उद्धव ठाकरे बोलून दाखवतो ते करुन दाखवते, त्याला आता मोदीच साक्ष…का म्हणाले उद्धव ठाकरे
uddhav thackeray | अशोक चव्हाण यांचे वडील शंकराव चव्हाण, श्रीकांत शिंदे यांचे वडील एकनाथ शिंदे आणि अजित पवार हे तर घराणेशाहीचे प्रॉडक्ट आहे. ही तीन पाट लोक तुम्हाला चालतात. परंतु हिंदुत्ववादी शिवसेनेची घराणेशाही चालत नाही.
कोपरगाव, शिर्डी, मनोज गाडेकर, दि. 14 फेब्रुवारी 2024 | चुकीला माफी असते मात्र गुन्हयाला माफी नसते. मागील वेळेस तुम्हाला हा खासदार नको होता. परंतु शिवसेने दिला म्हणून तुम्ही निवडून दिला. आता त्याला गाडलेच पाहिजे. भगव्याबरोबर अनेकांनी गद्दारी केली. त्यानंतर भगवा तेजाने उभा राहिला आहे, अशी जोरदार टीका शिवसेना उभाठा पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली. यावेळी त्यांनी शिंदे गटाचे खासदार सदाशिव लोखंडे यांचे नाव न घेता जोरदार हल्ला केला. त्याच्या हल्ल्यातून पंतप्रधान नरेंद्र मोदी सुटले नाही. आम्ही केलेल्या कामांचे उद्धाटन करण्यासाठी नरेंद्र मोदी येत असल्याचा आरोप उद्धव ठाकरे यांनी केला.
मोदी साक्ष…असे का म्हणाले उद्धव ठाकरे
निळकंठे धरणास पाण्याचा विषय कोणी सोडवला. त्यासाठी पैसे आम्ही दिले. आता काही दिवसांत पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्धाटनासाठी येतील. मुंबईतील वरळी ते मरीन ड्राइव्ह म्हणजेच मुंबई कोस्टल रोड प्रकल्प मुंबई मनापच्या पैशांतून उभा राहिला आहे. तो प्रकल्प आमचा आहे. त्यासाठी नरेंद्र मोदी येणार असल्याचे सांगितले जात आहे. म्हणजे मोदी उद्धव ठाकरे यांच्या कामाला साक्ष ठरत असल्याचा टोला उद्धव ठाकरे यांनी लगावला.
ही घराणेशाही नाही का
अशोक चव्हाण यांचे वडील शंकराव चव्हाण, श्रीकांत शिंदे यांचे वडील एकनाथ शिंदे आणि अजित पवार हे तर घराणेशाहीचे प्रॉडक्ट आहे. ही तीन पाट लोक तुम्हाला चालतात. परंतु हिंदुत्ववादी शिवसेनेची घराणेशाही चालत नाही. हो माझी घराणेशाहीच, घराणे आहे. उद्धव बाळासाहेब ठाकरे ही माझी घराणेशाही आहेच. माझ्यावर आरोप करणारे घराणेदाज नाही. त्यांच्या कुटुंबाचा पत्ता नाही. ते आरोप करत आहे. जर शिवसेना प्रमुखांनी मोदीं यांच्या पाठीवर हात ठेवला नसते तर आज मोदी दिसले नसते, असा हल्ला उद्धव ठाकरे यांनी केला.
स्वामीनाथन आयोगाच्या शिफारस का लागू नये
स्वामीनाथन यांना भारतरत्न दिला. पण त्यांच्या आयोगाने शेतकऱ्यांसाठी शिफारस केलेल्या गोष्टी लागू केल्या का ? तिकडे दिल्लीत शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. जे सैनिक देशासाठी लढतात त्यांना शेतकऱ्यांच्या विरोधात उभे केले जात आहे. मन की बात, जन की बात, ऐकले जात नाही. स्वाभिनाथन यांना राष्ट्रपती करा असे आम्ही म्हणत होतो. परंतु ते केले नाही. आता जात – पात धर्म बाजूला ठेवून तुम्ही देशाचा तिरंगा आणि लोकशाही टिकवण्यासाठी एकत्र यायला हवे. लोकसभा आणि विधानसभेला शिवसेनाच वाघच निवडून येईल.