Sharad Pawar : अमित शहांच्या मंत्रालयाचे अधिकारी पवारांच्या दारात, नेमकं काय चर्चा झाली? पवारांनी ट्विटवर सांगितली

Sharad Pawar : देशात सहकार क्षेत्राचं मोठं जाळं आहे. महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये तर सहकार क्षेत्राची परंपरा मोठी आहे. सहकाऱ्याच्या माध्यमातून या दोन्ही राज्यांनी मोठा विकास साधला आहे. त्यामुळे केंद्र सरकारने नवं सहकार मंत्रालय निर्माण केलं.

Sharad Pawar : अमित शहांच्या मंत्रालयाचे अधिकारी पवारांच्या दारात, नेमकं काय चर्चा झाली? पवारांनी ट्विटवर सांगितली
अमित शहांच्या मंत्रालयाचे अधिकारी पवारांच्या दारात, नेमकं काय चर्चा झाली? पवारांनी ट्विटवर सांगितलीImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Jul 19, 2022 | 5:36 PM

नवी दिल्ली: राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (sharad pawar) हे विरोधी पक्षात असले तरी सत्ताधारी पक्षातही पवारांचं वजन आहे. देशातील ज्येष्ठ, अनुभवी, अभ्यासू नेते म्हणून त्यांचा सर्वच राजकीय पक्षाचे नेते आदर करत असतात. पंतप्रधानांपासून ते अनेक राजकीय पक्षाचे नेते पवारांचा नेहमीच सल्ला घेत असतात. राजकीय नेतेच (political leader) नाही तर प्रशासकीय अधिकारीही पवारांचा सल्ला घेत असतात इतका पवारांचा राजकारणाचा आणि प्रशासनाचा गाढा अभ्यास आहे. शेतीपासून ते ग्रामीण समस्या, तंत्रज्ञानापासून नागरी समस्या, संरक्षण क्षेत्रापासून ते परराष्ट्र धोरणापर्यंत अनेक विषयावर पवारांचा विशेष अभ्यास आहे. सहकार क्षेत्रातील अभ्यासाबाबत पवारांचा हात धरेल असा नेता जवळपास नाहीये. त्यामुळेच केंद्रात नव्याने स्थापन झालेल्या सहकार मंत्रालयालाही (Ministry of Co-operation) पवारांचा सल्ला घेतल्याशिवाय पुढे जाता येत नाही.

हे सुद्धा वाचा

सहकार खात्याच्या काही अधिकाऱ्यांनी काल दिल्लीतील शरद पवार यांच्या निवासस्थानी येऊन त्यांची भेट घेतली. यावेळी या अधिकाऱ्यांनी पवारांशी चर्चा केली. शरद पवार यांनी खुद्द ट्विट करून ही माहिती दिली आहे. सहकार मंत्रालयाच्या प्रतिनिधींनी काल माझी दिल्लीतील माझ्या निवासस्थानी भेट घेतली. सहकार क्षेत्रातील माझे अनुभव सांगण्याची त्यांनी मला विनंती केली. तसेच सहकार मंत्रालय अधिक परिणामकारक चालवण्यासाठी काही महत्त्वाचे सल्ले देण्याची विनंतीही त्यांनी मला केली, असं शरद पवार यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.

सर्वतोपरी सहकार्य करणार

मी महाराष्ट्रातील सहकार क्षेत्रात सक्रिय राहिलो आहे. मी त्यांना सर्वतोपरी सहकार्य करण्याचं आश्वासन दिलं आहे. सचिव घनश्याम कुमार, ज्वॉईंट सेक्रेटरी पंकज कुमाल बन्सल, डेप्युटी डायरेक्टर सुचिता, चीफ डायरेक्टर लिलत गोयल आदी अधिकारी या शिष्टमंडळात होते, असं पवार यांनी म्हटलं आहे.

देशात पहिल्यांदाच सहकार मंत्रालय

देशात सहकार क्षेत्राचं मोठं जाळं आहे. महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये तर सहकार क्षेत्राची परंपरा मोठी आहे. सहकाऱ्याच्या माध्यमातून या दोन्ही राज्यांनी मोठा विकास साधला आहे. त्यामुळे केंद्र सरकारने नवं सहकार मंत्रालय निर्माण केलं. अमित शहा यांच्याकडे गृहखात्यासोबतच सहकार खात्याचीही जबाबदारी सोपवण्यात आली. अमित शहा हे गुजरातचे आहेत. त्यांचं गुजरातच्या सहकार चळवळीत मोठं योगदान आहे. या क्षेत्राचा त्यांचा अभ्यास आहे. त्यामुळे या खात्याची त्यांच्यावर जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.