घेतली जाणार नाही,” असा सज्जड दम उर्जामंत्री नितीन राऊत यांनी दिला आहे. उर्जामंत्री नितीन राऊत हे मराठवाडा दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी मराठवाड्यात ऑक्सिजन प्लांटची पाहणी केली. यावेळी बीडमध्ये त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. (Minister Nitin Raut Comment on authorities arrogance will not be tolerated)

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या दरम्यान बीड, परभणी येथे ऑक्सिजन प्लांट निर्मिती करण्याचा निर्णय घेतला. या प्लांटचे काम व्यवस्थित सुरू आहे की नाही हे पाहण्यासाठी मी हा दौरा केला. अनेक समस्या असतात. पण या समस्यांचे निराकरण जितक्या चांगल्या पद्धतीने करता येईल, तो करण्याचा माझा प्रयत्न आहे, असे नितीन राऊत  म्हणाले.

नागरिकांना त्रास होऊ नये यासाठी नितीन राऊतांचा पुढाकार

“कोरोना काळात आणि लॉकडाऊनमुळे अनेक नागरिकांना मोठ्या आर्थिक संकटांचा सामना करावा लागला. याच काळात वीज बिलावरूनही मोठा गोंधळ निर्माण झाला होता. त्यामुळे आता नागरिकांना त्रास होऊ नये यासाठी उर्जामंत्री नितीन राऊत यांनी पुढाकार घेतला आहे. तसेच बीडमध्ये नवीन वीज धोरण, नवीन सौर ऊर्जेचं धोरण आणलं आहे. या माध्यमातून शेतकऱ्यांना दिलासा देण्याचं काम करण्यात येत आहे.”

“कोरोना काळात नागरिकांची मोठी गैरसोय झाली आहे. मात्र सरकार म्हणून नागरिकांसह शेतकऱ्यांना दिलासा देण्याचे काम सरकारने केले आहे. यामुळे एखादा अधिकारी जर नागरिकांसोबत मग्रूरपणे वागत असेल, तर अशा अधिकाऱ्यांना खपवून घेणार नाही,” असा सज्जड दम नितीन राऊतांनी यावेळी अधिकाऱ्यांना दिला.

यंत्रणांनी सतर्क राहावं

“मान्सूनच्या काळात ज्या-ज्या ठिकाणी वीज खंडित होते तेथे योग्य व्यवस्था रहावी, नागरिकांना मदत व्हावी. तसेच नागरिकांच्या तक्रारी इंजिनिअरच्या व्हॉट्सअप ग्रुपवर जावी अशी तरतूद केली. सर्व ग्राहकांना विनातक्रार वीज वितरण सेवा देताना कोणत्याही प्रकारचा विलंब होणार नाही याची दक्षता घ्यावी. पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर उद्भवणाऱ्या अडचणी लक्षात घेऊन त्या तातडीने सोडवण्याच्या दृष्टीने अधिक यंत्रणांनी तयार राहावं,” असे आदेशही नितीन राऊत यांनी यावेळी दिले. (Minister Nitin Raut Comment on authorities arrogance will not be tolerated)

संबंधित बातम्या : 

मराठा समाजाला आरक्षण मिळण्यास विरोध नाही, पण आम्ही भिकारी आहोत का? नितीन राऊतांचा सवाल

स्थानिक स्वराज्य संस्था आणि विधानसभा निवडणूक काँग्रेस स्वबळावरच लढणार, नाना पटोलेंचा पुनरुच्चार

Special Story: पवारांना प्रशांत किशोर भेटले, मोदींना उद्धव, कोण कुणीकडे कशासाठी का जातंय? समजून घ्या 10 पॉईंट्समधून!