सांगली काँग्रेसमध्ये कदम आणि दादा गटातला संघर्ष वाढला, कार्यकर्त्यांचा मेळावा घेत विशाल पाटील वेगळी भूमिका घेणार?
जिल्हाध्यक्ष पदाच्या निवडीच्या निमित्ताने सांगली जिल्हा काँग्रेसमधील गटबाजी आता समोर आली आहे. कदम आणि दादा गटा या दोन्हींमध्ये पुन्हा एकदा संघर्ष सुरू झाला आहे. जिल्हाध्यक्ष निवडीमध्ये कदम गटाने आपलं वर्चस्व राखला आहे, त्यामुळे नाराज दादा गटाने सवतासुभा मांडलाय.
सांगली : जिल्हाध्यक्ष पदाच्या निवडीच्या निमित्ताने सांगली जिल्हा काँग्रेसमधील गटबाजी आता समोर आली आहे. कदम आणि दादा गटा या दोन्हींमध्ये पुन्हा एकदा संघर्ष सुरू झाला आहे. जिल्हाध्यक्ष निवडीमध्ये कदम गटाने आपलं वर्चस्व राखला आहे, त्यामुळे नाराज दादा गटाने सवतासुभा मांडलाय. नूतन जिल्हाध्यक्ष आमदार विक्रम सावंत यांच्या कृषी राज्यमंत्री विश्वजीत कदम यांच्या हस्ते पार पडलेल्या सत्काराकडे दादा गटाने पाठ फिरवल्याचे पाहायला मिळाले आहे.
सांगली जिल्हा काँग्रेस अध्यक्षपदी आमदार विक्रम सावंत यांची निवड झाल्यानंतर त्यांच्या जिल्हा काँग्रेस कमिटी तर्फे सत्कार करण्यात आला. कृषी राज्यमंत्री विश्वजित कदम यांच्या हस्ते यावेळी नूतन जिल्हाध्यक्ष व आमदार विक्रम सावंत यांचा सत्कार पार पडला. याप्रसंगी आमदार मोहनराव कदम, शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील, काँग्रेस नेत्या जयश्री पाटील यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी, नगरसेवक आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
जिल्हाध्यक्षपदासाठी विक्रम पाटील इच्छूक, पद आमदार विक्रम सांवतांकडे
दरम्यान काँग्रेस कमिटीमध्ये पार पडलेल्या या सत्कार समारंभाकडे वसंतदादा पाटील गटाने पाठ फिरवल्याचे पाहायला मिळाले. विशाल पाटील काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष पदासाठी इच्छुक होते, मात्र पक्षाने त्यांच्याकडे प्रदेश उपाध्यक्ष पदाची जबाबदारी सोपवत कदम गटाच्या आमदार विक्रम सावंत यांची जिल्हाध्यक्षपदी निवड केली. त्यामुळे वसंतदादा गटामध्ये नाराजीचे वातावरण आहे. सोशल मीडियावर विशाल पाटील गटाच्या कार्यकर्त्यांनी जिल्हाध्यक्ष पदाच्या निवडीबाबत नाराजीही व्यक्त केली. त्यामुळे पार पडलेल्या नुतून जिल्हाध्यक्ष सत्कार कार्यक्रमाकडे वसंतदादा गटाने पाठ फिरविल्याचे दिसून आले.
कार्यकर्त्यांचा मेळावा घेत विशाल पाटील वेगळी भूमिका घेणार?
प्रदेश उपाध्यक्षपदाची जबाबदारी मिळाल्यानंतर विशाल पाटील बुधवारी पहिल्यांदाच सांगलीमध्ये येत असल्याने दादा गटाने कार्यकर्त्यांचा मेळावा घेत वेगळी भूमिका घेण्याचा निर्धार केल्याची चर्चा सुरू झाली आहे. जिल्हाध्यक्षपदाच्या निवडणुकीमध्ये विशाल पाटील यांचे नाव अग्रेसर होते आणि विशाल पाटील जिल्हाध्यक्ष पदासाठी जोरदार इच्छुक होते. त्यामुळे आता बुधवारी पार पडणाऱ्या मेळाव्यामध्ये विशाल पाटील हे नेमकी काय भूमिका घेणार याकडे लक्ष लागून राहिले आहे.
हेही वाचा :
भाजीपाला आणि फळांच्या दरांबाबत धोरणात्मक निर्णयासाठी मंत्रालयात बैठक होणार
टोमॅटो उत्पादकांची परवड सुरुच, सांगली सोलापुरात टोमॅटो रस्त्यावर फेकले; येवल्यात शेतात मेंढ्या सोडत संताप
सांगलीत भाजपचं पालकमंत्री हटाव आंदोलन; उद्धव ठाकरेंनी पालकमंत्री पद स्वीकारण्याची मागणी
व्हिडीओ पाहा :
Two group active in Sangli congress after district president election