Eknath Shinde vs Shiv Sena : विलीनिकरण हाच शिंदे गटाकडे पर्याय, पक्षांतरबंदी कायदा डोक्यावर घेतला जातोय; सिंघवी यांचा दावा
Eknath Shinde vs Shiv Sena : शिंदे गटच खरा पक्ष असल्याचं निवडणूक आयोगाकडून जाहीर करून सगळी प्रक्रिया ही कायदेशीर करण्याचा प्रयत्न करत आहेत. शिंदे गटाने निवडणूक आयोगाकडे धाव घेऊन आपणच मूळ शिवसेना असल्याचा दावा केला आहे.
नवी दिल्ली: सर्वोच्च न्यायालयात (supreme court) महाराष्ट्रातील सत्ता संघर्षावर युक्तिवाद सुरू आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (cm eknath shinde) आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (uddhav thackeray) यांच्या वकिलांनी प्रभावी युक्तिवाद करणअयास सुरुवात केली आहे. दोन्ही वकिलांनी एकमेकांचे युक्तिवाद खोडून काढत नवे युक्तिवाद करण्यास सुरुवात केली आहे. शिवसेनेचे वकील अभिषेक मनु सिंघवी यांनीही कोर्टात प्रभावी आणि परिणामकारक मुद्दे मांडले आहेत. शिंदे गटाकडे विलिनीरण हा एकमेव बचाव त्यांच्यासाठी उपलब्ध आहे. विशेष म्हणजे त्यावर ते दावा करत नाहीत, असं सांगतानाच पक्षांतर बंदी कायदा डोक्यावर घेतला जात आहे, असं अभिषेक मनु सिंघवी यांनी म्हटलं आहे. सर्व बंडखोर अपात्र ठरले तर सरकारने घेतलेले सर्व निर्णय बेकायदेशीर ठरतील, असंही शिवसेनेच्या वकिलाने कोर्टाच्या निदर्शनास आणून दिलं आहे.
शिंदे गटच खरा पक्ष असल्याचं निवडणूक आयोगाकडून जाहीर करून सगळी प्रक्रिया ही कायदेशीर करण्याचा प्रयत्न करत आहेत. शिंदे गटाने निवडणूक आयोगाकडे धाव घेऊन आपणच मूळ शिवसेना असल्याचा दावा केला आहे. तसेच या सर्व गोष्टी कायदेशीर करण्याचाही त्यांचा प्रयत्न आहे, असं सांगतानाच महाराष्ट्र सरकार चालवणे हाच गेम प्लान नाही तर निवडणूक आयोगाकडून आदेश मिळवून वर्तमान कार्यवाही विलंबाने करण्याचा प्रयत्न सुरू आहे, असं अभिषेक मनु सिंघवी यांनी म्हटलं आहे.
सभापती निर्णय घेत नाहीत
21 जूनपासून प्रलंबित असलेल्या आमच्या तक्रारींवर सभापतींनी काहीच केल नाही. परंतु सभापती त्यांच्या तक्रारींवर तत्परतेने कारवाई करतात, असंही सिंघवी यांनी कोर्टाच्या निदर्शनास आणून दिलं.
म्हणून कोर्टात आलो
दरम्यान, यावेळी नीरज कौल यांनीही जोरदार युक्तिवाद केला. आम्ही उच्च न्यायालयात न जाता थेट सुप्रीम कोर्टात आलो. कारण त्यामागे धमकीचा मुद्दा होता, असे नीरज कौल यांनी कोर्टाच्या निदर्शनास आणून दिलं. तुम्ही थेट सुप्रीम कोर्टात का आलात असा सवाल न्यायालयाने निरज कौल यांना केला होता. यावर निरज कौल यांनी हे उत्तर दिले
ठाकरेच पक्षप्रमुख
तर, शिवसेनेचे वकील कपिल सिब्बल यांनीही जोरदार दावा केला. उद्धव ठाकरे हेच शिवसेनेचे पक्षप्रमुख आहेत. शिंदे गटही तसे मानतो. त्यांच्या याचिकेतही तसा उल्लेख आहे. त्यामुळे शिंदे सरकारच्या सर्व हालचाली बेकायदेशीर ठरतात, असं कपिल सिब्बल यांनी म्हटलं आहे.