‘…मग तुम्ही सत्तेसाठी मिंध्यांचं काय चाटताय?’, उद्धव ठाकरे यांचा अमित शाह यांना खोचक सवाल

"या देशातील लोकशाही संपवून टाकायची, एकही विरोधी पक्ष या देशात शिल्लक ठेवायचा नाही. राहिला तर जेलमध्ये टाकायचं. देशाची वाटचाल हुकूमशाहीच्या दिशेला चाललीय", असा घणाघात उद्धव ठाकरेंनी केला.

'...मग तुम्ही सत्तेसाठी मिंध्यांचं काय चाटताय?', उद्धव ठाकरे यांचा अमित शाह यांना खोचक सवाल
Follow us
| Updated on: Apr 02, 2023 | 9:05 PM

छत्रपती संभाजीनगर : “मला एक सांगा, मविआचं सरकार पसंत होतं की नव्हतं? छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांचं नाव घेतो आणि पाठीत वार करायचा? हो आम्ही सत्तेसाठी एकत्र आलो होतो. पण सत्ता गेल्यानंतरही साथ आहोत. असं काही नाही की, मला शिवसेना प्रमुखांची भाषा येत नाही. पण मला आवरावी लागते. खरंतर त्यांनाच ती भाषा शोभायची. मला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना विचारायचं आहे, आम्ही सत्तेसाठी काँग्रेस, राष्ट्रवादीचे तळवे चाटतो. मग तुम्ही सत्तेसाठी मिंध्यांचं काय चाटताय? चांगली चाललेली सरकारं फोडायची आणि पाडायची. नितीश कुमार आणि लालू यादव यांचं सरकार पाडून तुम्ही काय चाटत होता?”, असा खोचक सवाल उद्धव ठाकरे यांनी आजच्या महाविकास आघाडीच्या वज्रमूठ सभेत केला.

“पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणतात मेरी प्रतिमा खराब करने का काम चल रहा है. मग आमची प्रतिमा नाही का? तुमचा कुणीही सोम्या गोम्या आमच्यावर काहीही म्हणायचं. मोदींना म्हटलं की ओबीसींचा अपमान. तुमचं नाव भाजप आहे. काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत विरोधी पक्षाच्या नेत्यांना त्रास दिलं जातंय. विरोधी पक्षामध्ये दिसला भ्रष्ट की घेतला पक्षात. सर्व विरोधी पक्षाचे भ्रष्ट नेते भाजपात. तुमच्या पक्षाचं नाव भ्रष्ट जनता पार्टी ठेवा”, असा टोला उद्धव ठाकरे यांनी लगावला.

‘भाजपच्या मंचावर आता संधीसाधू’

“अजित पावारांनी जो उल्लेख केला की, मराठवाडा साधुसंतांचा आहे. एकेकाळी भाजपच्या मंचावर साधुसंत असायचे. पण आता संधीसाधू असतात. पण तो जमाना अटलजींचा होता. या देशातील लोकशाही संपवून टाकायची, एकही विरोधी पक्ष या देशात शिल्लक ठेवायचं नाही. राहिला तर जेलमध्ये टाकायचं. देशाची वाटचाल हुकूमशाहीच्या दिशेला चाललीय. सावरकरांची यात्रा काढताय तर काढा. पण त्यांचं अखंड हिदुस्तानचं स्वप्न पूर्ण कराल का?”, असा सवाल त्यांनी केला.

‘जमीन दाखवायची असेल तर…’

“अमित शाह म्हणाले शिवसेनेला जमीन दाखवायची आहे. जमीन दाखवायचं असेल तर पाकव्याप्त काश्मीरची जमीन घेऊन दाखवा. सरदार वल्लभाई पटेल यांचा मोठा पुतळा बांधला आहे. वल्लभाई नसते तर मराठवाडा मुक्त झाला असता की नाही? हा प्रश्न आहे. तीच हिंमत तुम्ही पाकव्याप्त काश्मीरमध्ये का दाखवत नाही? घुसवा फौजा. पण निवडणुका आल्यानंतर काहीतरी करणार आणि पुन्हा येरे माझ्या मागल्या”, अशी टीका ठाकरेंनी केली.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.