MLC Election| हा तर नाना पटोलेंचा पराभव, विधान परिषदेच्या विजयानंतर बावनकुळेंचा टोला, काँग्रेसनं घोडेबाजार केल्याचाही आरोप

विधानपरिषदेच्या नागपूर जागेवरच्या निवडणुकीत (Maharashtra Vidhan Parishad Election Result) अखेर भाजपच्या चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी बाजी मारली आहे.

MLC Election| हा तर नाना पटोलेंचा पराभव, विधान परिषदेच्या विजयानंतर बावनकुळेंचा टोला, काँग्रेसनं घोडेबाजार केल्याचाही आरोप
चंद्रशेखर बावनकुळे आणि नाना पटोले.
Follow us
| Updated on: Dec 14, 2021 | 10:40 AM

नागपूरः राज्यभर बहुचर्चित असलेल्या आणि आरोप-प्रत्यारोपाने गाजणाऱ्या विधानपरिषदेच्या नागपूर जागेवरच्या निवडणुकीत (Maharashtra Vidhan Parishad Election Result) अखेर भाजपच्या चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी बाजी मारली आहे. आज झालेला आपला विजय हा नाना पटोलेंचा पराभव आहे. या निवडणुकीत काँग्रेसनं घोडेबाजार केला आहे, असा आरोप त्यांनी विजयानंतर प्रतिक्रिया देताना व्यक्त केला. यावेळी त्यांनी काँग्रेसवर जोरदार टीका केली.

असा लागला निकाल?

विधानपरिषदेच्या नागपूर आणि अकोला वाशिम बुलडाणा स्थानिक स्वराज संस्था मतदारसंघातील निवडणुकीची आज मतमोजणी पार पडली आहे. निवडणूक आयोगाने सहा जागांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर केला होता. त्यापैकी चार जागा बिनविरोध पार पडल्या, तर नागपूर आणि अकोला वाशिम बुलडाणा स्थानिक स्वराज संस्था मतदारसंघामध्ये निवडणूक लागली होती. अकोला वाशिम बुलडाणा मतदारसंघात शिवसेनेचे गोपिकिशन बाजोरिया आणि भाजपचे वसंत खंडेलवाल यांच्यात चुरशीची लढत झाली. यामध्ये भाजपच्या उमदेवाराचा विजय झाला. तर नागपूरमध्ये भाजपकडून चंद्रशेखर बावनकुळे विजयी झाले आहेत. छोटू भोयर यांच्या जागेवर काँग्रेसने पाठिंबा दिलेले अपक्ष उमेदवार मंगेश देशमुख पराभूत झाले आहेत.

बावनकुळे आक्रमक

विधानपरिषद निवडणुकीत विजय मिळवल्यानंतर चंद्रशेखर बावनकुळे आक्रमक झाले आहेत. त्यांनी यावेळी काँग्रेसवर सडकून टीका केली. ते म्हणाले, आपण आज मिळवलेला विजय हा नाना पटोले यांचा पराभव आहे. या निवडणुकीत काँग्रेसने घोडेबाजार केला. मला 362 मते मिळाली. त्यात 44 मते जास्त पडली. मी सर्वांचे आभार मानतो, अशी प्रतिक्रियाही त्यांनी यावेळी व्यक्त केली.

नानांची मोगलाई

चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, माझा विजय हा नाना पटोले यांचा पराभव आहे. या निवडणुकीत त्यांनी आणि महाविकास आघाडीने पैशांचा अक्षरशः घोडेबाजार मांडला होता. त्यांनी पदाचा गैरवापर केला. नाना पटोले यांच्या मोगलाईमुळेच काँग्रेसचा पराभव झाला आहे, अशी जोरदार टीका त्यांनी यावेळी केली. बावनकुळे पुढे म्हणाले की, मी पक्षाचे दहा वर्षे काम केले आहे. माझ्यावर कोणताही अन्याय झाला नाही. काँग्रेसच्या अंतर्गत वादामुळे त्यांचा पराभव झाला. काँग्रेसच्या हुकमशाही काँग्रेसचा पराभव झाला, अशी टीकाही त्यांनी यावेळी केली.

इतर बातम्याः

Akola MLC Election Result: अकोल्यातून शिवसेनेचे गोपिकिशन बाजोरिया पराभूत, भाजपचे वंसत खंडेलवाल विजयी

Nashik | 6 नगरपंचायत निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीत फाटाफूट; 311 उमेदवार रिंगणात

जॅकलीनच्या मैत्रीसाठी अमित शहांचा ‘कॉल स्पूफ’; 9 लाखांचे मांजर दिले, थापड्या सुकेशच्या उठाठेवी

छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?.
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.