उद्धव ठाकरेंच्या विश्वासू आमदाराची राणेंशी चर्चा, नवीन राजकीय भूकंप का?
तळ कोकणात नवीन राजकीय भूकंप होणार का? अशा चर्चा सुरु झाल्या आहेत. कारण उद्धव ठाकरे यांच्या विश्वासू आमदाराचे राणेंसोबत चर्चेचे फोटो व्हायरल झाले आहेत. पुढच्या दोन ते तीन महिन्यात राज्यात विधानसभेच्या निवडणुका लागू शकतात. त्या पार्श्वभूमीवर उलट-सुलट चर्चा सुरु झाल्या आहेत.
राजकारणात कधीही काही होऊ शकतं, याचा नेम नाही. दोन वर्षांपूर्वी महाराष्ट्राच्या राजकारणात असाच मोठा भूकंप घडला. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेचे 40 आमदार महाविकास आघाडी सरकारमधून बाहेर पडले. त्यांनी भाजपासोबत मिळून सरकार स्थापन केलं. त्यामुळे उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री पदावरुन पायउतार व्हावं लागलं. लोकसभा निवडणुकीच्यावेळी सर्वच पक्षात मोठ्या प्रमाणात इनकमिंग आणि आऊटगोईंग झालं. 2019 च्या विधानसभा निवडणुकीनंतर महाराष्ट्राच राजकीय चित्र असं बदललय की, कुठलीही गोष्ट ठामपणे म्हणता येणार नाही. पुढच्या दोन ते तीन महिन्यात राज्यात विधानसभा निवडणुका लागू शकतात. त्याची तयारी सर्वच पक्षांकडून सुरु आहे.
महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असा सामना असेल. या निवडणुकीआधी सुद्धा मोठ्या प्रमाणात इनकमिंग-आऊटगोईंग होऊ शकतं. सध्या तळ कोकणात दोन नेत्यांमधील गुप्तगूचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने उलट-सुलट चर्चा सुरु झाल्या आहेत. महत्त्वाच म्हणजे हा नेता आमदार असून उद्धव ठाकरे यांचा विश्वासू मानला जातो. या नेत्याचे नितेश राणेंसोबत चर्चा करतानाचे फोटो व्हायरल झालेत.
त्यावेळी उद्धव ठाकरेंना साथ दिली
भाजप आमदार नितेश राणे आणि शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे आमदार राजन साळवी यांच्यामध्ये चर्चा झाली. दोघांच्या जवळीकीने राजकिय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. मुंबईतील काल सह्याद्री गेस्ट हाऊसवर मच्छीमारांच्या प्रश्नसंदर्भात बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी दोघेही एकमेकांच्या शेजारी बसले होते. त्यावेळेला दोघांमध्ये चर्चा झाली. शिवसेनेत दोन गट पडले, त्यावेळी राजन साळवी उद्धव ठाकरे यांच्यासोबत राहीले. राजन साळळी शिंदे गटात जाणार अशा बऱ्याच चर्चा झाल्या. पण ते अजूनही ठाकरे गटातच आहेत.