Uddhav Thackeray : शिवसेना कुणाची? उद्धव ठाकरे म्हणतात, बाळासाहेबानंतरही 63 आमदार एकहाती आणले
Uddhav Thackeray Facebook live : मी काय नेमकं वेगळं केलं? की बाळासाहेबांची शिवसेना राहिली नाही? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित दिलाय.
मुंबई : शिवसेना आमदार (Shiv sena MLA) फुटल्यानंतर शिवसेना कुणाची? असा पक्ष उपस्थित झाला. या प्रश्नावर उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray FacebooK Live) व्हिडीओ कॉन्फरन्सिंगने संवाद साधत उत्तरं दिलं. बाळासाहेबांनंतरही शिवसेने 63 आमदार एकहाती निवडून आणले, असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी आकड्यांचा हवाला दिला. आता बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना राहिली नाही असं काही लोक भासवत आहेत. मी काय नेमकं वेगळं केलं? की बाळासाहेबांची शिवसेना (Maharashtra News) राहिली नाही? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित दिलाय. बाळासाहेब गेल्यानंतर 2014ची एकाकी लढलो. तेव्हाही तेच होतो. आताही तसाच होतो. तेव्हा 63 आमदार आले. तेव्हाही मंत्री होते. आता मंत्रिमंडळात तेच मंत्री आहेत. मधल्या काळानंतर जे काही मिळालं ते बाळासाहेबांच्या शिवसेनेने दिलं, हे लक्षात ठेवा, असंही त्यांनी म्हटलंय.
हे सुद्धा वाचाView this post on Instagram
मी उठतो, तुम्ही बसा
मला कोणताही मोह नाही. शिवसेनेतल्या कोणत्याही एकाला मुख्यमंत्री व्हायचं असेल, तर त्यांनी यावं आणि मला सांगावं, की तुम्ही मुख्यमंत्री म्हणून नालायक आहात, तर मी उठतो, तुम्ही बसा. मी राजीनामा द्यायला तयार आहे. तसं असेल तर मी वर्षावरुन आजच माझा मुक्काम हलवतो आणि मातोश्रीवर जातो, असंही त्यांनी म्हटलंय. मला खुर्चीचा मोह नाही, असंही त्यांनी म्हटलंय.
ओपन चॅलेंज
जे आमदार गायब आहेत, त्यांनी यावं आणि माझ्या राजीनाम्याचं पत्र घेऊन राजयभवनात जावं, असं ओपन चॅलेंज देण्यात आलंय. आता गायब झालेले शिवसेना आमदार उद्धव ठाकरे यांचे हे आव्हान स्वीकरतात का, हे पाहणंही महत्त्वाचंय. मी पक्षप्रमुख पदही सोडायला तयार आहे, असंही मी सांगायला तयार आहे. मी माझ्या शिवसैनिकांना बांधिल आहे. जर माझ्याऐवजी शिवसेनेचा मुख्यमंत्री होत असेल, तर मला समोर येऊन सांगा. पण इथून-तिथून मी हे मान्य करुन घेणार नाही.
शिवसेनेच्या बंडखोर आमदारांनी भाजपसोबत जाण्यासाठी जी कारणं सांगितली होती, त्या सगळ्या कारणांना थेट उत्तर उद्धव ठाकरे यांनी आपल्या संबोधनातून दिलंय. याला आता एकनाथ शिंदे या उत्तर देतात हे पाहणं महत्त्वाचंय. तसंच शिवसेना आमदार आता नेमकी काय भूमिका घेतात हे ही पाहणं महत्त्वाचंय.