Sanjay Raut : तर मुंबई पोलीसांना कठोर ॲक्शन घ्यावी लागेल, संजय राऊतांची पोलीसी खाक्याची भाषा, 9 आमदारांच्या कुटुंबियांनी तक्रार केल्याचा दावा

Sanjay Raut : अनेक आमदारांच्या कुटुंबीयांनी तक्रार केली. अकोल्याचे आमदार नितीश देशमुख यांच्या पत्नीने तक्रार केली आहे. देशमुख यांचं अपहरण करण्यात आलं. त्यांना जबरदस्तीने सुरतला नेण्यात आल्याचं त्यांच्या पत्नीने म्हटलं आहे.

Sanjay Raut : तर मुंबई पोलीसांना कठोर ॲक्शन घ्यावी लागेल, संजय राऊतांची पोलीसी खाक्याची भाषा, 9 आमदारांच्या कुटुंबियांनी तक्रार केल्याचा दावा
तर मुंबई पोलीसांना कठोर ॲक्शन घ्यावी लागेल, संजय राऊतांची पोलीसी खाक्याची भाषाImage Credit source: ani
Follow us
| Updated on: Jun 21, 2022 | 3:59 PM

मुंबई: शिवसेना नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यासोबत काही आमदारांना जबरदस्तीने गुजरातला नेण्यात आले आहे. या आमदारांवर हल्लाही करण्यात आला आहे. या आमदारांचा खून होऊ शकतो, असं सांगतानाच काही आमदारांचं अपहरण करण्यात आलं आहे. अकोल्यातील एका आमदाराच्या पत्नीनेही तसं सांगितलं आहे. एकूण नऊ आमदारांच्या कुटुंबीयांनी याबाबतची तक्रार केली आहे. या आमदारांनी परत यावं. नाही तर अशा प्रकरणात पोलिसांना कठोर ॲक्शन घ्यावी लागेल, असा इशारा शिवसेना नेते संजय राऊत (sanjay raut) यांनी दिला. तसेच एकनाथ शिंदे यांची गटनेतपदावरून हकालपट्टी करण्याता आल्याची माहितीही त्यांनी दिली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी आमदारांची वर्षावर बैठक बोलावली होती. या बैठकीला संजय राऊतही उपस्थित होते. यावेळी त्यांनी मीडियाशी संवाद साधत ही हा इशारा दिला.

अनेक आमदारांच्या कुटुंबीयांनी तक्रार केली. अकोल्याचे आमदार नितीश देशमुख यांच्या पत्नीने तक्रार केली आहे. देशमुख यांचं अपहरण करण्यात आलं. त्यांना जबरदस्तीने सुरतला नेण्यात आल्याचं त्यांच्या पत्नीने म्हटलं आहे. त्यांच्या जीवाला धोका आहे असं त्यांनी म्हटलं आहे. आतापर्यंत नऊ आमदारांच्या कुटुंबीयांनी तक्रार केली आहे. हे असच सुरू राहिलं तर मुंबई पोलिसांना या संदर्भात कठोर अॅक्शन घ्यावी लागेल, असं राऊत म्हणाले.

हे सुद्धा वाचा

शिवसेनेच्या शिस्तीत बसत नाही

शिंदे आमचे मित्रं आहेत. सहकारी आहेत. आम्ही अनेक वर्षापासून काम करत आहोत. त्यांच्या मनात काही गैरसमज झाले असतील तर ते दूर होऊ शकतात. शिवसेना हा एक परिवार आहे. त्यांना आवाहन केलं. तुम्ही मुंबईला या आणि चर्चा करू. तिथे जाऊन चर्चा करणं शिवसेनेच्या शिस्तीत बसत नाही, असंही त्यांनी सांगितलं.

आमदारांनी हित पाहावं

अजून हे सरकार अडीच वर्ष ठामपणे चालेल. कुणालाही पोटनिवडणूक नको आहे. कुणी जर पोटनिवडणूक लादण्याचं काम करत असेल तर यात आमदारांचं नुकसान आहे. आमदार घाबरले आहेत. पोटनिवडणुका लादू नका असं आमदारांचं म्हणणं आहे. त्यामुळे आमदारांनी त्यांचं हित पाहावं आणि निर्णय घ्यावा, असा सूचक इशाराही त्यांनी दिला.

प्रस्तावाला स्थान नाही

शिवसेनेत कोणताही प्रस्ताव चालत नाही. प्रस्तावाला स्थान नाही. शिवसेनेच्या शिस्तीत बसत नाही, असं सांगतानाच अजय चौधरी यांची विधीमंडळ गटनेतेपदी निवड झाली आहे. एकमताने हा निर्णय घेतला आहे, असं त्यांनी सांगितलं. देशभरातील नेत्यांनी आम्हाला फोन केला. सरकार टिकवू म्हणून सांगितलं. भाजपचं कारस्थान उधळून लावू असं या नेत्यांनी म्हटलं आहे, असंही त्यांनी सांगितलं.

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.