जेव्हा मुख्यमंत्री भर सभागृहात म्हणाले, मला लाज वाटते, नेमकं काय घडलं?

राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विधानसभा अधिवेशनात बोलताना विरोधी पक्ष भाजपच्या आरोपांना सडेतोड उत्तर देत हल्लाबोल केला.

जेव्हा मुख्यमंत्री भर सभागृहात म्हणाले, मला लाज वाटते, नेमकं काय घडलं?
देवेंद्र फडणवीस, विरोधी पक्षनेते, महाराष्ट्र
Follow us
| Updated on: Mar 03, 2021 | 4:36 PM

मुंबई : राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विधानसभा अधिवेशनात बोलताना विरोधी पक्ष भाजपच्या आरोपांना सडेतोड उत्तर देत हल्लाबोल केला. कोविडच्या परिस्थिती आणि मदतकार्याविषयी बोलताना तर आक्रमक उद्धव ठाकरे यांनी भाजपच्या कृत्याची लाज वाटते असं संतापजनक वक्तव्यही केलं. महाराष्ट्राला कोविड काळात कोरोना नियंत्रणासाठी उपाययोजना करण्यासाठी आणि सोयीसुविधा देण्यासाठी आर्थिक गरज असताना भाजपच्या नेत्यांनी महाराष्ट्राला मदत न करता पैसे दिल्लीला पाठवले, असं नमूद करत त्यांनी हल्ला चढवला (Uddhav Thackeray criticize BJP for donating PM Care not Maharashtra during Covid time).

उद्धव ठाकरे म्हणाले, “ज्यावेळी महाराष्ट्रातील जनेतासाठी कोविड काळात उपाययोजना कराव्या लागल्या, सेवासुविधा देण्यासाठी आपण अर्थसंकलन सुरु केलं, तेव्हा मला थोडी लाज वाटते की त्यावेळी भाजपच्या आमदारांचा फंड महाराष्ट्रासाठी न येता दिल्लीकडे गेला. मुख्यमंत्री मदत निधी मला नको होतो, महाराष्ट्रासाठी हवा होता. माझ्यासाठी माझ्या मातापित्यांची आणि जनताजनार्दनाच्या आशीर्वादाची पुण्याई माझ्यासाठी आहे. ज्यांनी ज्यांनी महाराष्ट्रासाठी कोविड काळात आर्थिक मदत केली त्यांचे धन्यवाद आहे.”

“केंद्र सरकारच्या पीएम केअर फंडचा हिशोब कोण मांडणार?”

“महाराष्ट्रात भाजप जी पोलखोल करत आहे ती पोलखोल नाहीच आहे. महाराष्ट्रात पोलला, निवडणुकीला वेळ आहे, पण केंद्र सरकारच्या पीएम केअर फंडचा हिशोब कोण मांडणार? कोण देणार? त्याचा हिशोब विचारायचा नाही का? ते उत्तर द्यायला बांधिल नाहीत. कारण ते महनीय व्यक्ती आहेत. त्यांच्याकडचा फंड तुमच्या चौकशीच्या फेऱ्यात येत नाही. काय वाटेल तितकं आपटा तुम्ही, वाटेल तितकं बोंबला तुम्हाला उत्तर देणार नाही,” असंही उद्धव ठाकरे यांनी नमूद केलं.

“भाजपमध्ये कुणाकडेही प्रश्न विचारण्याची हिंमत नाही, प्रश्न विचारला तर देशद्रोही ठरवलं जातंय”

“एकतर कुणामध्ये प्रश्न विचारण्याची हिंमत नाही. जर विचारला तर देशद्रोही ठरवलं जातंय. काय ही परिस्थिती आली आहे की लोकांनाही आता कळायला लागलंय की प्रश्न विचारला की देशद्रोह. ही इथली लोकशाही, असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी मोदी सरकारवर थेट हल्ला चढवला.

संबंधित बातम्या :

नारायण भंडारी, माधव भंडारी, मुख्यमंत्र्यांचा एकेरी उल्लेख आणि फडणवीसांची दिलगिरी

सुधीरभाऊंचं भाषण पाहिलं आणि नटसम्राट आठवला, पण कुणी किंमत देता का किंमत अशी स्थिती, मुख्यमंत्र्यांचे फटकारे

औरंगाबादचं संभाजीनगर असं नामकरण करणारच, उद्धव ठाकरेंचा पुनरुच्चार

व्हिडीओ पाहा :

Uddhav Thackeray criticize BJP for donating PM Care not Maharashtra during Covid time

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.