The Kashmir Files: काश्मीरमधून पंडीतांनी पलायन केलं त्यावेळेस केंद्रात कुणाचं सरकार होतं? काँग्रेस नेते म्हणतात, भाजपला विचारा

जानेवारी 1990 मध्ये जेव्हा काश्मीरी पंडितांना काश्मीर सोडण्यासाठी मजबूर केलं गेलं त्यावेळेस केंद्रात व्ही.पी.सिंग यांचं सरकार होतं आणि त्याला भाजपचा पाठिंबा होता. त्यावेळेस जम्मू आणि काश्मीरमध्ये राज्यपाल राजवट होती.

The Kashmir Files: काश्मीरमधून पंडीतांनी पलायन केलं त्यावेळेस केंद्रात कुणाचं सरकार होतं? काँग्रेस नेते म्हणतात, भाजपला विचारा
काश्मीरी पंडितांना घरदार सोडावं लागलं त्यावेळेस केंद्रात व्ही.पी.सिंग यांचं सरकार होतं तर काश्मीरमध्ये अब्दुल्लाImage Credit source: Social
Follow us
| Updated on: Mar 16, 2022 | 9:24 AM

द काश्मीर फाईल्स (The Kashmir Files) सिनेमा सध्या जोरदार चर्चेत आहे. त्याला कारण राजकीयही आहे आणि सिनेमाची मांडणीही. सिनेमा म्हणून तो प्रेक्षकांच्या पसंतीला उतरलेला आहे पण सोबतच त्याचं राजकारणही केलं जातंय हेही वास्तव. राजकारणाच्या ह्या चिखलफेकीत काही आरोप प्रत्यारोप, दावे प्रतिदावेही केले जातायत. सोशल मीडियावर अपुऱ्या माहितीचा पुर आलेला दिसतोय. भाजपचे नेते काश्मीरी पंडितांच्या (Kashmiri Pandits) पलायनाला भाजपला जबाबदार धरतायत तर भाजपचे नेते काँग्रेसच्या धोरणांकडे बोट दाखवतायत. काँग्रेस नेते दिग्विजयसिंग (Digvijay Singh) यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत, भाजपला (BJP) जाऊन विचारा असा सल्ला सवालकर्त्याना केलाय. पण काश्मीरी पंडितांनी काश्मीर सोडलं त्यावेळेस तिथं नेमकं कुणाचं सरकार होतं, कोण राज्यपाल होतं, कुणाच्या पाठिंब्यावर होतं असे सगळे प्रश्न पुन्हा चर्चेत आहेत. दिग्विजयसिंग यांनी केलेल्या पोस्टमध्ये त्यांनी भाजपाकडे बोट दाखवण्याचा प्रयत्न केलाय.

काय आहे दिग्विजयसिंग यांची पोस्ट?

विवेक अग्निहोत्रींचा द काश्मीर फाईल्स सिनेमा पाहिल्यानंतर बाहेर पडणारा प्रेक्षकांचा एक वर्ग झूंडगिरीवर येताना दिसतोय. सिनेमात जे दाखवलंय त्यात ऐतिहासिक तथ्य किती हे तपासण्याची तसदीही घेताना दिसत नाहीय. त्यामुळे वास्तवाची मोडतोड होतीय. असं एक वातावरण निर्मिती केली जातेय की काश्मीरी पंडितांना घरदार सोडावं लागलं त्याला सर्वस्वी काँग्रेस जबाबदार आहे. सेक्युलर धोरणं जबाबदार आहेत. दिग्विजयसिंग यांनी त्याच प्रश्नाचं उत्तर देण्याचा प्रयत्न सोशल पोस्टमधून केलाय. त्यांच्या पोस्टमध्ये ते म्हणतात, ‘जानेवारी 1990 मध्ये जेव्हा काश्मीरी पंडितांना काश्मीर सोडण्यासाठी मजबूर केलं गेलं त्यावेळेस केंद्रात व्ही.पी.सिंग यांचं सरकार होतं आणि त्याला भाजपचा पाठिंबा होता. त्यावेळेस जम्मू आणि काश्मीरमध्ये राज्यपाल राजवट होती. जगमोहन हे राज्यपाल होते ज्यांनी नंतर भाजपात प्रवेश केला. आता तुम्ही सवाल भाजपला करा’. विशेष म्हणजे अटल बिहारी वाजपयी, व्ही.पी.सिंग आणि लालकृष्ण अडवाणी असे तिघे एकत्र बसल्याचा फोटोही दिग्विजयसिंगांनी पोस्ट केलाय. वीरेंद्र पाल यांची पोस्ट दिग्विजयसिंग यांनी अशी भाजपला कोंडीत पकडणारी पोस्ट केली तर त्यांना उत्तर मिळणारच. वीरेंद्र पाल यांनी दिग्विजयसिगांना उत्तर देताना, त्या दोन दिवसात काय झालं हे सांगण्याचा प्रयत्न केलाय. त्यात ते म्हणतात- 18 आणि 19 तारखेला हत्याकांड झालं. 18 तारखेलाच फारुख अब्दुल्लांनी राजीनामा दिला. त्याचं सरकार काँग्रेसच्या पाठिंब्यावर टिकलेलं होतं. मुफ्ती मोहम्मद सईद देशाचे गृहमंत्री होते. मुफ्ती मोहम्मद सईद आणि काँग्रेसचं हे षडयंत्र होतं की, कुठल्याही सरकारशिवाय ही घटना पूर्णत्वाला न्यायची. तोपर्यंत जगमोहन यांनी पदभार स्वीकारलेला नव्हता. त्याच दरम्यान ही घटना पूर्ण केली गेली. जगमोहन यांनी कारभार हाती घेईपर्यंत ही घटना पूर्ण झाली होती.

श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?.
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.