Ashok chavan | ‘अशोक चव्हाण तुम्हाला तत्त्वांवर बोलण नाही शोभत’, ठाकरे गटाचा हल्लाबोल

"तुम्ही शेतकऱ्यांच इनकम डबल करणार होता. ज्या स्वामीनाथ आयोगाच्या शिफारशी लागू करु अशी मोदींची भूमिका होती. त्या स्वामीनाथन यांना भारतरत्न दिला, पण त्यांच्या शिफारशी स्वीकारल्या नाहीत, हे ढोंग आहे"

Ashok chavan | 'अशोक चव्हाण तुम्हाला तत्त्वांवर बोलण नाही शोभत', ठाकरे गटाचा हल्लाबोल
Ashok Chavan
Follow us
| Updated on: Feb 16, 2024 | 10:36 AM

नवी दिल्ली : “आम्ही हरीयाणा, पंजाबमधील शेतकऱ्यांच्या प्रमुख नेत्यांच्या संपर्कात आहोत. या आंदोलनात महाराष्ट्र काय योगदान देऊ शकतो? या बद्दल लवकरच निर्णय घेऊ” असं संजय राऊत म्हणाले. इंडिया आघाडी बनली होती, त्या तत्त्वांनुसार काम करत नाहीय अशी टीका अशोक चव्हाण यांनी केली. त्यावर संजय राऊत यांनी उत्तर दिलं. “अशोक चव्हाण सोडून गेले. अशोक चव्हाणांच्या कुटुंबाच आयुष्य काँग्रेसमध्ये गेलं. काँग्रेसने त्यांना सगळं दिलं. ते सोडून गेले. तत्वांवर बोलणं अशोक चव्हाण यांना शोभा देत नाही. या परिस्थितीत लढणारे लोक तत्त्वांवर बोलू शकतात. अशोक चव्हाण तत्त्वांबद्दल बोलले, तर लोक त्यांच्यावर हसतील” असं संजय राऊत म्हणाले. ‘अशोक चव्हाण तुम्ही जो मार्ग निवडलात, ती तुमची मजबूरी भिती आहे’ असं संजय राऊत यांनी सांगितलं.

“देशाच्या राजधानीकडे येण्यासाठी हजारो शेतकरी पंजाब, हरयाणा उत्तर प्रदेश या भागातून निघाले आहेत. त्यांना रोखण्यासाठी दिल्लीच्या सीमेवर रस्त्यावर खिळे ठोकणं, भिंती उभ्या करणं, अडथळे निर्माण करणं, सशस्त्र पोलीस तैनात करणं हे स्वतंत्र हिंदुस्थानात लोकशाहीने निवडून दिलेल्या सरकारला शोभत नाही” असं संजय राऊत म्हणाले. “शेतकऱ्यांनचा MSP चा विषय आहे. हा फक्त पंजाब, हरयाणा आणि उत्तर प्रदेशच्या शेतकऱ्यांचा विषय नाहीय. देशाच्या शेतकऱ्यांचा विषय आहे. शेतकऱ्यांच्या या आंदोलनात महाराष्ट्र कसा योगदान देऊ शकतो, त्या बद्दल विचार सुरु आहे” असं संजय राऊत म्हणाले.

‘तुम्ही शेतकऱ्यांच इनकम डबल करणार होता’

“2014 पासून सातत्याने मोदी शेतकऱ्यांना हमी भाव मिळाला पाहिजे म्हणून मागणी करत होते. ते गुजरातचे मुख्यमंत्री असताना त्यांनी अहवाल बनवला, त्यात शेतकऱ्यांना हमीभाव मिळाला पाहिजे, म्हणून शिफारस करण्यात आलीय. तुम्ही शेतकऱ्यांच इनकम डबल करणार होता. ज्या स्वामीनाथ आयोगाच्या शिफारशी लागू करु अशी मोदींची भूमिका होती. त्या स्वामीनाथन यांना भारतरत्न दिला, पण त्यांच्या शिफारशी स्वीकारल्या नाहीत, हे ढोंग आहे” अशी टीका संजय राऊत यांनी केली.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.