‘ठाकरे’च्या स्क्रीनिंगवेळी अपमान, अभिजीत पानसेंच्या समर्थनार्थ मनसेचे तीन नेते मैदानात

मुंबई : शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या आयुष्यावर आधारित ठाकरे सिनेमाचं मुंबईत स्पेशल स्क्रीनिंग झालं. पण या स्क्रीनिंगमध्ये मानापमान नाट्य पाहायला मिळालं. सिनेमाचे दिग्दर्शक अभिजित पानसे यांच्या कुटुंबीयांना जागा न मिळाल्याने पानसे स्क्रीनिंग सोडून निघून गेले. त्यानंतर सोशल मीडियावर मनसे कार्यकर्त्यांनी #ISupportAbhijitPanse नावाने मोहीम सुरु केली आहे. मनसेच्या तीन आक्रमक नेत्यांनीही अभिजीत पानसेंच्या समर्थनासाठी मैदानात […]

'ठाकरे'च्या स्क्रीनिंगवेळी अपमान, अभिजीत पानसेंच्या समर्थनार्थ मनसेचे तीन नेते मैदानात
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 4:35 PM

मुंबई : शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या आयुष्यावर आधारित ठाकरे सिनेमाचं मुंबईत स्पेशल स्क्रीनिंग झालं. पण या स्क्रीनिंगमध्ये मानापमान नाट्य पाहायला मिळालं. सिनेमाचे दिग्दर्शक अभिजित पानसे यांच्या कुटुंबीयांना जागा न मिळाल्याने पानसे स्क्रीनिंग सोडून निघून गेले. त्यानंतर सोशल मीडियावर मनसे कार्यकर्त्यांनी #ISupportAbhijitPanse नावाने मोहीम सुरु केली आहे. मनसेच्या तीन आक्रमक नेत्यांनीही अभिजीत पानसेंच्या समर्थनासाठी मैदानात उतरले आहेत. संदीप देशपांडे, अमेय खोपकर आणि अविनाश जाधव यांनी ट्विटरवरुन अभिजीत पानसे यांना समर्थन देऊन, शिवसेनेवर शरसंधान साधले आहे.

मनसे नेते संदीप देशपांडे :

मनसेच्या चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर :

ठाणे-पालघरमधील मनसेचे नेते अविनाश जाधव :

सोशल मीडियावर मनसेच्या नेत्यांसह कार्यकर्त्यांनी #ISupportAbhijitPanse नावाची मोहीमही सुरु केली आहे. त्यावरुन मनसे कार्यकर्ते अभिजीत पानसेंचं समर्थन करण्यासह शिवसेनेवर टीकाही करत आहेत. त्यामुळे या सिनेमामुळे हे दोन पक्ष अधिक जवळ येण्याची शक्यता वर्तवण्यात येत असताना, दुरावाच अधिक निर्माम होताना दिसतोय.

अभिजित पानसे स्क्रीनिंग सोडून माघारी

मुंबईत होणाऱ्या या स्पेशल स्क्रीनिंगसाठी दिग्गज नेते आणि इतर मान्यवरांना निमंत्रण देण्यात आलेलं आहे. पण स्वतः दिग्दर्शकच नाराज झाल्यामुळे कुजबुज पाहायला मिळाली. अभिजित पानसे यांना सर्वात पुढचं सीट दिल्यामुळे ते नाराज झाल्याचं बोललं जातंय. संजय राऊत यांनी पानसेंची समजूत काढण्याचाही प्रयत्न केला. पण यात त्यांना यश आलं नाही. पानसे कुटुंबासह घरी निघून गेले. अभिजित पानसे यांनी या सिनेमाचं दिग्दर्शन केलं आहे, तर संजय राऊत यांनी सिनेमाची निर्मिती केली आहे.

खरं तर अभिजित पानसे हे दिग्दर्शक असण्यासोबतच मनसेचे नेतेही आहेत. मनसे आणि शिवसेनेचा छत्तीसचा आकडा आहे. पण सिनेमासाठी संजय राऊत यांनी अभिजित पानसेंसारख्या अनुभवी आणि कुशल दिग्दर्शकाची निवड केली होती. या सिनेमासाठी मनसेने अभिजित पानसेंना पोस्टरबाजी करत शुभेच्छा दिल्या आहेत. विशेष म्हणजे या पोस्टरवर कुठेही संजय राऊत यांचं नाव किंवा फोटो नाही.

कोण आहेत अभिजित पानसे?

अभिजित पानसे हे प्रसिद्ध सिनेलेखक आणि दिग्दर्शक आहेत. 2014 मध्ये आलेला रेगे हा मराठी सिनेमा प्रचंड गाजला होता. रेगे हे अभिजित पानसे यांचं मोठं यश असल्याचं मानलं जातं. ठाकरे सिनेमासाठीही संजय राऊत यांनी अभिजित पानसे यांची निवड केली.

वाचा – ठाकरे सिनेमाचे दिग्दर्शक स्क्रीनिंग अर्ध्यावर सोडून निघून गेले

अभिजित पानसे सिनेमाव्यतिरिक्त राजकारणातही सक्रिय असतात. पानसे यांनी चित्रपट सेनेची जबाबदारी सांभाळलेली आहे. राज ठाकरेंच्या जवळचे नेते म्हणून ते परिचित आहेत. अगोदर शिवसेनेत असलेले अभिजित पानसे नंतर मनसेत आले होते. त्यांनी 2014 ची लोकसभा निवडणूकही लढली होती.

वाचा – ... म्हणून अभिजित पानसे स्क्रीनिंग अर्ध्यावर सोडून निघून गेले

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.