Deepak Kesarkar : एकनाथ शिंदेंना नेतेपदावरून हटवणं बेकायदेशीर, कोर्टात आव्हान देणार; दीपक केसरकरांची माहिती

शिवसेनेने आक्रमक भूमिका घेतल्यानंतर पुढे काय केले जाणार याची माहिती शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी दिली आहे.

Deepak Kesarkar : एकनाथ शिंदेंना नेतेपदावरून हटवणं बेकायदेशीर, कोर्टात आव्हान देणार; दीपक केसरकरांची माहिती
एकनाथ शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर
Follow us
| Updated on: Jul 02, 2022 | 1:42 PM

मुंबई :  (Eknath Shinde) एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर देखील शिवसेना आणि त्यांच्यातील मतभेद हे कायम आहेत. (Shivsena) शिवसेनेने एकनाथ शिंदे यांना पक्षनेते पदावरुन हटविल्यानंतर आता शिंदे गटानेही जशाच तसे उत्तर देण्याचा निर्धार केला आहे. ज्यापध्दतीने पक्षाने पत्र पाठविले आहे त्याला तर उत्तर दिले जाणार आहेच पण जरी कारवाई मागे घेतली नाही तर मात्र, कायदेशीर लढाई लढवावी लागणार असल्याचे प्रवक्ते (Deepak Kesarkar) दीपक केसरकर यांनी सांगितले आहे. त्यामुळे शिंदे गट आणि शिवसेना यांच्यातील मतभेद हे आता कोर्टाच्या पायरीपर्यंत जाणार का असा सवाल उपस्थित होत आहे. शिवसेनेने आक्रमक भूमिका घेतल्यानंतर पुढे काय केले जाणार याची माहिती शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी दिली आहे.

लोकशाहीला न शोभणारे कृत्य

एकनाथ शिंदे हे आता राज्याच्या मुख्यमंत्री पदावर आहेत. हे पद सभागृहातील सर्वोच्च पद आहे. शिवाय या पदाला लोकशाहीत एक वेगळे महत्व आहे. यापूर्वी गटनेते पदावरुन त्यांना काढण्याचा प्रयत्न झाला त्याबाबतही आव्हान देण्यात आले आहे. असे असताना शिवसेनेकडून याबाबत लवकर सुनावणी व्हावी म्हणून याचिका दाखल केली होती. पण कोर्टाने ती याचिका फेटाळली आहे. त्यावर 11 जुलै रोजी सुनावणी तर होईलच पण अशा पध्दतीने गटनेते पदावरुन काढून टाकणे हे लोकशाहीला शोभणारे नसल्याचे केसरकर यांनी सांगितले आहे.

अन्यथा पुढचे मार्ग मोकळेच

एकनाथ शिंदे यांच्यावर गेल्या काही दिवसांपर्यंत कारवाई करण्यात आलेली नव्हती पण शुक्रवारी संध्याकाळी त्यांना पक्षनेते पदावरुन काढून टाकण्यात आले आहे. त्यामुळे अशा पध्दतीने कारवाईच करता येत नसल्याचे मत शिंदे गटाकडून व्यक्त करण्यात आले आहे. या संदर्भात पक्षाकडून पत्र पाठविण्यात आले असले तरी त्याला उत्तर दिले जाणार आहे. एवढे करुनही त्यांनी निर्णयापासून माघार घेतली नाहीतर मात्र, कायदेशीर लढाई होणार असल्याचे केसरकर म्हणाले आहेत. शिवाय एकनाथ शिंदे हे आता सभागृहाचे सर्वोच्च नेते आहेत. त्यांच्या पदाचा तरी मान राखणे गरजेचे आहे. त्यामुळे शिवसेनेच्या कारवाईनंतर आता शिंदे गटाने आपली भूमिका स्पष्ट केली आहे. पत्राच्या उत्तरानंतर शिवसेना काय पावले उचलती हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

हे सुद्धा वाचा

पक्षात राहण्यासाठी प्रेमाचे बंधन ठेवा

शिवसेनेतील पदाधिकारी तसेच नेते यांना आता पक्षाशी आणि पक्षप्रमुख यांच्याशी एकनिष्ठ असल्याचे प्रतिज्ञापत्र द्यावे लागणार आहे. यावरुनही शिंदे गटाने बोचरी टिका केली आहे. बळजबरीने पक्षामध्ये ठेवता येत नाही. प्रतिज्ञापत्र ठिक आहे पण याचा अर्थ पदाधिकाऱ्यांना पक्ष सोडताच येणार नाही असे होत नाही. पक्षात राहण्याच्या अशा सक्तीपेक्षा प्रेमाचे संबंध गरजेचे असल्याचे म्हणत केसरकर यांनी बोचरी टिका केली आहे.

धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर
धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर.
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला.
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी.
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं.
'निवडणुकीनंतर माज आलाय, पुढे पुन्हा अशी घटना घडली तर...'
'निवडणुकीनंतर माज आलाय, पुढे पुन्हा अशी घटना घडली तर...'.
सकाळी 9.30ला ते दोघे आले, फोटो काढून गेले, राऊतांच्या बंगल्याची रेकी
सकाळी 9.30ला ते दोघे आले, फोटो काढून गेले, राऊतांच्या बंगल्याची रेकी.
D फॉर डॉन अन् तो मंत्रिमंडळात? जितेंद्र आव्हाडांनी दिली हिंट
D फॉर डॉन अन् तो मंत्रिमंडळात? जितेंद्र आव्हाडांनी दिली हिंट.
'हुशार्‍या मारू नका, अडीच वर्षांनंतर..'; सत्तारांचा विरोधकांना इशारा
'हुशार्‍या मारू नका, अडीच वर्षांनंतर..'; सत्तारांचा विरोधकांना इशारा.
शरद पवारांचे 'हे' दोन नेते दादांच्या भेटीला, राजकारणात भूकंप होणार?
शरद पवारांचे 'हे' दोन नेते दादांच्या भेटीला, राजकारणात भूकंप होणार?.
कल्याणात मराठी कुटुंबाला मारहाण,मनसे दिला इशारा,'येत्या २४ तासात जर..'
कल्याणात मराठी कुटुंबाला मारहाण,मनसे दिला इशारा,'येत्या २४ तासात जर..'.