Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडवणारी मोठी बातमी, उद्धव ठाकरे आणि अनिल जयसिंघानीया यांचा एकत्र फोटो

महाराष्ट्राच्या राजकारणातील एक धक्कादायक बातमी आता समोर आली आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांना फसवण्याचा प्रयत्न करणाऱ्या तरुणीच्या वडिलांचा उद्धव ठाकरे यांच्यासोबतचा फोटो आता समोर आला आहे.

महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडवणारी मोठी बातमी, उद्धव ठाकरे आणि अनिल जयसिंघानीया यांचा एकत्र फोटो
Follow us
| Updated on: Mar 17, 2023 | 7:27 PM

मुंबई : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या पत्नी अमृता फडणवीस (Amruta Fadnavis) यांना ब्लॅकमेलिंक आणि फसवणूक प्रकरणात आता नवा ट्विटस्ट येण्याची चिन्हे आहेत. कारण अमृता फडणवीस यांना फसवण्याचा प्रयत्न करणारी अनिक्षा जयसिंघानीया (Aniksha Jaysinghania) हिचे वडील अनिल जयसिंघानीया (Anil jaysinghania) यांचा शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यासोबतचा फोटो समोर आला आहे. संबंधित फोटोची ‘टीव्ही 9 मराठी’ पुष्टी करत नाही. पण संबंधित फोटो सोशल मीडियावर आता व्हायरल होतोय.

राजकीय वर्तुळातील चर्चांमध्ये करण्यात येत असलेल्या दाव्यांनुसार, अनिल जयसिंघानीया यांनी 2014 मध्ये शिवसेना पक्षात प्रवेश केला होता. अनिल जयसिंघानीया यांनी पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थित प्रक्षप्रवेश केलेला. या पक्षप्रवेशाचे फोटो आता समोर आले आहेत. पण या फोटोंमधील वास्तव कितपत सत्य आहे, याबाबतची माहिती लवकरच समोर येण्याची शक्यता आहे. पण या फोटोंमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडू शकते.

देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणात मोठमोठे नेत्यांची नावे समोर आल्याची माहिती कालच दिली होती. पण त्यांनी याबद्दल संपूर्ण पुरावे आपल्या हाती येत नाही तोपर्यंत काहीच बोलणार नाही, असं स्पष्ट म्हटलंय. तर दुसरीकडे अनिक्षा जयसिंघानीया हिला आज कोर्टात हजर केलं असता पोलिसांनीदेखील या प्रकरणात काही नेते आणि बडे अधिकाऱ्यांचा समावेश असल्याचा संशय व्यक्त केला. त्यामुळे आता हे प्रकरण नेमकं कोणत्या मार्गाला जाणार, या प्रकरणी कुणाला अटक होते, हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे.

नेमकं प्रकरण काय?

देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या माहितीनुसार, अनिक्षा जयसिंघानीया ही 2015ला अमृता फडणवीस यांच्या संपर्कात आल्या होत्या. पण त्यानंतर काही वर्ष ती अमृता यांच्या संपर्कात आली नाही. या दरम्यान महाराष्ट्रात महाविकास आघाडीचं सरकार स्थापन झालं. मविआ सरकार स्थापन झाल्यानंतर अनिक्षा 2021 मध्ये पुन्हा अमृता यांच्या संपर्कात आली. मी ड्रेस डिझायनर आहे, तुम्ही माझे ड्रेस वापरुन बघा. मी आर्टिफिशअल ज्वेलरीचं काम करते. त्यांनी हळूहळू अमृता यांचा विश्वास संपादीत करण्याचा प्रयत्न केला.

माझ्या आईचं निधन झालंय. तिच्यावर पुस्तक लिहिलंय. त्या पुस्तकाचं तुम्ही विश्लेषण करा, मी 50 प्रमुख महिलांमध्ये आली, माझं स्वागत करा, अशा अनेक गोष्टी सांगून अनिक्षा अमृता यांच्या खूप जवळ आली आणि एकदा तिने सांगण्याची गोष्ट केली की, माझे वडील पोलिसांना माहिती देत होते. बुकींना पकडून द्यायचे. त्याबदल्यात पैसे मिळायचे. तुम्ही मला या कामात मदत करा, असं तिने अमृता यांना सांगितलं.

अमृता यांनी तिला स्पष्ट नकार दिला. तेव्हा तिने सांगितलं की, माझ्या पित्याला चुकीच्या गुन्ह्यांतर्गत फसवलं गेलंय. तेव्हा अमृता यांनी उपमुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यास सांगितलं. दरम्यान ती बोलून गेली की, मी माझ्या पित्याला सोडवण्यासाठी एक कोटी रुपये देऊ शकते. त्यानंतर अमृता यांनी तिला मोबाईलवर ब्लॉक केलं. त्यानंतर तिने दुसऱ्या फोननंबरवरुन काही मेसेज आणि व्हिडीओ पाठवत अमृता यांना फसवण्याचा प्रयत्न केला. तिने अमृता यांना ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न केला.

अनिक्षाने अमृता फडणवीस यांना ब्लॅकमेल करण्यासाठी काही व्हिडीओ आणि ऑडिओ क्लिप बनावट स्वरुपामध्ये बनवलेल्या होत्या. त्या सगळ्या व्हिडीओ आणि ऑडिओ क्लिप्स फेब्रुवारी महिन्यात अमृता फडणवीस यांना पाठवण्यात आल्या होत्या. या सगळ्या क्लिप्स डिलीट करण्यासाठी तिने अमृता फडणवीस यांच्याकडे 10 कोटी रुपयांच्या खंडणीची मागणी केली. अन्यथा संबंधित क्लिप्स व्हायरल करण्याची धमकी अमृता फडणवीस यांना देण्यात आली होती, असा खुलासा पोलिसांनी आज कोर्टात केला.

संघ बाह्य आणि आंतरिक दृष्टीसाठी काम करतो; पंतप्रधान मोदींचे गौरवोद्गार
संघ बाह्य आणि आंतरिक दृष्टीसाठी काम करतो; पंतप्रधान मोदींचे गौरवोद्गार.
'आपल्या सर्वांना...', पंतप्रधान मोदींची मराठीतून भाषणाला सुरुवात
'आपल्या सर्वांना...', पंतप्रधान मोदींची मराठीतून भाषणाला सुरुवात.
शुद्ध सात्विक प्रेम हीच संघाची प्रेरणा - मोहन भागवत
शुद्ध सात्विक प्रेम हीच संघाची प्रेरणा - मोहन भागवत.
दिक्षाभूमीला वंदन करून अभिप्राय वहीत पंतप्रधानांनी दिला विशेष संदेश
दिक्षाभूमीला वंदन करून अभिप्राय वहीत पंतप्रधानांनी दिला विशेष संदेश.
पंतप्रधान मोदींचा नागपूर दौरा; आरएसएसच्या मुख्यालयाला दिली भेट
पंतप्रधान मोदींचा नागपूर दौरा; आरएसएसच्या मुख्यालयाला दिली भेट.
हरीभाऊ बागडेंच्या हेलिकॉप्टरला अपघात; व्हिडिओ व्हारायल
हरीभाऊ बागडेंच्या हेलिकॉप्टरला अपघात; व्हिडिओ व्हारायल.
साईबाबांच्या पालखी सोहळ्यात आदित्य ठाकरेंना ढोल वाजवण्याचा मोह अनावर
साईबाबांच्या पालखी सोहळ्यात आदित्य ठाकरेंना ढोल वाजवण्याचा मोह अनावर.
पंतप्रधान मोदींच्या दौऱ्यानिमित्त नागपूरात जोरदार बॅनरबाजी
पंतप्रधान मोदींच्या दौऱ्यानिमित्त नागपूरात जोरदार बॅनरबाजी.
महाराष्ट्रासह मुंबईकरांसाठी मोठी बातमी, पुढील 4 ते 5 दिवस राज्यात...
महाराष्ट्रासह मुंबईकरांसाठी मोठी बातमी, पुढील 4 ते 5 दिवस राज्यात....
'कुत्रे अन् मांजरांवरून..', वाघ्या कुत्र्याच्या वादावर जरांगेंचं भाष्य
'कुत्रे अन् मांजरांवरून..', वाघ्या कुत्र्याच्या वादावर जरांगेंचं भाष्य.