Uddhav thackeray : काँग्रेसच्या जाहीरनाम्यात मुस्लिमांना जास्त प्राधान्य, त्या प्रश्नावर उद्धव ठाकरे यांचं हे उत्तर
Uddhav thackeray : "महाविकास आघाडीतर्फे संयुक्त वचननामा प्रसिद्ध करण्याविषयी त्यांनी सूतोवाच केलं. काँग्रेस पक्षाने चांगला, सर्वसमावेशक जाहीरनामा प्रसिद्ध केलाय. त्यात महाराष्ट्रासाठी काही चांगल्या गोष्टी असतील, तर त्याचा समावेश करु" असं उद्धव ठाकरे म्हणाले.
ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत आज मशाल चिन्हाच्या गीताच लॉन्चिंग झालं. त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तर दिली. “मशाल चिन्हाने आम्ही अंधेरी पोटनिवडणुकीपासून विजयी सुरुवात केली आहे. मशाल नुसतं चिन्ह नाही, सरकार विरुद्ध असंतोष मशालीच्या रुपाने भडकणार. हुकूमशाही, जुमलेबाजी जळून भस्म होईल” असा विश्वास उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला. त्यांनी शिवसैनिकांना मशालीच चिन्ह मतदारांपर्यंत घेऊन जाण्याच आवाहन केलं.
महाविकास आघाडीतर्फे संयुक्त वचननामा प्रसिद्ध करण्याविषयी त्यांनी सूतोवाच केलं. काँग्रेस पक्षाने चांगला, सर्वसमावेशक जाहीरनामा प्रसिद्ध केलाय. त्यात महाराष्ट्रासाठी काही चांगल्या गोष्टी असतील, तर त्याचा समावेश करु. राज्यासाठी काही महत्त्वाचे विषय असतील, मुद्दे असतील, तर त्याचा समावेश वचन नाम्यात करु असं उद्धव ठाकरे म्हणाले.
मुस्लिम लीगचा अनुभव भाजपाला जास्त
काँग्रेसचा जाहीरनामा मुस्लिम समजाला, एका समुदायाला प्राधान्य देणारा आहे, असं सत्ताधाऱ्यांकडून बोलल जातय. त्यावर उद्धव ठाकरे म्हणाले की,”मी जस म्हटलं, तस मुस्लिम लीगचा अनुभव भाजपाला जास्त आहे. जनसंघाचे संस्थापक श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी स्वातंत्र्यपूर्व काळात 1940-42 मध्ये स्वातंत्र्यासाठी लढणारी काँग्रेस नको, म्हणून पश्चिम बंगालमध्ये मुस्लिम लीगसोबत सरकार स्थापन केलं. त्यामुळे ते जुनं नात कायम असू शकतं. मागच्या काही दिवसात आरएसएस प्रमुख मोहन भागवत जामा मशिदीत गेल्याचे फोटो आले. नरेंद्र मोदी सुद्धा मशिदीत गेले होते”