Nitin Raut | राज्यात काँग्रेसमध्ये मोठ्या बदलांची शक्यता, राऊतांना काँग्रेसनं एससी सेलमधून हटवलं, विधानसभा अध्यक्ष होणार?
एक पत्रक जारी करत त्यांना काँग्रेस एससी विभागाच्या अध्यक्षपदावरुन मुक्त करण्यात आल्याची जाहीर करणयात आलं आहे. नितीन राऊत यांच्या जागी राजेश लिलोठिया यांना अध्यक्ष करण्यात आलं आहे.
मुंबई : राज्यातील काँग्रेसमध्ये (Congress) मोठ्या बदल्यांची शक्यता वर्तवली जाते आहे. नितीन राऊत (Nitin Raut) यांना काँग्रेसनं एससी सेलमधूल हटवलं आहे. एक पत्रक जारी करत त्यांना काँग्रेस एससी विभागाच्या अध्यक्षपदावरुन मुक्त करण्यात आल्याचं जाहीर करण्यात आलं आहे. नितीन राऊत यांच्या जागी राजेश लिलोठिया यांना अध्यक्ष करण्यात आलं आहे. या बदलामुळे नितीन राऊत यांच्या नावाची चर्चा ही विधानसभा अध्यक्षपदाच्या शर्यतीतही असल्याचं बोललं जातंय.
महत्त्वपूर्ण बदलांचे संकेत
काँग्रेसकडून राज्यात महत्त्वपूर्ण बदल येत्या काळात होणार असल्याचे, हे संकेत मानले जात आहेत. नितीन राऊत यांना विधानसभा अध्यक्षपद दिलं जाणार आहे की काय? अशी चर्चा या बदालमुळे ऐकायला मिळते आहे. गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्र काँग्रेसच्या मंत्रिमंडळात फेरबदलाचे संकेतही मिळत होते. त्यावर या बदलानं शिक्कामोर्तब झाल्याचं जाणकारांचं मत आहे.
राऊतांच्या नावावार शिक्कामोर्तब?
विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडीवरुन नाना पटोले यांनीही महत्त्वाचं विधान केलंय. विधानसभा अध्यक्षपदासाठी चेहरा कोण असेल, हे रविवारी संध्याकाळ पर्यंत ठरवलं जाऊ शकतं, असं नाना पटोले यांनी पत्रकारांशी बोलताना म्हटलं होतं. दरम्यान, आज ऊर्जामंत्री नितीन राऊत यांच्याकडून काँग्रेसनं एससी सेलचं अध्यक्षपद काढून घेतल्यानं आता त्यांच्यावर कोणती नवी जबाबदारी दिली जाते, हे पाहणं महत्त्वाचं आहे. सोबतच नितीन राऊतांना अध्यक्षपदावरुन मुक्त करण्यात आल्यानं महाराष्ट्र काँग्रेसमध्ये मोठ्या बदलांची दाट शक्यताही वर्तवली जाते आहे.
कधी होणार विधानसभा अध्यक्ष निवडणूक?
विधानसभा अध्यक्षपदाची निवडणुकीसाठी सोमवारी अर्ज सादर करावे लागणार आहेत. मंगळवारी विधानसभा अध्यक्षपदासाठी मतदान पार पडेल. त्यानंतर विधानसभा अध्यक्षपदी कुणाची वर्णी लागते, हे स्पष्ट होणार आहे.
पाहा काय म्हणाले नाना पटोले?
इतर बातम्या –
Satara | ‘काय बाई सांगू?’, उदयनराजेंचा सवाल, ‘एकदाचं सांगूनच टाका’, शिवेंद्रराजेंचा जवाब!