Sharad Pawar : मतदानाचे तीन टप्पे होताच शरद पवारांच इंडिया आघाडीच्या पंतप्रधान उमेदवाराबद्दल भाष्य

Sharad Pawar : शरद पवार सध्या इंडिया आघाडीमध्ये आहेत. या आघाडीने नरेंद्र मोदींसमोर पंतप्रधानपदाचा उमेदवार जाहीर केलेला नाही. देशात तीन टप्प्यांच मतदान झालय. या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर शरद पवार यांनी पंतप्रधानपदाबद्दल महत्त्वपूर्ण भाष्य केलं आहे. 1977 साली जनता पार्टीच सरकार सत्तेवर आलं, त्यावेळ सारखी स्थिती असल्याच पवार म्हणाले.

Sharad Pawar : मतदानाचे तीन टप्पे होताच शरद पवारांच इंडिया आघाडीच्या पंतप्रधान उमेदवाराबद्दल भाष्य
शरद पवारImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: May 08, 2024 | 11:23 AM

सध्या देशात लोकसभा निवडणुकीचा कार्यक्रम सुरु आहे. आतापर्यंत तीन टप्प्याच मतदान पार पडलय. अजून चार टप्पे बाकी आहेत. भाजपाप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडी विरुद्ध काँग्रेस प्रणीत इंडिया आघाडी असा सामना आहे. नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान बनण्यापासून रोखण्यासाठी इंडिया आघाडी स्थापन झालीय. सुरुवातीला इंडिया आघाडीत अनेक पक्ष होते. पण निवडणुका जवळ आल्यानंतर जनता दल युनायटेड आणि तृणमुल काँग्रेस सारखे मोठे पक्ष इंडिया आघाडीतून बाहेर पडले. राजकीय हवा बदलल्यानंतर हे पक्ष इंडिया आघाडीत पुन्हा सामील होऊ शकतात. सध्या पंतप्रधान मोदींना अश्वमेध रोखणं हेच इंडिया आघाडीसमोरच लक्ष्य आहे. NDA आघाडीकडून नरेंद्र मोदीच पंतप्रधानपदाचे उमेदवार आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढवली जात आहे. इंडिया आघाडीमध्ये मात्र पंतप्रधानपदाचा उमेदवार ठरलेला नाही. इंडियन एक्सप्रेसला त्यांनी मुलाखत दिली.

इंडिया आघाडीकडून पंतप्रधानपदासाठी वेगवेगळ्या नावांची चर्चा होते. काँग्रेसचे अध्यक्ष असलेले मल्लिकार्जुन खर्गे यांचं नाव पंतप्रधानपदाठी पुढे आलेलं. त्यानंतर ही चर्चा थांबली. आता इंडिया आघाडीत असलेले दिग्गज नेते शरद पवार यांनी प्रथमच पंतप्रधानपदाबद्दल अप्रत्यक्ष भाष्य केलं आहे. शरद पवार म्हणाले की, “1977 च्या जवळपास जाणारी स्थिती आहे. त्यावेळी जनता पार्टी स्थापन झालेली. लोकसभेच्या निवडणुका जाहीर झाल्यानंतर काँग्रेस विरोधी पक्ष एकत्र आले होते व त्यांनी जनता पार्टीची स्थापना केलेली पुढे त्यांनी देशात सरकारही बनवलं” त्यावेळी सुद्धा आतासारखच पंतप्रधानपदाचा उमेदवार विरोधी पक्षांनी ठरवलेला नव्हता. जनता पार्टीमध्ये विलीन झालेल्या विविध पक्षीय खासदारांशी बोलल्यानंतर जयप्रकाश नारायण आणि जेबी क्रिपालानी यांनी मोरारजी देसाई यांचं नाव पंतप्रधान म्हणून जाहीर केलं होतं.

इंडिया आघाडीत पंतप्रधान पदाबद्दल शरद पवार काय बोलले?

“1977 साली मोरारजी देसाई यांना जी मान्यता होती, त्यापेक्षा आज राहुल गांधी यांची स्वीकृती जास्त आहे” असं शरद पवार म्हणाले. ठस्वत:च्या पक्षात त्यांना भक्कम समर्थन आहे. आम्हा प्रादेशिक पक्षासोबत राहुल गांधींनी चांगला संवाद ठेवलाय” असही पवार म्हणाले. राहुल गांधींनी मला कॉल केला होता, तेव्हा अनेक महत्त्वाच्या मुद्यांवर आम्ही गंभीर चर्चा केल्याच शरद पवार म्हणाले. मोरारजी देसाई यांची अशी कार्यपद्धती नव्हती असं पवार म्हणाले. शरद पवार यांनी राहुल गांधींच भरभरुन कौतुक केलय. पंतप्रधानपदाचे दाखले देऊन अप्रत्यक्षपणे शरद पवारांनी पंतप्रधानपदासाठी राहुल गांधींच समर्थन केलय.

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.