Navi Mumbai मध्ये जबाबदारी नाईकांवर सोपवण्याची शक्यता, गणेश नाईक विरुद्ध मंदा म्हात्रे संघर्ष सुरू

चार राज्यात भाजपचा (BJP) विजय झाला आहे. त्यामुळे भाजपच्या नेत्यांमध्ये कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह निर्माण झाला आहे. आगामी राज्यातील महानगरपालिका (Municipal Corporation) जिल्हा परिषद यावर भाजपने लक्ष केंद्रित केलं आहे. महापालिका निवडणुकांसाठी भाजपनं कंबर कसली आहे. मुंबई, ठाणे, नवी मुंबई पुण्यासह बहुतेक सर्वच प्रमुख महापालिकांबाबत रणनीती ठरवली आहे.

Navi Mumbai मध्ये जबाबदारी नाईकांवर सोपवण्याची शक्यता, गणेश नाईक विरुद्ध  मंदा म्हात्रे संघर्ष सुरू
गणेश नाईक विरुद्ध मंदा म्हात्रे संघर्ष सुरूImage Credit source: twitter
Follow us
| Updated on: Apr 04, 2022 | 7:03 PM

नवी मुंबई – चार राज्यात भाजपचा (BJP) विजय झाला आहे. त्यामुळे भाजपच्या नेत्यांमध्ये कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह निर्माण झाला आहे. आगामी राज्यातील महानगरपालिका (Municipal Corporation) जिल्हा परिषद यावर भाजपने लक्ष केंद्रित केलं आहे. महापालिका निवडणुकांसाठी भाजपनं कंबर कसली आहे. मुंबई, ठाणे, नवी मुंबई पुण्यासह बहुतेक सर्वच प्रमुख महापालिकांबाबत रणनीती ठरवली आहे. महापालिकानिहाय जबाबदाऱ्यांचे वाटपही करण्यात आले आहे. मात्र नवी मुंबई (Navi Mumbai) महानगरपालिकाची जबाबदारीची घोषणा करण्यात आली नाही. नवी मुंबई महानगरपालिकेची जबाबदारी आशिष शेलार यांच्याकडे देण्यात आली होती. मात्र मुंबईत सत्ता मिळवण्याची जबाबदारी आमदार आशिष शेलार यांच्यावर सोपवण्यात आल्यामुळे नवी मुंबई महानगरपालिका जबाबदारी माजी मंत्री आमदार गणेश नाईक यांच्यावर सोपवण्यात येणार असल्याची माहिती भाजपच्या सूत्रांनी दिली आहे. नवी मुंबई भाजपात आमदार गणेश नाईक विरुद्ध आमदार मंदा म्हात्रे असा संघर्ष सुरू आहे. आमदार मंदा म्हात्रे यांच्याकडे नवी मुंबई महानगरपालिका दृष्टीने वेगळी जबाबदारी मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

गणेश नाईक विरुद्ध मंदा म्हात्रे संघर्ष सुरू

बेलापूर मतदारसंघातील आमदार मंदा म्हात्रे यांनी महिलांना पक्ष संघटनेत सन्मानाची वागणूक दिली जात नाही. महिलांना ओळख मिळवण्यासाठी संघर्ष करावा लागतो अशी खदखद त्यांनी व्यक्त केली होती. त्याचबरोबर 2014 आणि 2019 मध्ये बेलापूरमधून निवडणूक जिंकल्यानंतरही पक्षाने त्यांना बाजूला केल्याचा आरोप त्यांनी व्यक्त केला होता. म्हात्रे यांच्या टीकेमुळे भाजपमध्ये खळबळ उडाली होती. नुकत्याच पक्षात प्रवेश केलेल्या नेत्यांना अधिक महत्त्व दिलं जात असल्याचं देखील त्यांनी म्हणटलं होतं. म्हात्रे यांनी माजी मंत्री आणि भाजप नेते गणेश नाईक यांचे थेट नाव न घेता टीका केली होती.

मला 30 वर्षांचा अनुभव आहे

राजकारणात आणि सामाजिक कार्यात महिलांना स्वत:ला प्रस्थापित करण्यासाठी आणि त्यांच्या कामाची पोचपावती मिळवण्यासाठी संघर्ष करावा लागतो. मला 30 वर्षांचा अनुभव आहे. माझे धाडस आणि काम करण्याची भावना मतदार आणि सर्वसामान्य नागरिकांकडून दखल घेतली जाते, जे माझ्या कामाचे कौतुक करतात. मात्र, जेव्हा एखाद्या महिला कार्यकर्त्याला तिच्या चांगल्या कामाची ओळख मिळते. तेव्हा पक्षातील प्रस्थापित नेत्यांना असुरक्षित वाटायला सुरूवात होते. त्यामुळे ते अशा कार्यकर्त्यांना बाजूला करून त्यांचे पंख छाटण्याचा प्रयत्न करतात अशी टीका देखील त्यांनी केली होती.

Maharashtra Cabinet : राज्याच्या मंत्रिमंडळात चालू महिन्यातच मोठे फेरबदल? ठाकरे, पवारांमध्ये महत्वाची बैठक होणार- सूत्र

Mumbai School Bus: स्कूल बसमधून मुलं घरी वेळेत न आल्यानं पालक धास्तावले! सांताक्रूझमध्ये नेमकं काय घडलं?

Ichalkaranji Crime : शाळेत अपमानास्पद वागणूक मिळत असल्याने विद्यार्थ्याची आत्महत्या, संतप्त पालकांकडून शाळेवर दगडफेक

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.