Eknath Shinde vs Shivsena : सर्वात मोठी बातमी! शिवसेनेचं विधीमंडळ कार्यालयच सील केलं, वादात नवी ठिणगी

Eknath Shinde vs Shivsena: शिवसेनेनचं विधीमंडळ कार्यालयच आता सील करण्यात आलं आहे. व्हीपच्या संघर्षात विधीमंडळातील शिवसेना कार्यालय सील करण्यात आल्यानं नवा वाद होण्याची शक्यता आहे. कोणत्याही बंडात आतापर्यंत शिवसेनेचं विधान भनवाची कार्यालय सील करण्यात आलेलं नव्हतं. यामुळे पुन्हा एकदा वाद पेटण्याची शक्यताय.

Eknath Shinde vs Shivsena : सर्वात मोठी बातमी! शिवसेनेचं विधीमंडळ कार्यालयच सील केलं, वादात नवी ठिणगी
Follow us
| Updated on: Jul 03, 2022 | 10:14 AM

मुंबई : शिवसेना (Shivsena) नेमकी कुणाची, हा वाद पेटलेला असतानाचा एक मोठी घडामोड समोर येतेय. शिवसेनेनचं विधीमंडळ कार्यालयच आता सील करण्यात आलं आहे. एकनाथ शिंदे गट (Eknath Shinde) विरुद्ध उद्धव ठाकरेंची शिवसेना, असा संघर्ष निर्माण झालेला असताना शिवसेनाला हा मोठा झटका बसला आहे. यामुळे पुन्हा एकदा वाद पेटण्याची शक्यताय. शिवसेनेकडून दोन व्हीप काढण्यात आले आहेत. एक व्हीप सुनील प्रभू यांनी काढलाय. या व्हीपमध्ये राजन साळवी (Rajan Salvi) यांना मतदान करण्याचे आदेश जारी करण्यात आलेत. तर दुसरीकडे भरत गोगावले यांनीही व्हीप जारी केलाय. या व्हीपमधून भाजपच्या राहुल नार्वेकरांना मतदान करण्याचे आदेश जारी करण्यात आलेत. या व्हीपच्या संघर्षात विधीमंडळातील शिवसेना कार्यालय सील करण्यात आल्यानं नवा वाद होण्याची शक्यता आहे. कोणत्याही बंडात आतापर्यंत शिवसेनेचं विधान भनवाची कार्यालय सील करण्यात आलेलं नव्हतं. पहिल्याच शिवसेनेनं ऐतिहासिक बंड पाहिलं आहे. दोन तृतीआंश पेक्षा जास्त आमदारांना घेऊन एकनाथ शिंदे यांनी बंड केलं. त्यानंतर त्यांनी भाजपसोबत सरकार स्थापन केल. आता मात्र विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीची सुरुवात होण्याआधीच विधीमंडळ कार्यालयच सील केल्यानं चर्चांना उधाण आलंय.

आजपासून विशेष अधिवेशन

उद्धव ठाकरे हे बंडखोर एकनाथ शिंदे गटाच्या धक्क्यानं पायउतार झाल्यानंतर विधानसभेचं हे विशेष अधिवेशन बोलवण्यात आलंय. या अधिवेशानात विविध मुद्द्यांवरून विरोधक आणि सत्ताधारी आमनेसामने येण्याची शक्यता आहे. त्यामुळे हे अधिवेशन हे सर्वात वादळी अधिवेशन ठरणार असं चित्र सध्या तरी दिसतंय. दरम्यान, विधानसभा अध्यक्ष निवडीची प्रक्रिया आधी केला जाईल.

आज विधानसभा अध्यक्षांची निवड

गेल्या अनेक महिन्यांपासून विधानसभा अध्यक्षांचं पद हे रिक्त आहे. नाना पटोले हे काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी गेल्याने त्यांनी विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर महाविकास आघाडी सरकारने अनेकदा हे पद भरण्याचा प्रयत्न केला. मात्र, राज्यपाल विरुद्ध राज्य सरकार वादामुळे आणि कायदेशीर पेचामुळे हे पद भरता आले नाही. आता बहुमताने आकडे फिरल्याने पुन्हा विधानसभा अध्यक्षांच्या निवडीने जोर धरला आहे.

कोण होणार विधानसभा अध्यक्ष?

भाजप आणि शिंदे गटाच्या युतीने नवं सरकार स्थापन झालं आहे. त्यामुळे बहुमताचा आकडा हा सध्या तरी याच सरकारकडे आहे. त्यामुळे आमचाच विधानसभा अध्यक्ष होणार असा दावा भाजपकडून करण्यात आलाय. यासाठी भाजपने राहुल नार्वेकर यांचा उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. तर महाविकास आघाडीकडूनही शिवसेनेच्या राजन साळवी यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आलाय. आम्ही व्हीप जारी करणार त्यामुळे शिंदे गटाला आम्हालाच मतदान करावे लागणार आणि माझा विजय निश्चित होणार असा दावा साळवीही करत आहे. त्यामुळे हाही पेच आजच सुटणार आहे.

भाजपाचे केवळ ७७ आमदार निवडून आलेत, आमदाराच्या स्फोटक दाव्यांनी खळबळ
भाजपाचे केवळ ७७ आमदार निवडून आलेत, आमदाराच्या स्फोटक दाव्यांनी खळबळ.
आवक जादा झाल्याने संत्र्‍यांचे भाव कोसळले, शेतकऱ्यांना मोठा तोटा
आवक जादा झाल्याने संत्र्‍यांचे भाव कोसळले, शेतकऱ्यांना मोठा तोटा.
बीड हत्या प्रकरण : अंजली दमानिया यांना गुन्हे शाखेची नोटीस
बीड हत्या प्रकरण : अंजली दमानिया यांना गुन्हे शाखेची नोटीस.
संतोष देशमुख प्रकरणात राष्ट्रवादीच्या महिला पदाधिकाऱ्याची CID चौकशी
संतोष देशमुख प्रकरणात राष्ट्रवादीच्या महिला पदाधिकाऱ्याची CID चौकशी.
'मुख्य आरोपीला वाचवण्यासाठी मोहरे...,' काय म्हणाले विजय वडेट्टीवार
'मुख्य आरोपीला वाचवण्यासाठी मोहरे...,' काय म्हणाले विजय वडेट्टीवार.
'...यानंतर लाडकी बहीण योजना बंद..,' ठाकरे गटाच्या नेत्याचं वक्तव्य
'...यानंतर लाडकी बहीण योजना बंद..,' ठाकरे गटाच्या नेत्याचं वक्तव्य.
' तर चॅट भाषणाआधीच व्हायरल केला असता...,' काय म्हणाले जितेंद्र आव्हाड
' तर चॅट भाषणाआधीच व्हायरल केला असता...,' काय म्हणाले जितेंद्र आव्हाड.
जिल्ह्यातील लोकांनी भूमिका घ्यायला हवी होती, संतोषच्या बंधूंची खंत
जिल्ह्यातील लोकांनी भूमिका घ्यायला हवी होती, संतोषच्या बंधूंची खंत.
तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल
तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल.
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती.