Eknath Shinde : अण्णा हजारेंनी व्हिडीओ कॉलवरून मुख्यमंत्र्यांशी साधला संवाद, एकनाथ शिंदेंना दिल्या शुभेच्छा

मार्गदर्शन असू द्या. काही वाटलं तर आदेश करा. सूचना करत जा. राज्याच्या हिताचं काम आम्ही करत राहू. जनतेला अपेक्षित असलेलं काम करण्याचा आम्ही प्रयत्न करू. देवेंद्रजी, मी स्वतः आणि आमचे सर्व सहकारी. जेव्हा केव्हा तुम्हाला वाटलं, मला हक्कानं आदेश देत जा.

Eknath Shinde : अण्णा हजारेंनी व्हिडीओ कॉलवरून मुख्यमंत्र्यांशी साधला संवाद, एकनाथ शिंदेंना दिल्या शुभेच्छा
एकनाथ शिंदेंना दिल्या शुभेच्छा
Follow us
| Updated on: Jul 02, 2022 | 7:05 PM

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्याशी व्हिडीओ कॉलवरून संवाद साधला. त्यावेळी अण्णा हजारेंनी मुख्यमंत्र्यांनी शुभेच्छा दिल्या. तुमचं मार्गदर्शन हवं, असल्याचं शिंदे हे अण्णांना म्हणाले. विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी एकनाथ शिंदे समर्थक आमदार गोवा विमानतळावरून (Airport) मुंबईसाठी (Mumbai) रवाना झालेत. गोवा येथील विमानतळावर सर्व शिंदे समर्थक आमदार पोहचले. त्यानंतर ते मुंबईसाठी रवाना झाले. यावेळी आमच्याकडं दोन तृतीयांश बहुमत आहे. त्यामुळं शिवसेनेचा (Shiv Sena) व्हीप लागू होत नसल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. गोवा विमानतळावरच शिंदे यांनी हजारे यांच्याशी संवाद साधला.

नेमका संवाद काय…

एकनाथ शिंदे – नमस्कार मी एकनाथ शिंदे बोलतोय. अण्णा हजारे – महाराष्ट्रासाठी हे खूप सुंदर झालं. असं पहिल्यांदाचं होत आहे. एकनाथ शिंदे – धन्यवाद. मी तुमचा आभारी आहे. तुमचा आशीर्वाद असू द्या. शुभेच्छा असू द्या

अण्णा हजारे – तुम्ही आतापर्यंत जे काम केलं त्याची ही पावती आहे. एकनाथ शिंदे – मार्गदर्शन असू द्या. काही वाटलं तर आदेश करा. सूचना करत जा. राज्याच्या हिताचं काम आम्ही करत राहू. जनतेला अपेक्षित असलेलं काम करण्याचा आम्ही प्रयत्न करू. देवेंद्रजी, मी स्वतः आणि आमचे सर्व सहकारी. जेव्हा केव्हा तुम्हाला वाटलं, मला हक्कानं आदेश देत जा.

हे सुद्धा वाचा

जनतेच्या हितासाठी काम करणार

अण्णा हजारेंची तब्यत बरी नसल्याचं त्यांच्या आवाजावरून जाणवत होतं. वय जास्त झाल्यामुळं ते थकलेले जाणवत होते. तरीही त्यांनी मुख्यमंत्र्यांना शुभेच्छा दिल्या. तुम्ही केलेल्या कामाची ही पावती असल्याचं ते म्हणाले. महाराष्ट्रात असं पहिल्यांदा घडत असल्याचं त्यांनी सांगितलं. राज्याच्या जनतेसाठी काम करणार असल्याचं मुख्यमंत्री शिंदे यांनी हजारे यांना आश्वस्त केलं. शिवाय तुमच्या मार्गदर्शनाची गरज असल्याचं ते म्हणाले.

धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर
धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर.
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला.
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी.
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं.
'निवडणुकीनंतर माज आलाय, पुढे पुन्हा अशी घटना घडली तर...'
'निवडणुकीनंतर माज आलाय, पुढे पुन्हा अशी घटना घडली तर...'.
सकाळी 9.30ला ते दोघे आले, फोटो काढून गेले, राऊतांच्या बंगल्याची रेकी
सकाळी 9.30ला ते दोघे आले, फोटो काढून गेले, राऊतांच्या बंगल्याची रेकी.
D फॉर डॉन अन् तो मंत्रिमंडळात? जितेंद्र आव्हाडांनी दिली हिंट
D फॉर डॉन अन् तो मंत्रिमंडळात? जितेंद्र आव्हाडांनी दिली हिंट.
'हुशार्‍या मारू नका, अडीच वर्षांनंतर..'; सत्तारांचा विरोधकांना इशारा
'हुशार्‍या मारू नका, अडीच वर्षांनंतर..'; सत्तारांचा विरोधकांना इशारा.
शरद पवारांचे 'हे' दोन नेते दादांच्या भेटीला, राजकारणात भूकंप होणार?
शरद पवारांचे 'हे' दोन नेते दादांच्या भेटीला, राजकारणात भूकंप होणार?.
कल्याणात मराठी कुटुंबाला मारहाण,मनसे दिला इशारा,'येत्या २४ तासात जर..'
कल्याणात मराठी कुटुंबाला मारहाण,मनसे दिला इशारा,'येत्या २४ तासात जर..'.