PM Modi on Uddhav Thackeray : ‘उद्धव ठाकरे माझे शत्रू नाहीत, उद्या संकट आलं तर मदतीला पहिले धावून जाईन’, नरेंद्र मोदींचं मोठं वक्तव्य

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या या मुलाखतीने महाराष्ट्राच्या राजकारणात दुरगामी परिणाम पडतात का? ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. कारण देशात सध्या लोकसभा निवडणूक सुरु आहे. त्यानंतर लगेच सहा महिन्यांनी विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. अशा वातावरणात नरेंद्र मोदींनी टीव्ही 9 च्या मुलाखतीत 'उद्धव ठाकरे माझे शत्रू नाहीत, उद्या संकट आलं तर मदतीला पहिले धावून जाईन' असं महत्त्वाचं आणि मोठं वक्तव्य केलं आहे.

PM Modi on Uddhav Thackeray : 'उद्धव ठाकरे माझे शत्रू नाहीत, उद्या संकट आलं तर मदतीला पहिले धावून जाईन', नरेंद्र मोदींचं मोठं वक्तव्य
नरेंद्र मोदी यांचं उद्धव ठाकरे यांच्याबद्दल मोठं वक्तव्य
Follow us
| Updated on: May 02, 2024 | 9:33 PM

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील सर्वात मोठं न्यूज नेटवर्क TV9 ला एक्सक्लूझिव्ह मुलाखत दिली. या मुलाखतीत नरेंद्र मोदी यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासोबत असलेल्या आपल्या मैत्रीच्या नात्याबाबत भाष्य केलं आहे. ‘टीव्ही 9 मराठी’चे व्यवस्थापकीय संपादक उमेश कुमावत यांच्यासह TV9 ग्रुपच्या पाच व्यवस्थापकीय संपादकांनी ही मुलाखत घेतली आहे. या मुलाखतीत महाराष्ट्राचं राजकारणाबाबत नरेंद्र मोदी यांना प्रश्न विचारण्यात आला. “महाराष्ट्रात विरोधी पक्षाबाबत संभ्रम आहे. शिवसेना फुटली आहे, राष्ट्रवादी फुटली आहे, काँग्रेसचे काही नेते इकडे तिकडे गेले आहेत. शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्याकडे भावनिक मुद्दा आहे. भाजपसमोर महाराष्ट्रात भावनिक मुद्दा मोठं आव्हान आहे असं वाटतंय का?”, असा प्रश्न नरेंद्र मोदी यांना विचारण्यात आला. यावेळी उत्तर देताना नरेंद्र मोदी यांनी उद्धव ठाकरे यांच्याबाबत असलेल्या आपल्या भावनिक नात्याबाबत माहिती दिली.

‘उद्धव ठाकरे आजारी होते तेव्हा मी…’

“दोन गोष्टी आहेत. उद्धव ठाकरे हे बायोलॉजिकली बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव आहेत. तो माझा विषयच नाही. ते आजारी होते. तेव्हा मी त्यांना फोन केला होता. मी वहिनीला रोज फोन करून विचारायचो. ऑपरेशन पूर्वी त्यांनी मला फोन केला होता. म्हणाले, भाईसाब काय सल्ला आहे? मी म्हटलं, तुम्ही ऑपरेशन करा. बाकी चिंता सोडा. आधी शरीराकडे लक्ष द्या. बाळासाहेबांचा मुलगा म्हणून मी त्यांचा मान सन्मान करणारच. ते माझं शत्रू नाहीत. उद्या संकट आलं तर त्यांना मदत करणारा मी पहिला व्यक्ती असेल. एक कुटुंब म्हणून. पण बाळासाहेबांचे विचार आहे. त्यासाठी मी जगेल”, अशी भावनिक प्रतिक्रिया नरेंद्र मोदी यांनी दिली.

‘मी ते कर्ज कधीच विसरु शकत नाही’

“बाळासाहेबांचं माझ्यावर अतिशय प्रेम होतं. मी ते कर्ज कधीच विसरु शकत नाही. कर्ज विसरु शकत नाही. आमच्याकडे सर्वाधिक आमदार आहे. तरीही शिवसेनेचा मुख्यमंत्री आहे. ती मी बाळासाहेबांना वाहिलेली श्रद्धांजली आहे. आम्ही मागच्या निवडणुकीत आमनेसामने लढलो होतो. मी त्या निवडणुकीत बाळासाहेबांबद्दल एक शब्दही बोललो नव्हतो. मी जाहीरपणे म्हणाालो होतो की, मला उद्धव ठाकरेंनी कितीही शिव्या दिल्या तरी मी बोलणार नाही. कारण माझी बाळासाहेबांवर श्रद्धा आहे. त्यामुळे त्यांच्या कौटुंबीक समस्या काय आहेत, तो माझा विषय नाही. पण मी बाळासाहेबांचा प्रचंड आदर करतो. आणि आयुष्यभर मी त्यांचा आदर करत राहीन”, असं नरेंद्र मोदी म्हणाले.

उद्धव ठाकरेही म्हणाले होते, ‘मोदी माझे शत्रू नाहीत’

विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वी उद्धव ठाकरे यांनीदेखील भाषणात नरेंद्र मोदी यांच्याबद्दल असंच वक्तव्य केलं होतं. नरेंद्र मोदी माझे शत्रू नाहीत, असं उद्धव ठाकरे म्हणाले होते. त्यानंतर आता टीव्ही 9 च्या मुलाखतीत मोदींनी उद्धव ठाकरे माझे शत्रू नाहीत, असं म्हटलं आहे.

बीडमध्ये हैवानालाही लाजवणारा खून, नव्या एसपी कावत यांच्यापुढे आव्हान
बीडमध्ये हैवानालाही लाजवणारा खून, नव्या एसपी कावत यांच्यापुढे आव्हान.
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.