Bhagarsingh Koshyari : अजित डोवाल यांनी घेतली राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट! भेटीचं नेमकं कारण काय?
ही सदिच्छा भेट असल्याचं सांगितलं जात असलं, तरी भेटीदरम्यान, या दोन्ही नेत्यांमध्ये नेमकी काय चर्चा झाली, यावरुन राजकीय वर्तुळात अंदाज बांधले जाऊ लागले आहेत. अद्याप भेटीबाबत कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही.
मुंबई : अजित डोवाल (Ajit Doval) यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagatsingh Koshyari) यांची भेट घेतली. राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार (The National Security Advisor of India) अजित डोवाल यांनी राज्यपाल कोश्यारी यांनी घेतलेली भेट ही सदिच्छा भेट असल्याचं सांगितलं जातंय. मुंबई स्थित राजभवनात ही सदिच्छा भेट घेण्यात आली. या फेटीदरम्यानचे फोटोही समोर आलेत. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि अजित डोवाल यांच्यात वेगवेगळ्या विषयांवर या भेटीदरम्यान चर्चा झाली. मात्र चर्चेत नेमकं काय घडलं, हे अद्याप गुलदस्त्यातच आहे.
Maharashtra | National Security Advisor to Prime Minister Ajit Doval met Maharashtra Governor Bhagat Singh Koshyari at Raj Bhavan in Mumbai, today pic.twitter.com/BJtngFu7O0
हे सुद्धा वाचा— ANI (@ANI) September 3, 2022
पाहा ताज्या घडामोडी
वेगवेगळ्या वादग्रस्त विधानांमुळे महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे नेहमीच चर्चेत असतात. दरम्यान, आता राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार यांनीच थेट कोश्यारी यांची भेट घेतल्यानं तर्क वितर्कांना उधाण आलं आहे.
पंतप्रधानांचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित कुमार डोवल यांनी आज महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची राजभवन मुंबई येथे सदिच्छा भेट घेतली. pic.twitter.com/duIgXTQWyK
— Governor of Maharashtra (@maha_governor) September 3, 2022
ही सदिच्छा भेट असल्याचं सांगितलं जात असलं, तरी भेटीदरम्यान, या दोन्ही नेत्यांमध्ये नेमकी काय चर्चा झाली, यावरुन राजकीय वर्तुळात अंदाज बांधले जाऊ लागले आहेत. अद्याप भेटीबाबत कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही.
महाराष्ट्राच्या राज्यपालांच्या अधिकृत ट्वीटर अकाऊंटवरुन या भेटीचे फोटो ट्वीट करण्यात आले आहेत. यातील एका फोटोमध्ये अजित डोवाल यांच्याकडून राज्यपालांना पुष्पगुच्छ देण्यात आल्याचं दिसून आलं. तर दुसऱ्या फोटोमध्ये दोन्ही दिग्गजांमध्ये चर्चा होत असल्याचं पाहायला मिळालंय. ही सदिच्छा भेट असल्याचं राज्यपालांच्या कार्यालयाकडून सांगण्यात आलं आहे. शनिवारी सकाळीच ही भेट घेण्यात आली.