Amol Mitkari : राष्ट्रवादी ही काढणार संवाद यात्रा, या समस्या आणणार पुढे..जाणून घ्या कोणाशी करणार हितगूज..
Amol Mitkari : आता राष्ट्रवादी ही संवाद यात्रा काढणार आहे..
अमरावती : आता राष्ट्रवादी काँग्रेसही (Nationalist Party) संवाद यात्रा काढणार आहे. सध्या संवाद यात्रा (Swanad Yatra) लोकांपर्यंत पोहचण्याचे महत्वाचे साधन ठरले आहे. संवाद यात्रेतून सर्वसामान्य लोकांच्या समस्या अगदी जवळून समजण्यासाठी, त्यांच्याशी संवाद साधण्यासाठी महत्वाची ठरत आहे. यात्रा लोकांची प्रश्न जाणून घेण्यासाठी प्रभावी माध्यम ठरत आहे. राष्ट्रवादी पक्ष आता पुन्हा संवाद यात्रेतून जनतेशी हितगूज करणार आहे. राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांनी या संवाद यात्रेविषयी माहिती दिली.
भारत जोडो यात्रेला देशभरातून प्रतिसाद मिळत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस आता संवाद यात्रा काढणार आहे. राष्ट्रवादी शेतकरी संपर्क यात्रा सुरु होणार आहे. पुढील महिन्यात ही संवाद यात्रा सुरु करण्यात येणार आहे. विरोधी पक्षनेते अजित पवार हे या यात्रेचे नेतृत्व करणार आहेत.
राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी, शेतकरी संपर्क यात्रेची माहिती दिली. याविषयीची प्राथमिक बैठक अमरावती येथे झाली. या यात्रेत राज्यातील महत्वाच्या प्रश्नाला हात घालण्यात येणार आहे. शेतकऱ्यांच्या समस्या पुढे आणण्यात येणार आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस शेतकरी संपर्क यात्रेच्या माध्यमातून विविध पिकांना मिळणाऱ्या कमी भावाविषयी आवाज उठविणार आहे. सोयाबिनची मोठी हानी झाली, कापसाला, तुरीला भाव नाही. शेतकरी हवालदिल झाला आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस शेतकऱ्यांशी संवाद साधणार आहे. त्यानंतर हिवाळी अधिवेशनात राष्ट्रवादी या प्रश्नावर धडक मोर्चा काढणार आहे.
मुळ मुद्याला भाजप सातत्याने बगल देत आहे. ते भरकटवण्यासाठी प्रयत्न करत असल्याचा आरोप मिटकरी यांनी केला आहे. रोजगार, उद्योग, शेती या प्रश्नांवर लक्ष हटविण्यासाठी भाजप प्रयत्न करत असल्याचा आरोप मिटकरी यांनी केला.