Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Thackeray-Pawar Meet | सर्वात मोठी ब्रेकिंग बातमी, महाविकास आघाडीतील मतभेद समोर आल्यानंतर हालचाली वाढल्या

महाराष्ट्राच्या राजकारणात आता मोठ्या घडामोडी होताना दिसत आहेत. महाविकास आघाडीत सध्या मतभेदांमुळे सारं काही आलबेल नाही, असं चित्र असताना आता महत्त्वाच्या घडामोडी घडत आहेत.

Thackeray-Pawar Meet | सर्वात मोठी ब्रेकिंग बातमी, महाविकास आघाडीतील मतभेद समोर आल्यानंतर हालचाली वाढल्या
Follow us
| Updated on: Apr 11, 2023 | 8:00 PM

मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात (Maharashtra Politics) आता मोठ्या घडामोडी घडताना दिसत आहेत. महाविकास आघाडीत सध्या मतभेदांमुळे सारं काही आलबेल नाही, असं चित्र असताना आता महत्त्वाच्या घडामोडी घडत आहेत. शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांची भेट होणार आहे. उद्धव ठाकरे स्वत: शरद पवार यांच्या भेटीसाठी त्यांच्या ‘सिल्व्हर ओक’ (Silver Oak) निवासस्थानी जाणार आहेत. या दोन्ही बड्या नेत्यांची रात्री आठ वाजता भेट होणार असल्याची माहिती समोर येत आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची डिग्री, उद्योगपती गौतम अदानी यांच्या जेपीसी चौकशीची मागणी आणि निवडणुकीत ईव्हीएम मशीनचा वापर यावरुन महाविकास आघाडीत मतभेद सुरु असल्याचं बघायला मिळालं. मोदींच्या डिग्रीवरुन राष्ट्रवादी काँग्रेसने एक वेगळी भूमिका घेतली. मोदींच्या डिग्री विषयी चर्चा करण्याची गरज नाही, असं राष्ट्रवादीने म्हटलं. तर संविधानिक पदावर असलेल्या व्यक्तींची डिग्री खरी असली पाहिजे, असं ठाकरे गटाचं म्हणणं आहे.

उद्योगपती गौतम अदानी यांच्या जेपीसी चौकशीपेक्षा कोर्टाच्या समितीकडूनच चौकशी व्हावी, अशी राष्ट्रवादी काँग्रेसची भूमिका आहे. तर ठाकरे गट आणि काँग्रेस चौकशीवर ठाम आहे. ईव्हीएमच्या मुद्द्यावरुन सुद्धा महाविकास आघाडीतील मतभेद समोर आले आहेत. तर दुसरीकडे आज चंद्रकांत पाटील यांचं बाबरी मशिदबाबत मोठं विधान समोर आलं. त्यांच्या त्या वक्तव्यावर ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी टीका केलीय. तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रसचे आमदार एकनाथ खडसे यांनी चंद्रकांत पाटील यांच्या वक्तव्याचं समर्थन केलं. त्यामुळे आघाडीत संभ्रम निर्माण झाल्याचं चित्र आहे.

हे सुद्धा वाचा

ठाकरे-पवार भेटीत नेमकी चर्चा काय होणार?

उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्या भेटीत राजकीय चर्चा होणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहेत. महाविकास आघाडीत अनेक मुद्द्यांवर एकमत नसल्याचं चित्र आहे. पण आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्ये भाजपचा पराभव करायचा असेल तर एकत्र राहणं जास्त गरजेचं आहे. याच विचारावर दोन्ही बड्या नेत्यांमध्ये चर्चा होण्यची शक्यता आहे. दोन्ही बडे नेते वादाच्या मुद्द्यावर तोडगा काढण्याची शक्यता आहे. या बैठकीत नेमके काय निर्णय घेतले जातात ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

विरोधी पक्षातील समन्वय सध्याच्या घडीला महत्त्वाचा मुद्दा आहे. या मुद्द्यावर या भेटीत चर्चा होण्याची शक्यता आहे. आगामी लोकसभा निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक पक्षाकडून रणनीती आखली जात आहे. विरोधी पक्षांच्या ऐक्याची भूमिका देशभरात घेतली जात आहे. असं असताना आगामी लोकसभा निवडणुकीत जागा वाटपाचा मुद्दा महत्त्वाचा असणार आहे.

महाविकास आघाडीत कोणत्या पक्षाला आणि उमेदवाराला कोणता मतदारसंघ द्यावा, याची चाचपणी आता सुरु झाल्याची शक्यता आहे. ठाकरे आणि पवार भेटीत या मुद्द्यावर चर्चा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. आपापले उमेदवार किंवा जागा बदलता येऊ शकतात का, या अनुषंगाने चर्चा होण्याची शक्यता आहे.

राऊतांना शिवसेनेच्या खासदारानं डिवचलं; ट्वीट करत म्हणाले, सांगा बरं...
राऊतांना शिवसेनेच्या खासदारानं डिवचलं; ट्वीट करत म्हणाले, सांगा बरं....
नॅशनल हेरॉल्ड प्रकरणी ईडीकडून राहुल अन् सोनिया गांधीविरोधात चार्जशीट
नॅशनल हेरॉल्ड प्रकरणी ईडीकडून राहुल अन् सोनिया गांधीविरोधात चार्जशीट.
'या' महिलांना 800चा हफ्ता येणार, लाडक्या बहिणीनो तुम्ही तर नाहीना यात?
'या' महिलांना 800चा हफ्ता येणार, लाडक्या बहिणीनो तुम्ही तर नाहीना यात?.
संभाजी भिडेंना चावलेला कुत्रा दत्तक घेणार, कोणी केली मोठी घोषणा?
संभाजी भिडेंना चावलेला कुत्रा दत्तक घेणार, कोणी केली मोठी घोषणा?.
लाडक्या बहिणींनो... आता 1500 नाही 500 रुपये, रोहिणी खडसे म्हणाल्या...
लाडक्या बहिणींनो... आता 1500 नाही 500 रुपये, रोहिणी खडसे म्हणाल्या....
अयोध्येचं राम मंदिर बॉम्बने उडवणार? थेट धमकीचा मेल, काय म्हटलंय त्यात?
अयोध्येचं राम मंदिर बॉम्बने उडवणार? थेट धमकीचा मेल, काय म्हटलंय त्यात?.
भिडेंना कुत्र्याचा चावा; वडेट्टीवार म्हणाले, त्याला दुर्बुद्धी सुचली
भिडेंना कुत्र्याचा चावा; वडेट्टीवार म्हणाले, त्याला दुर्बुद्धी सुचली.
ठाकरे गटाचा हंडा मोर्चा; पोलिसांकडून आंदोलकांची धरपकड
ठाकरे गटाचा हंडा मोर्चा; पोलिसांकडून आंदोलकांची धरपकड.
बीडमध्ये हत्येचं सत्र थांबेना! भाजप लोकसभा विस्तारकाची निर्घृण हत्या
बीडमध्ये हत्येचं सत्र थांबेना! भाजप लोकसभा विस्तारकाची निर्घृण हत्या.
'आता सगळं ओक्के...', दानवेंवर काल खैरे भडकले आज गळाभेट घेणार?
'आता सगळं ओक्के...', दानवेंवर काल खैरे भडकले आज गळाभेट घेणार?.