निवडणुकीच्या तोंडावर आठवले गटात मोठं भगदाड

पुणे : लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पक्षात मोठं भगदाड पडलं आहे. लोकसभेच्या जागावाटपात आणि महामडंळ वाटपात शिवसेना-भाजपने डावलल्याने रिपाइंच्या कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड नाराजी आहे. याच नाराजीतून रिपाइंचे दोन मोठे नेते महेश शिंदे आणि हनुमंत साठे हे पक्षातून बाहेर पडणार आहेत. त्यामुळे ऐन निवडणुकीत आठवलेंना मोठा फटका बसणार आहे. […]

निवडणुकीच्या तोंडावर आठवले गटात मोठं भगदाड
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 4:17 PM

पुणे : लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पक्षात मोठं भगदाड पडलं आहे. लोकसभेच्या जागावाटपात आणि महामडंळ वाटपात शिवसेना-भाजपने डावलल्याने रिपाइंच्या कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड नाराजी आहे. याच नाराजीतून रिपाइंचे दोन मोठे नेते महेश शिंदे आणि हनुमंत साठे हे पक्षातून बाहेर पडणार आहेत. त्यामुळे ऐन निवडणुकीत आठवलेंना मोठा फटका बसणार आहे.

शिवसेना-भाजपची युती झाली आणि जागावाटपाच्या चर्चाही सुरु झाल्या. मात्र, या सगळ्या चित्रात महायुतीतले घटकपक्ष असलेल्यांना दूर ठेवण्यात आले. त्यात केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवलेंच्या रिपाइंचाही समावेश आहे. त्यामुळे रिपाइंमध्ये सध्या नाराजीची खदखद सुरु आहे. या नाराजीला आणखी बळ मिळालं, ते महामंडळाच्या वाटपांमधून.

दोनच दिवसांपूर्वी शिवसेना आणि भाजपमधील अनेक स्थानिक नेत्यांना महामंडळाचे सदस्यत्व देण्यात आले. लोकसभा निवडणुकीच्या तोंडवर खोऱ्याने महामंडळाचे सदस्यपदं वाटण्यात आली. मात्र, यातूनही रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाला म्हणजेच आठवलेंच्या पक्षातील नेत्यांना डावलण्यात आले. त्यामुळे रिपाइंचे कार्यकर्ते प्रचंड नाराज आहेत.

या सर्व प्रकाराच्या निषेधार्थ रिपाइंच्या कामगार आघाडीचे नेते महेश शिंदे आणि मातंग आघाडीचे नेते हनुमंत साठे आपल्या शेकडो कार्यकर्त्यांसह राजीनामे देऊन बाहेर पडणार आहेत. त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीत रिपाइंकडून शिवसेना-भाजप युतीची कोंडी करण्यचा प्रयत्न होणार असल्याचे दिसून येते आहे.

एकंदरीत आठवलेंच्या रिपाइंची अवहेलना शिवसेना-भाजप युतीला आगामी लोकसभा निवडणुकीत महागात पडण्याची शक्यता आहे.

निवडणुकीच्या तारखा जाहीर

केंद्रीय निवडणूक आयोगाने रविवारी 10 मार्चला लोकसभा निवडणूक 2019 च्या तारखा जाहीर केल्या. लोकसभेच्या 543 जागांसाठी 7 टप्प्यात मतदान होणार आहे. त्यासाठी आचारसंहिता लागू झाली आहे. 11, 18, 23, 29 एप्रिल, तर 6, 12 आणि 19 मे रोजी अशा सात टप्प्यात मतदान होईल. देशभरातील सर्व लोकसभा मतदारसंघाचा निवडणुकीचा निकाल 23 मे रोजी जाहीर होईल. केंद्रीय निवडणूक आयुक्त सुनिल अरोरा यांनी याबाबतची घोषणा केली.

महत्त्वाचं म्हणजे महाराष्ट्रात 11 एप्रिल 2019 रोजी पहिलं मतदान होईल. महाराष्ट्रातील 48 जागांसाठी चार टप्प्यात मतदान होणार आहे. पहिल्या टप्प्यात 11 एप्रिलला 7 जागांसाठी, दुसऱ्या टप्प्यात 18 एप्रिलला 10 जागांसाठी, तिसऱ्या टप्प्यात 23 एप्रिलला 14 जागांसाठी आणि चौथा टप्प्यात 29 एप्रिलला 17 जागांसाठी मतदान होणार आहे.

बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...