AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Devendra Fadanvis : निवडून आले आमच्यासोबत अन् सत्ता स्थापन विरोधकांबरोबर, विश्वासघातकी कोण? फडणवीसांचा ठाकरेंना सवाल

पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडून सातत्याने भाजपाने पाठीत खंजीर खुपसला असा आरोप केला जातो. शिवाय जे त्यांनी आता केले तेच मी अडीच वर्षापूर्वी सांगितले होते म्हणजे महाविकास आघाडीची उदयच झाला नसता असे ते पटवून देत आहेत, पण असा कोणता फॉर्म्युला ठरलेलाच नव्हता, त्याचा मी साक्षीदार आहे असे म्हणत फडणवीसांनी आरोप फेटाळले आहेत.

Devendra Fadanvis : निवडून आले आमच्यासोबत अन् सत्ता स्थापन विरोधकांबरोबर, विश्वासघातकी कोण? फडणवीसांचा ठाकरेंना सवाल
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पक्षप्रमुख उद्धव ठाकरे
Follow us
| Updated on: Aug 14, 2022 | 6:35 PM

मुंबई : 2019 च्या निवडणुकीनंतर राज्यात (MVA) महाविकास आघाडीची स्थापना झाली त्यानंतर अडीच वर्षात (Eknath Shinde) एकनाथ शिंदे यांच्या नंतर पुन्हा सत्तांतर झाले असले तरी बंद खोलीत गृहमंत्री अमित शाह, देवेंद्र फडणवीस आणि (Uddhav Thackeray) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यात काय चर्चा झाली आणि कोणी विश्वासघात केला हे या सर्वांची उत्तरे अर्धवटच राहीलेली आहेत. असे असले तरी अडीच वर्षाचा फार्म्युला कधी ठरला नसल्याचा पुन्नरउच्चार उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. दरम्यान, एकनाथ शिंदे यांनी असे काही ठरले होते का अशी विचारणा थेट गृहमंत्री अमित शाह यांना केल्याने हा मुद्दा पुन्हा समोर आला आहे. मात्र, आम्ही बिहारमध्ये करु शकतो तर महाराष्ट्रात का नाही असे म्हणत अडीच वर्षाचा फॉर्म्युला ठरलाच नसल्याचे शहा यांनीही सांगितले होते. हे सर्व असले निवडुण आले आमच्यासोबत अन् सत्ता स्थापन विरोधकांबरोबर, त्यामुळे विश्वासघातकी कोण असा प्रतिसवाल देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.

ठाकरेंच्या आरोपांवर फडणवीसांचे उत्तर

पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडून सातत्याने भाजपाने पाठीत खंजीर खुपसला असा आरोप केला जातो. शिवाय जे त्यांनी आता केले तेच मी अडीच वर्षापूर्वी सांगितले होते म्हणजे महाविकास आघाडीची उदयच झाला नसता असे ते पटवून देत आहेत, पण असा कोणता फॉर्म्युला ठरलेलाच नव्हता, त्याचा मी साक्षीदार आहे असे म्हणत फडणवीसांनी आरोप फेटाळले आहेत. तर आमच्यासोबत निवडुण आले आणि विरोधकांशी हात मिळवणी करीत सत्तेत बसले मग विश्वासघातकी कोण असा सवालच त्यांनी उद्धव ठाकरे यांना केला आहे.

मी साक्षीदार, फॉर्म्युला ठरलाच नव्हता

अडीच वर्ष शिवसेनेचा आणि त्यानंतर भाजपचा मुख्यमंत्री असा फॉर्म्युला ठरल्याचे उद्धव ठाकरे हे सातत्याने सांगत आहेत पण मी या सर्व घटनेचा साक्षीदार राहिलेलो आहे. त्यामुळे असा कोणताच फॉर्म्युला ठरला नव्हता. तर आकड्यांचा खेळ करता येतो हे लक्षात आल्यानंतर त्यांनी ही भूमिका घेतल्याचे फडणवीसांनी सांगितले आहे. सत्ता स्थापनेस मित्र पक्षाची गरज लागतेच हे निदर्शनास आल्यानंतर त्यांनी भूमिका बदलण्यास सुरवात केल्याचे फडणवीस यांनी सांगितले आहे.

संपूर्ण अधिकार मुख्यमंत्र्यांना

मंत्रिमंडळाच्या विस्तारानंतर आता शिंदे सरकारने खातेवाटपही केले आहे. यावरुन कुणामध्येही मतभेद नाहीत. शिवाय खातेवाटपाचे अधिकार हे मुख्यमंत्र्यांना असतात. त्यामध्ये कोणीही हस्तक्षेप केलेला नाही. शिवाय आणखी मंत्रिमंडळाचा विस्तार राहिलेला आहे. तो विस्तार झाला की ज्यांच्याकडे अतिरिक्त खाते आहे ते इतरांना दिले जाईल असेही देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले आहे.

मुंबईचा पहिला केबल-स्टे उड्डाणपूल वाहतुकीसाठी खुला
मुंबईचा पहिला केबल-स्टे उड्डाणपूल वाहतुकीसाठी खुला.
भारतानं कबरडं मोडलं पाकिस्तान वठणीवर, संरक्षण मंत्र्याचं मोठं वक्तव्य
भारतानं कबरडं मोडलं पाकिस्तान वठणीवर, संरक्षण मंत्र्याचं मोठं वक्तव्य.
ऑपरेशन सिंदूरमुळे पाकिस्तानचं मोठं नुकसान
ऑपरेशन सिंदूरमुळे पाकिस्तानचं मोठं नुकसान.
चीनविरोधात मोठी भारताची अ‍ॅक्शन, तणावादरम्यान खोटा प्रचार करणं भोवलं
चीनविरोधात मोठी भारताची अ‍ॅक्शन, तणावादरम्यान खोटा प्रचार करणं भोवलं.
आयकर विभागाची विदर्भात मोठी कारवाई; सोनं-चांदीच्या दुकानांवर धाडसत्र
आयकर विभागाची विदर्भात मोठी कारवाई; सोनं-चांदीच्या दुकानांवर धाडसत्र.
जोरदार वारा, पावसाचा तडाखा; फळबागांना नुकसान
जोरदार वारा, पावसाचा तडाखा; फळबागांना नुकसान.
मराठी दाम्पत्यानं घातला डिलिव्हरी बॉय सोबत वाद, भांडूपमधला बघा VIDEO
मराठी दाम्पत्यानं घातला डिलिव्हरी बॉय सोबत वाद, भांडूपमधला बघा VIDEO.
सचिन अहीर पवारांच्या भेटीला अन् एकाच गाडीतून प्रवास, काय झाली चर्चा?
सचिन अहीर पवारांच्या भेटीला अन् एकाच गाडीतून प्रवास, काय झाली चर्चा?.
केंद्रीय कॅबिनेट बैठकीत ऑपरेशन सिंदूरवर चर्चा, सुत्रांची माहिती
केंद्रीय कॅबिनेट बैठकीत ऑपरेशन सिंदूरवर चर्चा, सुत्रांची माहिती.
अजित पवार हा फुटलेला गट आहे, संजय राऊतांचा टोला
अजित पवार हा फुटलेला गट आहे, संजय राऊतांचा टोला.