मुंबई: बहुतेक राजकारण्यांची राजकीय विद्यार्थी दशेपासून सुरू होते आणि राजकीय पक्षातून त्यांच्या करिअरला धुमारे फुटतात. भाई जगताप यांची राजकीय वाटचाल थोडीशी वेगळी आहे. त्यांची राजकीय सुरुवात विद्यार्थी चळवळीतून झाली. पण नंतर त्यांनी काँग्रेसमध्ये राहूनच चळवळीशी त्यांनी स्वत:ला जोडून घेतलं. मुख्य प्रवाहाच्या राजकारणापेक्षा कामगारांच्या चळवळीवर लक्ष केंद्रीत केलं. कामगारांसाठी अनेकवेळा संघर्ष केला. त्यामुळे काँग्रेस नेत्यांपेक्षा कामगार नेते अशीच त्यांची ओळख अधिक गडद झालेली आहे. (trade union leader to mumbai Congress president, know about bhai jagtap)
कोण आहेत भाई जगताप?
>> अशोक जगताप यांची भाई जगताप या नावाने ओळख
>> भाई जगताप काँग्रेसच्या तिकीटावर विधान परिषद आमदार.
>> जगताप यांच्या आमदारकीची दुसरी टर्म
>> भाई जगताप याआधी विधानसभेवरही निवडून गेले होते, मात्र गेल्या निवडणुकीत पराभव
विद्यार्थी चळवळीतून सुरुवात
भाई जगताप यांचं खरं नाव अशोक अर्जुनराव जगताप आहे. मात्र, कामगार चळवळीपासून त्यांची भाई जगताप अशीच ओळख निर्माण झाली आहे. भाई जगताप यांच्या राजकीय कारकिर्दीला विद्यार्थी चळवळीपासून सुरुवात झाली. विद्यार्थी दशेत असतानाच त्यांनी एनएसयूआय या विद्यार्थी संघटनेत काम करण्यास सुरुवात केली. नंतर युवक काँग्रेस आणि काँग्रेस पक्षात सक्रिय झाले. याचवेळी भारतीय कामगार कर्मचारी महासंघातून त्यांनी कामगारांचे प्रश्न सोडवण्यास सुरुवात केली. नव्वदच्या दशकात त्यांनी अनेक आंदोलने उभी केली. मुंबईतील इंजीनियरिंग कारखान्यांमध्ये त्यांच्या युनियनने चांगलाच जोर पकडला होता. कामगारांची शक्ती उभी करण्यात त्यांना यश आलं. त्यामुळे आपोआपच काँग्रेसमधील त्यांची ताकद वाढली.
पहिली निवडणूक
कामगार नेते म्हणून नावारुपाला आल्यानंतर काँग्रेसने त्यांना 1999 मध्ये कोकणातील दापोली-मंडणगडमधून तिकीट दिलं. पण पहिल्याच निवडणुकीत त्यांना अपयश आलं. त्यानंतर 2004मध्ये त्यांना मुंबईतील खेतवाडी विधानसभा मतदारसंघातून तिकीट देण्यात आलं. काँग्रेसचा कधीही विजय न झालेल्या या मतदारसंघातून त्यांनी दणदणीत विजय मिळवला. सध्या ते मुंबई महापालिकेतून विधान परिषदेवर सदस्य आहेत.
काँग्रेसच्या मुंबई अध्यक्षपदाची माळ
भाई जगताप यांची नुक्तीच मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे. या पदासाठी माजी आमदार चरणसिंह सप्रा, माजी मंत्री सुरेश शेट्टी यांची नावे चर्चेत होती. या नेत्यांना मागे टाकून भाई जगताप यांच्याकडे हायकमांडने हे पद दिलं आहे.
पालिका निवडणुकीचं चॅलेंज
भाई जगताप हे काँग्रेसचे आक्रमक नेते आहेत. ते मराठा आहेत. मराठी चेहरा असल्याने काँग्रेसने त्यांच्याकडे पक्षाची धुरा दिली आहे. पुढच्या वर्षी मुंबई महापालिकेच्या निवडणुका होत आहेत. या निवडणुकीला सामोरे जाण्यासाठी आक्रमक, अभ्यासू, संघटन कौशल्य असलेल्या नेत्याची गरज होती. भाई जगताप यांच्यानिमित्ताने काँग्रेसची ही उणीव भरून निघाल्याचं बोललं जात आहे. अर्थात पालिका निवडणुकीत काँग्रेस कशी कामगिरी करते त्यावर बरच अवलंबून आहे.
केवळ 31 नगरसेवक
1992 ते 1997 या काळात मुंबई महापालिकेची सत्ता हातात असलेल्या काँग्रेसचे मुंबई पालिकेत सध्या 31 नगरसेवक आहेत. त्यामुळे हा आकडा वाढवणं भाई जगताप यांच्यासाठी मोठं आव्हान असणार आहे. 2017च्या पालिका निवडणुकीत भाजपने 82 जागा जिंकल्या होत्या. भाजपच्या लाटेमुळे काँग्रेसला मोठा फटका बसला होता. झोपडपट्ट्या ही काँग्रेसची मोठी व्होटबँक आहे. मात्र, काँग्रेसची मदार असलेला हा व्होटर भाजपकडे झुकला आहे. त्यामुळे काँग्रेसची चिंता वाढली आहे. त्यातच काँग्रेसमध्ये मुंबईतच अनेक गट आहेत. त्यामुळे काँग्रेस या पालिका निवडणुकीत गटबाजी रोखत भाजपचं आव्हान कसं मोडित काढते हा पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. तसेच पालिकेत वर्चस्व निर्माण करण्यात भाई जगताप कितपत यशस्वी ठरतात हे सुद्धा पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. (trade union leader to mumbai Congress president, know about bhai jagtap)
VIDEO | सुपरफास्ट 100 न्यूज | 100 SuperFast News | 8 AM | 16 April 2021 https://t.co/M8iEyBu7xV #MorningBulletin | #MorningHeadlines | #TV9Marathi | #BreakingNews | #LatestUpdates
— TV9 Marathi (@TV9Marathi) April 16, 2021
संबंधित बातम्या:
नेता, अभिनेता, ‘एकच छंद गोपीचंद’; वाचा, कोण आहेत गोपीचंद पडळकर?
कांशीराम यांच्यापासून प्रेरणा; महादेव जानकरांच्या तीन भीष्म प्रतिज्ञा; वाचा, कसा आहे राजकीय प्रवास!
पहिल्यांदाच आमदार आणि मंत्रीही, ‘मामांची कृपा?’; वाचा, कोण आहेत प्राजक्त तनपुरे?
(trade union leader to mumbai Congress president, know about bhai jagtap)