RSS : अहंकाऱ्यांना 241 वर रोखलं हाच रामाचा न्याय, RSS नेत्याच भाजपा विरोधात खूप मोठं विधान
RSS : लोकसभा निवडणूक सुरु असताना आणि निकालानंतर राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपा यांचं नात चर्चेचा विषय ठरलं होतं. भाजपाला आता आरएसएसची गरज नाही अशी टीका विरोधी पक्षांकडून केली जाते. देशात भाजपाच्या विस्तारात संघाच मोठ योगदान आहे. आता आरएसएसमधूनच भाजपा बाबत असं विधान आल्याने अनेकांच्या भुवया उंचावण स्वाभाविक आहे.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे नेते इंद्रेश कुमार यांनी लोकसभा निवडणूक निकालासंदर्भात मोठ वक्तव्य केलं आहे. त्यांनी सत्तारुढ भाजपाला अहंकारी म्हटलं आहे. त्याचवेळी विरोधी पक्षात असलेल्या इंडिया ब्लॉकला ‘राम विरोधी’ ठरवलं आहे. राम सगळ्यांसोबत न्याय करतो, असं इंद्रेश कुमार म्हणाले. “2024 लोकसभा निवडणुकीचे निकाल पाहा. ज्यांनी रामाची भक्ती केली, त्यांच्यात हळू-हळू अहंकार आला. तो सर्वात मोठा पक्ष ठरला. पण, त्यांना जो पूर्ण हक्क मिळायाला पाहिजे होता, जी शक्ती मिळायला पाहिजे होती, प्रभू रामाने अहंकारामुळे रोखली” असं इंद्रेश कुमार म्हणाले.
“ज्यांनी रामाचा विरोध केला, त्यांना अजिबात शक्ती मिळाली नाही. त्यांच्यापैकी कोणालाही शक्ती मिळाली नाही. ते सगळे मिळूनही नंबर-1 बनू शकले नाहीत. नंबर-2 वर समाधान मानाव लागलं. प्रभुचा न्याय विचित्र नाहीय. सत्य, आनंददायी आहे” असं आरएसएसचे नेते इंद्रेश कुमार म्हणाले. गुरुवारी इंद्रेश कुमार जयपूर जवळ कानोता येथे में ‘रामरथ अयोध्या यात्रा दर्शन पूजन समारंभ’ कार्यक्रमात बोलत होते. इंद्रेश कुमार आरएसएसचे राष्ट्रीय कार्यकारी सदस्य सुद्धा आहेत. त्यांनी आपल्या विधानांमध्ये कुठल्याही पक्षाच नाव घेतलं नाही. त्यांचा सत्ताधारी आणि विरोधक दोघांकडे स्पष्ट इशारा होता.
‘ती ताकद रामाने अहंकारामुळे रोखली’
“ज्या पक्षाने रामाची भक्ती केली, पण अहंकारी झाले, त्यांना 241 वर रोखलं. पण तो सर्वात मोठा पक्ष ठरला. त्यांनी स्पष्टपणे इंडिया ब्लॉकचा उल्लेख करताना म्हटलं की, ज्यांना रामावर कुठलाही विश्वास नाहीय, त्यांना 234 वर रोखलं. ज्यांनी रामाची भक्ती केली, पण हळूहळू अहंकारी झाले, ते सर्वात मोठा पक्ष ठरले. मतांच्या रुपाने जी ताकद मिळायला पाहिजे होती, ती रामाने अहंकारामुळे रोखली” असं इंद्रेश कुमार म्हणाले.
‘त्यांनी विनम्र असलं पाहिजे’
“ज्यांनी रामाचा विरोध केला, त्यांच्यापैकी कोणालाही सत्ता मिळाली नाही. त्या सगळ्यांना एकत्र मिळून नंबर दोन बनवलं. प्रभू रामाचा न्याय सत्य आणि आनंददायक आहे. जे लोक रामाची पूजा करतात, त्यांनी विनम्र असलं पाहिजे आणि जे रामाला विरोध करतात, प्रभू राम स्वत: तो विषय हाताळतात” असं इंद्रेश कुमार म्हणाले.