Shiv sena | शिवसेनेच्या पंतप्रधानापासून भाजपच्या गद्दारीपर्यंत! उद्धव ठाकरेंच्या भाषणातील 10 मोठी वक्तव्य

उद्धव ठाकरे यांनी म्हटलंय की, काही जण म्हणतात, आपल्यातच गद्दारी झाली. पण आता आपल्याच आईचं दूध विकणारी औलाद आपल्यात नाही. असे कुणी असतील तर त्यांनी शिवसेना सोडावी.

Shiv sena | शिवसेनेच्या पंतप्रधानापासून भाजपच्या गद्दारीपर्यंत! उद्धव ठाकरेंच्या भाषणातील 10 मोठी वक्तव्य
VC द्वारे संवाद साधताना उद्धव ठाकरे
Follow us
| Updated on: Jan 23, 2022 | 9:45 PM

भाजपवर सडेतोड शब्दांत टीका करणं, शिवसैनिकांना थेट कामाला लावण्यासाठी काय धोरण आता अवलंबायचं इथपर्यंत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) आपल्या संवादात महत्त्वाची अशी वेगवेगळी वक्तव्य केली. भाजपसोबत युतीत सडलो असल्याची टीका पुन्हा एकदा त्यांनी बोलून दाखवली. भाजपवर थेट हल्लाबोल करत आपल्या आरोग्यावरुन सुनावणाऱ्यांचाही उद्धव ठाकरेंनी समाचार घेतला. यावेळी त्यांनी आगामी सर्वच निवडणुकांच्या दृष्टीनं उद्धव ठाकरेंची आपली आक्रमक भूमिका स्पष्ट केली. शिवाय शिवसेनाच्या (Shivsena) हिंदुत्वाचा मुद्दा पुन्हा सगळ्यांच्या लक्षात आणून दिला. सोबतच भाजपचं हिंदुत्व (Hindutva of BJP) कसं दुटप्पी आहे, यावरुन त्यांनी तिखट शब्दांत टीकेचे बाण सोडलेत. दरम्यान, यावेळी काय करायचं आहे आणि कसं करायचं आहे, हे सांगताना शिवसैनिकांना उद्देशून महत्त्वाची दहा वक्तव्य केली. चला तर आढावा घेऊयात उद्धव ठाकरेंच्या भाषणातील महत्त्वाच्या आणि मोठ्या दहा वक्तव्यांचा….

उद्धव ठाकरेंचं पहिलं मोठं वक्तव्य

मी बाहेर पडणार. महाराष्ट्र पिंजून काढणार. जे विरोधक माझ्या तब्बेतीची काळजी घेत आहे, त्या काळजीवाहू विरोधकांनी भगव्याचं तेज दाखवणार. विरोधकांची चिंता करण्याची गरज नाही. काळजीवाहू विरोधक हे कधीकाळी आपले मित्र होते. 25 वर्ष आपली युतीमध्ये सडली. काही दिवसांपूर्वी बोलून दाखवलेलं हेच. तेच माझं मत आजही कायम आहे. राजकारण म्हणजे गजकरण आहे, असं बाळासाहेब म्हणायचे. राजकारण म्हणून विरोधक आता काहीही खाजवतायत.

उद्धव ठाकरेंचं दुसरं मोठं वक्तव्य

दिल्ली काबीज करण्याचं स्वप्न जे शिवसेनाप्रमुखांनी आपल्याला दाखवलं, ते जर आपण पूर्ण करु शकत असून, तर आणि तरच.. या सगळ्याला अर्थ आहे..

उद्धव ठाकरेंचं तिसरं मोठं वक्तव्य

गाढवं, किंवा काही जनावरं वाघाचं कातडं पांघरतात, असं म्हणतात. तसंच यांनी हिंदुत्वाचं कातडं पांघरलेलंय. आम्ही हिंदुत्व नाही सोडलेलं. आम्ही हिंदुत्त्वापासून कधीच दूर जाऊ शकत नाही. आम्ही भाजपला सोडलं. भाजप म्हणजे हिंदुत्व नाही.

उद्धव ठाकरेंचं चौथं मोठं वक्तव्य

मध्यंतरी अमित शहा पुण्यात आले. म्हणाले एकट्यानं लढा.. ठिकै.. आम्ही एकट्यानं लढू.. पण मग तुमच्या अधिकारांचा गैरवापर करायचा नाही. राजकारणात जसं भिडायचंय असतं तसं भिडा, मग होऊन दे सामना.. इडीची पिडा लावायची आणि लढ म्हणायचे, अशांनी आव्हान देण्याची शिवसैनिकाला गरज नाही..

उद्धव ठाकरेंचं पाचवं मोठं वक्तव्य

मध्ये एकदा मी नवं हिंदू शब्द वापरला होता. या शब्दाचा वापर भाजपनं स्वतःच्या स्वार्थासाठी केला आहे. सोयीप्रमाणे बदलणारं हिंदुत्व आहे. भाजपची युती ही फक्त त्यांना सत्तेसाठी हवी होती. सत्तेसाठी संघमुक्त भारत म्हणणाऱ्या नितीश कुमारशीही त्यांनी युती केली.. चंद्राबाबूशी युती केली…. सत्तेसाठी कुणाशीही युती करायला भाजप तयार आहे..! खरे हिंदू असाल, तर एक धोरण घेऊन पुढे चला..

उद्धव ठाकरेंचं सहावं मोठं वक्तव्य

पण आपण जेवढ्या जिद्दीनं विधानसभा, लोकसभेच्या निवडणुका लढवतो, तेवढ्या जिद्दीनं निवडणुका लढवत नाही आहोत.. इतर पक्ष ज्याप्रमाणे छोट्या निवडणुका लढत आहेत, तसे आपण लढत नाही. याला मीही जबाबदार आहे. यापुढे आपण आता हे टाळलं पाहिजे.

उद्धव ठाकरेंचं सातवं मोठं वक्तव्य

ज्या बलवान हिदुस्तानचं स्वप्न आम्ही बघितलं, ते कुणाला बोटाखाली चिरडण्यासाठी नव्हतं. गुलामगिरीचं वातावरण तयार करणं, हे हिंदुत्त्व नाही. देशाचे नागरिक आज गप्प बसले, तर पुन्हा गुलामागिरी येईल, अशी स्थिती निर्माण केली जातेय. यांना वेळीच रोखण्यासाठी शिवसेनेला लढा द्यावा लागणार आहे.

उद्धव ठाकरेंचं आठवं मोठं वक्तव्य

दोन विधानपरिषदा आपण हरलो. काही जण म्हणतात, आपल्यातच गद्दारी झाली. पण आता आपल्याच आईचं दूध विकणारी औलाद आपल्यात नाही. असे कुणी असतील तर त्यांनी शिवसेना सोडावी. लढाईत हारजीत ठरते, ती निष्ठेवरच ठरते. गद्दारी खरचं होतेय का..? नाही… पण दुर्लक्ष होतंय.

उद्धव ठाकरेंचं नववं मोठं वक्तव्य

यापुढे प्रत्येक निवडणुकीत, बँक, स्थानिक स्वराज्य संस्था, कोणतीही निवडणूक जिंकायचीच, अशा हेतूनंच ती लढायची आहे.

उद्धव ठाकरेंचं दहावं मोठं वक्तव्य

गावागावात जिल्ह्याजिल्ह्यात, तालुक्यात संस्थात्मक काम केली पाहिजेत. सहाकरमध्ये आपण काय करतोय? नव्या संस्था उभ्या करण्यात आपण काय करतोय? संस्थात्मक कामं आपण का करत नाही? दूरगामी कशी काम करता यायला हवीत. आताच्या संधीचं सोन करायला हवं.

पाहा व्हिडीओ –

संबंधित बातम्या :

‘आम्ही भाजपला सोडलं, हिंदुत्वापासून दूर गेलो नाहीत’, भाजपच्या टीकेला उद्धव ठाकरेंचं जोरदार प्रत्युत्तर

जमलेल्या माझ्या तमाम….! शिवसैनिकांना उद्देशून उच्चारलेला उद्धव ठाकरेंचा शब्दान शब्द.. जसाच्या तसा

दिल्ली काबीज करु… बाळासाहेबांच्या जयंतीदिनी उद्धव ठाकरेंकडून शिवसेनेची पुढची वाटचाल स्पष्ट

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.