उद्धव ठाकरेंची शिवसेना आमदारांसोबत तब्बल 4 तास बैठक, रवींद्र वायकर यांची खास पदी नियुक्ती
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आमदार रवींद्र वायकर यांची समन्वयक म्हणून नियुक्ती केली आहे (Uddhav Thackeray appoint Ravindra Waikar).
मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवसेना आमदारांच्या मागण्यांकडे विशेष लक्ष देता यावे म्हणून आमदार रवींद्र वायकर यांची समन्वयक म्हणून नियुक्ती केली आहे (Uddhav Thackeray appoint Ravindra Waikar). त्यांच्यावर आमदारांच्या मागण्या समजून घेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यापर्यंत पोहचवण्याची जबाबदारी आहे. या मागण्याचा सातत्याने पाठपुरावा व्हावा आणि शक्य ती कामं लवकरात लवकर व्हावी असा या मागील उद्देश असल्याचं सांगितलं जात आहे.
शिवसेनेच्या आमदारांच्या आपआपल्या मतदारसंघानुसार अनेक मागण्या आहेत. मात्र, या मागण्यांचा योग्य पाठपुरावा झाला नाही. त्यासाठीच उद्धव ठाकरे यांनी रवींद्र वायकर यांची नियुक्ती केली. त्यांच्यावर आमदार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात समन्वय राखण्याची जबाबदारी असेल.
TOP 9 | लोकल ते ग्लोबल, सर्व बातम्या एकत्र, पाहा टॉप 9 न्यूज!
दरम्यान, रवींद्र वायकर यांनी याआधी युती सरकारमध्ये मंत्रिपद भूषवलं आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या आमदारांसोबत व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठक घेतली. जवळपास 4 तास उद्धव ठाकरे यांनी शिवसेना आमदारांच्या अडचणी समजून घेतल्या.
या बैठकीत रवींद्र वायकर हे मुख्यमंत्र्यांच्या अखत्यारीत समन्वयक म्हणून काम करतील असा निर्णय उद्धव ठाकरे यांनी घेतला. यापुढील काळात रवींद्र वायकर शिवसेना आमदारांच्या अडलेल्या कामांचा पाठपुरावा करणार आहेत. रवींद्र वायकर शिवसेनेचे जोगेश्वरी विधानसभा मतदार संघाचे आमदार आहेत.
एकूणच उद्धव ठाकरे महाविकासआघाडीचं सरकार चालवत असतानाही पक्षाच्या आमदारांच्या मागण्यांकडे देखील बारकाईने लक्ष देताना दिसत आहेत. तसेच समन्वय व्हावा म्हणून तशा व्यवस्थाही करत आहेत. विशेष म्हणजे तिन पक्ष एकत्र येऊन तयार झालेल्या या सरकारमध्ये काँग्रेसच्या आमदारांसह अनेक वरिष्ठ नेत्यांनीही नाराजीचे सूर काढले होते. हा अनुभव पाहता उद्धव ठाकरे स्वपक्षीयांकडे अधिक लक्ष देताना दिसत आहेत.
हेही वाचा :
राणेंचा बंगला, फडणवीसांची उपस्थिती, शरद पवारांचा खंदा समर्थक भाजपमध्ये
फडणवीसांना महाराष्ट्रात खूप कामे, मी मोकळाच; संजय राऊत, कधी येता कर्नाटकला? : नारायण राणे
राष्ट्रवादीचे 12 आमदार भाजपच्या वाटेवर असल्याच्या चर्चा, नवाब मलिक म्हणतात…
Uddhav Thackeray appoint Ravindra Waikar