नीलम गोऱ्हे, सुप्रिया सुळे, यशोमती ठाकूर हरवल्या?, शोधून देणाऱ्यास पाचशे रुपयांचे बक्षीस : तृप्ती देसाई
सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांनी धनंजय मुंडे यांची मंत्रिमंडळातून तातडीने हकालपट्टी करावी, अशी मागणीही केली आहे.
मुंबई : राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्यावरील बलात्काराचा आरोप आणि धनंजय मुंडे यांनी आपल्या विवाहबाह्य संबंधाची दिलेली कबुली, यावरुन आता राजकारण चांगलंच तापलेलं पाहायला मिळत आहे. त्यानंतर विविध राजकीय घडामोडींनी गेले दोन ते तीन दिवस गाजले. विरोधी पक्षाकडून राजीनाम्याची मागणी जोर धरत असताना आता सामाजिक क्षेत्रातूनही मुंडे यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी होत आहे. या दरम्यान सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांनी महाविकास आघाडीच्या महिला नेत्यांवर निशाणा साधला आहे (Trupti Desai Criticized Mahavikas aaghadi leaders Nilam Gorhe, Supriya Sule and Yashomati Thakur).
नीलमताई गोऱ्हे, सुप्रियाताई सुळे, यशोमतीताई ठाकूर हरवल्या आहेत. कृपया कुणाला दिसल्यास सांगावे. ही माहिती देणाऱ्यास पाचशे रुपयांचे रोख बक्षीस दिले जाईल, असे म्हणत तृप्ती देसाई यांनी महाविकास आघाडीच्या महिला नेत्यांवर टीका केली आहे.
‘आपला तो बाब्या, दुसऱ्याचं ते कारटं’ ही भूमिका सोडा!
‘हाथरस बलात्कार प्रकरणात या तिघीही खूपच आक्रमकपणे पीडित मुलीला न्याय मिळवा म्हणून पुढे सरसावल्या होत्या. परंतु दुर्दैव असे आहे की, आपल्या राज्यात जर एखादी महिला या प्रकरणी आत्ता मंत्रीमंडळात असलेल्या एखाद्या मंत्र्याविरोधात आवाज उठवत आहे. आपल्यावर अत्याचार झाला आहे, असे जर ती सांगत आहे, पोलीसात तक्रार करत आहे, त्याचे पुरावेही देत आहे. तरी गुन्हा दाखल करण्यास पोलीस टाळाटाळ करत आहेत.’
‘तरी तुम्ही तिघी कार्यरत असलेल्या पक्षाच्या, युतीच्या ‘महाविकास आघाडी सरकार’च्या (Mahavikas aaghadi) मंत्रीमंडळात धनंजय मुंडे मंत्री आहेत. म्हणून “आपला तो बाब्या आणि दुसऱ्याचे ते कारटे” अशी भूमिका तुम्ही या प्रकरणात घेत आहात असे सर्वसामान्य जनतेला वाटत आहे. महिलांचे सबलीकरण यासाठी आवाज उठवत असताना आपल्या पक्षातील एखाद्या नेत्यावर आरोप झाले, तर त्याविषयी बोलायचे नाही अशी भूमिका जर तुमच्यासारख्या महिला नेत्या घ्यायला लागल्या तर महाराष्ट्रात महिला सबलीकरण होणे अशक्य आहे. आपण महाराष्ट्रात असाल तर नक्कीच या प्रकरणावर जाहीरपणे बोला, सध्या तुमची गरज रेणू शर्माला आहे’, असे तृप्ती देसाई (Trupti Desai) म्हणाल्या.
Headline | 12 PM | धनंजय मुंडेंच्या मेव्हण्यांकडून रेणू शर्माविरोधात तक्रार
धनंजय मुंडेंनी राजीनामा द्यावा!
सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांनी धनंजय मुंडे यांची मंत्रिमंडळातून तातडीने हकालपट्टी करावी, अशी मागणीही केली आहे. धनंजय मुंडे यांनी ट्विटद्वारे माहिती देवून सहमतीने शरीरसंबंध ठेवून त्यातून त्यांना दोन मुले असल्याचे कबुली दिल्यामुळे “एक तरफ घरवाली आणि एक तरफ बाहरवाली” असा संदेश जनतेमध्ये जात आहे, जो पुढील दृष्टीने चुकीचा आहे, असं तृप्ती देसाई म्हणाल्या.
रेणू शर्मांनी दिलेली तक्रार गंभीर स्वरुपाची असून, तातडीने गुन्हा दाखल करणे गरजेचे आहे. तसेच रेणू शर्मांविरोधात जर कोणी तक्रारी केल्या असतील तर त्यांच्यावरही कारवाई होणे गरजेचे आहे. राष्ट्रवादी पक्षाने तातडीने धनंजय मुंडे यांच्यावर कारवाई करावी तसेच मुख्यमंत्र्यांनी मंत्रिमंडळातून मुंडे यांची हकालपट्टी करावी, असं तृप्ती देसाई म्हणाल्या.
(Trupti Desai Criticized Mahavikas aaghadi leaders Nilam Gorhe, Supriya Sule and Yashomati Thakur)
हेही वाचा :
पंकजा मुंडे कुठे आहेत?; मौनामागचं कारण काय?https://t.co/OIas9BEoKC#DhananjayMunde | #dhananjay_munde | #renusharma | #rapecase | #ncp | #pankajamunde
— TV9 Marathi (@TV9Marathi) January 15, 2021