पंतप्रधान मोदी पुंगी वाजवतात अन् अंधभक्त डोलतात, जे डोलत नाही त्यांना… दैनिक ‘सामना’तून जहरी टीका

एखाद्याला काँग्रेसने सापाची पदवी दिली तर एवढे उसळायची गरज काय? मोदींना शंकराचा अवतार म्हटलं जातं. मग साप गळ्यात घालून विष पचवणाऱ्या शंकराशी तुलना होताच राजकीय तांडव करण्याची गरज काय? असा सवाल 'सामना'तून करण्यात आला आहे.

पंतप्रधान मोदी पुंगी वाजवतात अन् अंधभक्त डोलतात, जे डोलत नाही त्यांना... दैनिक 'सामना'तून जहरी टीका
mallikarjun kharge Image Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Apr 29, 2023 | 7:42 AM

मुंबई : काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तुलना सापाशी केली आहे. त्यामुळे भाजप आणि काँग्रेस आमनेसामने आले आहेत. भाजपने या मुद्द्यावरून काँग्रेसला घेरलं आहे. तर या वादात ठाकरे गटाने उडी घेत काँग्रेसची पाठराखण केली आहे. साप हा शेतकऱ्यांचा मित्रच आहे. साप हा शेतीचा राखणदार आहे. तसेच भगवान शंकराच्या गळ्यातही सापच आहे. भाजपचे लोक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना शंकराचा अवतार मानतात. मग सापाचा एवढा तिटकारा का? असा सवाल ठाकरे गटाने केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी पुंगी वाजवतात आणि अंधभक्त त्यावर डोलतात, अशी खोचक टीकाही ठाकरे गटाने केली आहे. दैनिक ‘सामना’तील अग्रलेखातून ही टीका करण्यात आली आहे.

शंकराने विष पचवले म्हणून तो निळकंठ झाला. काही लोकांना पंतप्रधान मोदी हे विष्णू आणि शंकराचे आवतार वाटतात. मग साप गळ्यात घालून विष पचवणाऱ्या शंकराशी तुलना होताच राजकीय तांडव करण्याची गरज काय? असा सवाल करतानाच भाजपच्या जिभांतील विषामुळे आपल्या देशातील लोकशाही, स्वातंत्र्य गतप्राण झाले आहे. न्यायालये, संसद आणि सर्व घटनात्मक संस्थांना सापांचा विळखा पडला आहे. लोकशाहीच्या नावाने मोदी रोज पुंगी वाजवतात. त्यावर अंधभक्त डोलतात. जे डोलत नाहीत त्यांना देशद्रोही ठरवून छळले जात असल्याची घणाघाती हल्ला ‘सामना’च्या अग्रलेखातून करण्यात आला आहे.

हे सुद्धा वाचा

खरगेंचं समर्थन

भाजपच्या जहरावर कुणी टीका केली असेल तर भाजपने त्यावर आत्मचिंतन करण्याची गरज आहे. महाराष्ट्रात आम्हीही 30 वर्ष सापाला दूध पाजले. ते पिल्लू तेव्हा वळवळ करत होते. आता आमच्यावर फुत्कारत आहे, अशी जहरी टीकाही अग्रलेखातून करण्यात आली आहे. जेव्हा आपला जीव धोक्यात असतो तेव्हाच साप चावतो. पण दुष्य माणूस पावलोपावली तुमचे नुकसान करत असोत. त्यामुळे अशा लोकांपासून सावध राहिलेच पाहिजे. अशा लोकांवर तुम्ही विश्वास ठेवू नका, असंच खरगे यांना म्हणायचे आहे, असा दावा अग्रलेखातून करणअयात आला आहे.

उसळायची गरज काय?

या अग्रलेखातून सापाचं महत्त्वही सांगण्यात आलं आहे. साप हा शेतकऱ्याचा मित्र आहे. शेतीचा राखणदार आहे. नागराज आणि सापराज हे हिंदू धर्मात श्रद्धेच्या स्थानी आहेत. त्यांची पूजा केली जाते. त्याच्यात विष असूनही पूजा केली जाते. त्यामुळे सापाची पदवी एखाद्याला दिल्यास त्याने उसळायची गरज काय? असा संतप्त सवाल करण्यात आला आहे. साप म्हणजे सोवळ्यातला ब्राह्मण आहे असं वर्णन विनोबा भावेंनी केले होते, याकडेही अग्रलेखातून लक्ष वेधण्यात आलं आहे.

भाजपचा विषाचा महायज्ञ

साप उगाच कुणाच्या वाटेला जात नाही. त्याच्या शेपटीवर पाय पडल्याशिवाय तो फणा काढत नाही. पण सापांपेक्षाही माणसांच्या जिव्हांतले विष भयंकर आहे आणि न उतरणारे आहे, असंही अग्रलेखातून म्हटलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात भाजपने विषाचा महायज्ञ मांडला आहे. भाजपचे लोक देशद्रोही फुत्कार सोडत असल्याची टीकाही करण्यात आली आहे.

Non Stop LIVE Update
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.
'मुंडे 12 वर्ष वनवासात, बऱ्याच गोष्टी इच्छेविरुद्ध...',अंधारेंचा टोला
'मुंडे 12 वर्ष वनवासात, बऱ्याच गोष्टी इच्छेविरुद्ध...',अंधारेंचा टोला.
अजितदादांची शरद पवारांकडून पुन्हा भरसभेत नक्कल अन्..., बघा व्हिडीओ
अजितदादांची शरद पवारांकडून पुन्हा भरसभेत नक्कल अन्..., बघा व्हिडीओ.
रामटेकमध्ये वाद पेटला; 'सुनील केदार मारूतीच्या बेंबीतील विंचू अन्..'
रामटेकमध्ये वाद पेटला; 'सुनील केदार मारूतीच्या बेंबीतील विंचू अन्..'.
2014 नंतर मला त्या बाबत कोणी विचारले नाही...राज ठाकरे यांनी सांगितले..
2014 नंतर मला त्या बाबत कोणी विचारले नाही...राज ठाकरे यांनी सांगितले...
मुख्यमंत्रिपदावरून विनोद तावडेंचं वक्तव्य, दिल्लीत कोणता चेहरा फिक्स?
मुख्यमंत्रिपदावरून विनोद तावडेंचं वक्तव्य, दिल्लीत कोणता चेहरा फिक्स?.
अमित ठाकरेंविरोधात सरवणकर भिडल्या, देशपांडेंवरही निशाणा, 'लाथ घालून..'
अमित ठाकरेंविरोधात सरवणकर भिडल्या, देशपांडेंवरही निशाणा, 'लाथ घालून..'.
बटेंगे तो कटेंगेच्या वक्तव्यावरून पंकजा मुंडेंचा यू-टर्न? म्हणाल्या...
बटेंगे तो कटेंगेच्या वक्तव्यावरून पंकजा मुंडेंचा यू-टर्न? म्हणाल्या....
'पंकजाताईंनी मोठ मन केल म्हणून मी...', सभेतून धनंजय मुंडे काय म्हणाले?
'पंकजाताईंनी मोठ मन केल म्हणून मी...', सभेतून धनंजय मुंडे काय म्हणाले?.
चित्रपटात काम केलं असत.., सदा सरवणकरांच्या मुलीचा अमित ठाकरेंना टोला
चित्रपटात काम केलं असत.., सदा सरवणकरांच्या मुलीचा अमित ठाकरेंना टोला.