…तर अदानी यांना तुरुंगात टाकणार आहात का? उद्धव ठाकरे यांचा सवाल

uddhav thackeray | मुंबईतील धारावीच्या जागेला सोन्याचा भाव आला आहे. यामुळे या ठिकाणी धारावीतील लोकांप्रमाणे पोलीस, गिरणी कामगार, सरकारी कर्मचाऱ्यांना घरे मिळाली पाहिजे. या ठिकाणचा टीडीआर मुंबईभर वापरण्याची मुभा दिली जात आहे, हे आम्हाला मान्य नाही.

...तर अदानी यांना तुरुंगात टाकणार आहात का? उद्धव ठाकरे यांचा सवाल
Follow us
| Updated on: Dec 05, 2023 | 2:07 PM

दिनेश दुखंडे, मुंबई | 5 डिसेंबर 2023 : धारावीचा विकास करण्याचे काम सुरु झाले आहे. धारावीचा विकास झाला पाहिजे. त्याला आमचा पाठिंबा आहे. परंतु धारावीचा विकास करताना सर्व लोकांचे पुनर्वसन झाले पाहिजे. धारावीच्या जागेत पिढ्यान पिढ्या लोक राहत आहे. यामुळे या ठिकाणी धारावीकरांना ४०० फूट किंवा त्यापेक्षा जास्त जागा दिली गेली पाहिजे. धारावीचा विकास अदानी समूहातर्फे केला जात आहे. अदानी समूहाला त्यासाठी खास सवलती सरकारने दिल्या आहेत. या जागेला सोन्याचा भाव आला आहे. यामुळे या ठिकाणी धारावीतील लोकांप्रमाणे पोलीस, गिरणी कामगार, सरकारी कर्मचाऱ्यांना घरे मिळाली पाहिजे. या ठिकाणचा टीडीआर मुंबईभर वापरण्याची मुभा दिली जात आहे. मग टीडीआरची सक्ती करणार असाल तर अदानी यांना का देत आहे, असा प्रश्न शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी विचारला आहे.

मग गुन्हा दाखल करणार का?

अदानी यांना टीडीआर बँक देणार असेल तर राज्य सरकारने स्वत:ची कंपनी स्थापन करुन धारावीचा विकास करावा. धारावीचा टीडीआर कुठेही वापरता येईल याचा अर्थ अदानी यांचे घर कसे भरता येईल, याचा विचार केलेला दिसत आहे. यामुळे ही टीडीआर बँक सरकारची असली पाहिजे. अदानींची टीडीआर बँक आम्हाला मान्य नाही. कारण टीडीआर किती वापरणार आहात, त्याचा दुरुपयोग झाला तर… मग अदानींवर गुन्हा दाखल होणार का? त्यांना तुरुंगात टाकणार का? असा प्रश्न शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी विचारला आहे.

हे सुद्धा वाचा

निवडणूक आयोगास हे मान्य आहे का?

पाच राज्यांच्या निवडणुकीत जे जिंकले त्यांचे अभिनंदन. परंतु या निमित्ताने एक प्रश्न निर्माण होत आहे. मी निवडणूक आयोगाला पत्र लिहिले होते. निवडणूक प्रचारात देवाच्या नावाने किंवा धर्माच्या नावाने मत मागितले तर गुन्हा होतो की नाही? हा प्रश्न मी विचारला आहे. कारण कर्नाटकाच्या निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बजरंगबली की जय म्हटले होते… त्यानंतर मध्य प्रदेशच्या विधाससभा निवडणुकीत अमित शाह यांनी रामलल्लाचं दर्शन मोफत देऊ असे म्हटले होते. यामुळे देवाच्या नावाने, धर्माच्या नावाने आणि देवाच्या नावाने मते मागण्यास आयोगाकडून आता होकार आहे का? हा प्रश्न आम्ही विचारला होतो. यामुळे आम्हीपण आता निवडणुकीत धर्माच्या नावाचा जयघोष करु. तेव्हा निवडणूक आयोगाने कारवाई करु नये. कारण यापूर्वी एकमेव हिंदूहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्यावर आयोगाने कारवाई केली होती. बाळासाहेबांचा मतांचा अधिकार काढला होता, याची आठवण उद्धव ठाकरे यांनी करुन दिली.

शिंदे गटाचा अजितदादांना सरकारमधून बाहेर काढण्याचा प्लान, कोणाचा आरोप
शिंदे गटाचा अजितदादांना सरकारमधून बाहेर काढण्याचा प्लान, कोणाचा आरोप.
जरांगेंविरोधात सगळा समाज उभा करायला वेळ लागणार, कोणी दिली उघड धमकी
जरांगेंविरोधात सगळा समाज उभा करायला वेळ लागणार, कोणी दिली उघड धमकी.
'सुरतलुटी वेळी शिवरायांनी पत्र लिहीले...,' काय म्हणाले जयंत पाटील
'सुरतलुटी वेळी शिवरायांनी पत्र लिहीले...,' काय म्हणाले जयंत पाटील.
रंगारी बदक चाळीच्या बाप्पाचं लंबोदर रुप पाहण्यासाठी भक्तांची रिघ
रंगारी बदक चाळीच्या बाप्पाचं लंबोदर रुप पाहण्यासाठी भक्तांची रिघ.
गडकरी यांच्या घरी कच्च्याबच्च्यांनी गणपती आणलाय...
गडकरी यांच्या घरी कच्च्याबच्च्यांनी गणपती आणलाय....
कास पठाराचा हंगाम सुरु, मोठ्यांसाठी आणि शाळकरी मुलांसाठी किती शुल्क ?
कास पठाराचा हंगाम सुरु, मोठ्यांसाठी आणि शाळकरी मुलांसाठी किती शुल्क ?.
मी फुंकलो असतो तरी राजे पडले असते, असं जरांगे म्हणाले, राऊत यांचा दावा
मी फुंकलो असतो तरी राजे पडले असते, असं जरांगे म्हणाले, राऊत यांचा दावा.
महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे नकोत, अमृता फडणवीस यांचे साकडे
महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे नकोत, अमृता फडणवीस यांचे साकडे.
गणरायाच्या आगमनाने सुखसमृद्धी येवो, एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे
गणरायाच्या आगमनाने सुखसमृद्धी येवो, एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे.
घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी, नैवेद्यासाठी 21 भाज्या खरेदीची घाई
घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी, नैवेद्यासाठी 21 भाज्या खरेदीची घाई.