सत्तेच्या स्वार्थासाठीच महाविकास आघाडी एकत्र; उदयनराजेंची घणाघाती टीका

| Updated on: Dec 01, 2020 | 1:47 PM

सत्तेच्या स्वार्थासाठी महाविकास आघाडीतील तीन पक्ष एकत्र आले आहेत. स्वार्थ संपला की ते एकत्र राहणार नाहीत, अशी टीका भाजपचे खासदार उदयनराजे भोसले यांनी केली. (udayanraje bhosale slams mahavikas aghadi over Legislative Council election)

सत्तेच्या स्वार्थासाठीच महाविकास आघाडी एकत्र; उदयनराजेंची घणाघाती टीका
Follow us on

सातारा: सत्तेच्या स्वार्थासाठी महाविकास आघाडीतील तीन पक्ष एकत्र आले आहेत. स्वार्थ संपला की ते एकत्र राहणार नाहीत, अशी टीका भाजपचे खासदार उदयनराजे भोसले यांनी केली. सातारा येथील पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदान केंद्रांची पाहणी करण्यासाठी आले असता उदयनराजेंनी राज्यातील महाविकास आघाडी सरकारवर जोरदार टीका केली. (udayanraje bhosale slams mahavikas aghadi over Legislative Council election)

केवळ सत्तेच्या स्वार्थासाठी महाविकास आघाडीतील तिन्ही पक्ष एकत्र आले आहेत. केवळ सत्ता हस्तगत करणं हा त्यांचा एकत्र येण्यामागचा हेतू आहे. ज्यावेळेस वेगवेगळ्या विचारांचे लोक एकत्र येतात, त्यावेळेस त्यांना एकत्र ठेवण्याकरिता अमिष दाखवले जाते. मात्र ते कधीच एकत्र राहत नाहीत. त्यांचा उद्देश सार्थक झाला तर ते सर्व निघून जातात. याला फक्त भाजप अपवाद आहे. भाजप विचाराने एकत्र आहे. त्यांना कोणत्याही ताकदीचा वापर करावा लागत नाही. त्यांचे उद्दिष्टं निश्चित असून त्यामुळेच ते एकसंघ आहेत, असं उदयनराजे यांनी सांगितलं.

यावेळी त्यांनी पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत भाजपला दणदणीत विजय मिळण्याचा दावाही केला. भाजप राज्यातील सर्वच्या सर्व सहा जागा मोठ्या मताधिक्याने जिंकेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. भाजपमध्ये एकोपा आहे. टीमवर्क आहे. त्याचं फळ निश्चितच दिसून येईल, असंही ते म्हणाले.

दरम्यान, आज पदवीधर मतदारसंघासाठी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे, सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे, खासदार प्रीतम मुंडे यांच्यासह विविध मान्यवरांनी आज मतदान केलं. तर पुण्यातील पदवीधर मतदारसंघातील अपक्ष उमेदवार अभिजीत बिचुकले यांचं मतदार यादीतच नाव नसल्याने ते मतदान करू शकले नाही. त्यामुळे त्यांनी प्रचंड संताप व्यक्त केला असून या प्रकाराला भाजप जबाबदार असल्याचा आरोप त्यांनी केला.

 

संबंधित बातम्या:

धुळे-नंदुरबार विधानपरिषद निवडणूक, भाजपच्या अमरीश पटेलांसमोर काँग्रेसच्या अभिजीत पाटलांचे आव्हान

पुणे पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघ निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज, 2160 मतदान कर्मचारी, 856 आरोग्य कर्मचारी नियुक्त

(udayanraje bhosale slams mahavikas aghadi over Legislative Council election)