शिवाजी महाराजांचा जो उदात्त भाव, त्याच मार्गावर मोदींची वाटचाल; मुख्यमंत्री यादव यांच्याकडून गौरवोद्गार

मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव हे महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. आज त्यांनी पुण्यात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावर आधारीत थीम पार्क शिवसृष्टीची पाहणी केली. ही शिवसृष्टी पाहिल्यानंतर त्यांनी शिवाजी महाराजांच्या कार्य कर्तृत्वाला उजाळा दिला. इतिहासातील एक एक पैलू त्यांनी उलगडवून दाखवले.

शिवाजी महाराजांचा जो उदात्त भाव, त्याच मार्गावर मोदींची वाटचाल; मुख्यमंत्री यादव यांच्याकडून गौरवोद्गार
Dr Mohan YadavImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Oct 01, 2024 | 7:31 PM

शिवाजी महाराजांचं आयुष्य अद्वितीय होतं. त्यांनी अत्याचारी लोकांना धडा शिकवला. सामान्य लोकांना एकत्र करून त्यांना असाधारण बनवण्याचं काम शिवाजी महाराजांनी केलं. हे विलक्षण कर्तृत्व फक्त शिवाजी महाराजच करू शकत होते. शिवाजी महाराजांचा जो उदात्त भाव होता, त्याचा आशा आणि अपेक्षने पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मार्गक्रमण करत आहेत, असं कौतुकोद्गार मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री डॉ. मोहन यादव यांनी काढले.

मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव हे पुण्याच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी शिवाजी महाराज यांच्या जीवनावर आधारीत थीम पार्क शिवसृष्टीचं अवलोकन केलं. त्यानंतर रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीत जाऊन पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर आणि त्याचे जन कल्याणकारी प्रशासन या विषयावर आयोजित राष्ट्रीय चर्चेत भाग घेतला. यावेळी त्यांनी हे मत व्यक्त केलं. भारत सनातन संस्कृती आणि महान विचारांसाठी ओळखला जातो. त्याने जगाला सदैव प्रेरित केलं आहे. या संस्कृतीचे प्रतिक शिवाजी महाराजांचा जय जयकार करताना आमची छाती अभिमानाने फुलून जाते, असं मुख्यमंत्री मोहन यादव यांनी सांगितलं.

Dr Mohan Yadav

Dr Mohan Yadav

नौदलाला ध्वज हवा होता

स्वातंत्र्यानंतर नौदलाला लगेचच नवीन ध्वज असायला हवा होता. पण स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच नौदलाला नवीन ध्वज देण्यात आला. आणि शिवाजी महाराजांची आपल्याला आठवण येते, त्यांचं स्मरण होते हे आपलं सौभाग्य आहे, असं मुख्यमंत्री यादव म्हणाले.

केवळ मंदिर आणि देवळांचा जीर्णोद्धार केला नाही…

आपण महाराणी अहिल्याबाई यांची 300 वी जयंती साजरी करत आहोत याचा मला प्रचंड आनंद होतोय. मुघलांच्या काळात अहिल्याबाईंनी केवळ मंदिर आणि देवळांचा जीर्णोद्धार करण्याचं काम केलं नाही तर त्यांनी संपूर्ण देशात धार्मिक सहिष्णुता आणि सांस्कृतिक समृद्धीचा संदेश दिला. वाराणासीपासून सोमनाथ आणि मानसरोवरपर्यंत त्यांचं योगदान अतुलनीय आहे. लोकमाता अहिल्याबाईने आपल्या अद्वितीय शासनकाळात सनातन संस्कृतीचा ध्वज अभिमानाने फडकवला, असंही त्यांनी सांगितलं.

Dr Mohan Yadav

Dr Mohan Yadav

आज आपण जेव्हा वाराणासी जातो तेव्हा बाबा विश्वनाथ धाममध्ये पूजा करण्यासाठी जायला संधी मिळते. ती संधी कुणी दिली असेल तर ती अहिल्याबाई होळकर यांनी दिली आहे. या मंदिराला देवस्थान कुणी केलं असेल तर ते केवळ अहिल्याबाई होळकर यांनी. कारण त्याकाळात आपलं हे देवस्थान उद्ध्वस्त करण्यात आलं होतं, अशी माहितीही त्यांनी दिली.

मध्यप्रदेश आणि महाराष्ट्राच्या दरम्यान अद्भूत संबंध आहे. अहिल्याबाई तुमची मुलगी असेल पण आमची सून आहे. अहिल्याबाईंनी जे योगदान दिलं ते अद्भूत आहे. सर्व नक्षत्रांमध्ये सूर्यासारखी तेजाने तळपणाऱ्या अहिल्याबाईचं स्थान अत्यंत वेगळं आणि महत्त्वाचं आहे. मी त्यांना वारंवार प्रणाम करतो, असं उद्गारही त्यांनी काढलं.

भाजप पक्ष सगळ्यांना गिळण्याचं काम करतो- जितेंद्र आव्हाड
भाजप पक्ष सगळ्यांना गिळण्याचं काम करतो- जितेंद्र आव्हाड.
शहाजी बापू्ंनी केले वक्तव्य तर सुहास बापूच आमदार......
शहाजी बापू्ंनी केले वक्तव्य तर सुहास बापूच आमदार.......
विरोधकांना धारेवर धरणारे अमोल मिटकरी बनले ट्राफिक पोलीस, बघा व्हिडीओ
विरोधकांना धारेवर धरणारे अमोल मिटकरी बनले ट्राफिक पोलीस, बघा व्हिडीओ.
दादा कार्यकर्त्यांवर भडकले, 'फालतूपणा बस्स, आता तू बोलला ना तर मी...'
दादा कार्यकर्त्यांवर भडकले, 'फालतूपणा बस्स, आता तू बोलला ना तर मी...'.
नायर रुग्णालयात विद्यार्थीनीचा लैंगिक छळ, शिंदेंच्या आदेशानंतर अॅक्शन
नायर रुग्णालयात विद्यार्थीनीचा लैंगिक छळ, शिंदेंच्या आदेशानंतर अॅक्शन.
सुळेंचा भाजपवर टीका; 'चांदीच्या ताटात जेवायची वेळ येते तेव्हा...'
सुळेंचा भाजपवर टीका; 'चांदीच्या ताटात जेवायची वेळ येते तेव्हा...'.
गरबा-दांडिया खेळणाऱ्या रसिकांसाठी खुशखबर; आता मनसोक्त खेळा, कारण...
गरबा-दांडिया खेळणाऱ्या रसिकांसाठी खुशखबर; आता मनसोक्त खेळा, कारण....
'हम-हम पाच है... ', कर्जत-जामखेड मतदारसंघात निनावी बॅनरची होतेय चर्चा
'हम-हम पाच है... ', कर्जत-जामखेड मतदारसंघात निनावी बॅनरची होतेय चर्चा.
अॅट्रोसिटी दाखल झाल्यानंतर बोंबलायचं नाही, आंबेडकरांचा CM-DCMवर निशाणा
अॅट्रोसिटी दाखल झाल्यानंतर बोंबलायचं नाही, आंबेडकरांचा CM-DCMवर निशाणा.
महाविकास आघाडी सरकारकडून शेतकर्यांसाठी मोर्चा
महाविकास आघाडी सरकारकडून शेतकर्यांसाठी मोर्चा.