BMC Election : ठाकरे गटाकडून स्वबळाची घोषणा होताच शिवसेना शिंदे गटाची पहिली प्रतिक्रिया

BMC Election : संजय राऊत यांनी आज पत्रकारांशी बोलताना ठाकरे गट मुंबईपासून नागपूरपर्यंत सर्व पालिका निवडणुका स्वबळावर लढवणार अशी घोषणा केली. लगेच या वक्तव्याचे पडसाद उमटण्यास सुरुवाच झाली. आता शिवसेना शिंदे गटाकडून यावर प्रतिक्रिया आली आहे.

BMC Election : ठाकरे गटाकडून स्वबळाची घोषणा होताच शिवसेना शिंदे गटाची पहिली प्रतिक्रिया
Uday Samant
Follow us
| Updated on: Jan 11, 2025 | 12:01 PM

उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी आज पत्रकारांशी बोलताना एक मोठी घोषणा केली. राजकीय वर्तुळात लगेच त्याचे पडसाद उमटण्यास सुरुवात झाली आहे. मुंबईपासून नागपूरपर्यंत सर्व पालिका निवडणुका स्वबळावर लढवण्याची खासदार संजय राऊत यांनी घोषणा केली आहे. उद्धव ठाकरे यांनी स्वबळावर लढवण्याचे संकेत दिल्याच संजय राऊत म्हणाले. ठाकरे गटाकडून ही घोषणा झाल्यानंतर शिवसेना शिंदे गटाची पहिली प्रतिक्रिया आली आहे. “त्यांच्यामध्ये काय चाललं आहे, हे जसं तुम्हाला कळत नाही, तसं महाराष्ट्राच्या मतदाराला सुद्धा कळत नाही” असं मंत्री आणि शिवसेना शिंदे गटाचे नेते उदय सामंत म्हणाले.

“2019 ला जनमताचा कौल मिळालेला असताना काँग्रेससोबत जाणं. त्यानंतर काँग्रेसच्या हाताच प्रचार करणं. वंदनीय शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी सांगितलेलं, भविष्यात शिवसेनेकडून हाताचा प्रचार कधीही होऊ शकत नाही. त्या काँग्रेसचा प्रचार केला. भाषणात हिंदूह्दय सम्राट शब्द न वापरणं, याचे सगळ्याचे फटके बसले असतील. म्हणून कदाचित हा निर्णय घेतला असेल” असं उदय सामंत म्हणाले.

….तर ते राजकरणात टिकणार कसे?

ठाकरे गट योग्य वळणावर येतोय का? या प्रश्नावर उदय सामंत म्हणाले की, “योग्य वळणावर येतोय का, हे त्यांनाच माहित. काही गोष्टींची त्यांना जाणीव झाली असेल. म्हणून महाविकास आघाडीतून बाहेर पडत असतील” अपेक्षित यश मिळेल का? ’15 वर्ष तरी आम्हाला चिंता करण्याची गरज नाही’ असं उत्तर उदय सामंत यांनी दिलं. “पक्ष टिकवायचा असेल, कार्यकर्त्यांचा उत्साह टिकवायचा असेल, तर त्यांना नावीन्यपूर्ण प्रयोग करावे लागतील. त्यालाच त्यांचं प्राधान्य असेल. हे प्रयोग केले नाहीत, तर ते राजकरणात टिकणार कसे?” असं उदय सामंत म्हणाले

त्यांच्यामध्ये असुरक्षितता

बाळासाहेबांचे विचार सोडले नाहीत, ते परत येऊ शकतात असं ठाकरे बोलले आहेत. त्यावर उदय सामंत म्हणाले की, “ते तुम्ही असं कुठे म्हणाले. काल परवाची त्यांची भूमिका आणि आजची भूमिका यातून दिसतय प्रचंड असुरक्षितता त्यांच्यामध्ये निर्माण झाली आहे. एकनाथ शिंदेंनी दाखवून दिलय, सर्वसामान्यांचा नेता जनतेमध्ये गेला, तर यश मिळवू शकतो”

Santosh Deshmukh Murder : MCOCA लागल्यानं काय होणार ?
Santosh Deshmukh Murder : MCOCA लागल्यानं काय होणार ?.
संतोष देशमुख हत्याकांडात सात जणांवर MCOCA , वाल्मिक कराडचं काय ?
संतोष देशमुख हत्याकांडात सात जणांवर MCOCA , वाल्मिक कराडचं काय ?.
धामोरी गावात भुताची अफवा, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पण..
धामोरी गावात भुताची अफवा, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पण...
'बूंद से गयी वो हौद से नही आतीं' गुलाबराव पाटलांचा ठाकरेंवर घणाघात
'बूंद से गयी वो हौद से नही आतीं' गुलाबराव पाटलांचा ठाकरेंवर घणाघात.
मुंबईत हवेची गुणवत्ता ढासळली, श्वसनाच्या आजारांनी त्रासले मुंबईकर
मुंबईत हवेची गुणवत्ता ढासळली, श्वसनाच्या आजारांनी त्रासले मुंबईकर.
मुंबई ते नागपूरपर्यंत सर्व महापालिका निवडणुका ठाकरे गट स्वबळावर लढणार
मुंबई ते नागपूरपर्यंत सर्व महापालिका निवडणुका ठाकरे गट स्वबळावर लढणार.
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी भाजप फुंकणार रणशिंग
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी भाजप फुंकणार रणशिंग.
Shegaon Hair Loss | केसगळतीच्या भीतीपोटी नागरिकांची 8 दिवस अंघोळच नाही
Shegaon Hair Loss | केसगळतीच्या भीतीपोटी नागरिकांची 8 दिवस अंघोळच नाही.
'एक खून करून पोट भरलं नाही?', जरांगे पाटलांचा थेट मुंडेंवर आरोप
'एक खून करून पोट भरलं नाही?', जरांगे पाटलांचा थेट मुंडेंवर आरोप.
'कोल्हेंच्या वक्तव्याची कीव, त्यांनीही...'; मित्रपक्षांकडून टीकास्त्र
'कोल्हेंच्या वक्तव्याची कीव, त्यांनीही...'; मित्रपक्षांकडून टीकास्त्र.