Eknath Shinde : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज धाराशिवमध्ये, त्याआधी ठाकरे गटाला मोठा धक्का

Eknath Shinde : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज धाराशिवमध्ये येत आहेत. त्याआधी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे. आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांच्या राष्ट्रवादीबाबतच्या विधानानंतर अजित पवार आजच्या कार्यक्रमाला उपस्थित राहणार का याकडे लक्ष लागले आहे.

Eknath Shinde : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज धाराशिवमध्ये, त्याआधी ठाकरे गटाला मोठा धक्का
एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे
Follow us
| Updated on: Sep 14, 2024 | 11:38 AM

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांच्या धाराशिवमधील परांडा विधानसभा मतदारसंघात येणार आहेत. त्याआधी ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. आगामी विधानसभा निवडणूक जवळ आली आहे. दिवाळीनंतर महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीसाठी मतदान होऊ शकते. महाराष्ट्रात महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असा सामना आहे. लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीने बाजी मारली. 48 पैकी 31 लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीचे उमेदवार जिंकले. भाजपा, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या महायुतीतील पक्षांना अवघ्या 17 जागांवर समाधान मानाव लागलं. लोकसभा निवडणुकीनंतर काही महिन्यात विधानसभा निवडणूक होत असल्याने महाविकास आघाडीमध्ये उत्साह आहे. कारण वातावरण आपल्या अनुकूल आहे असा मविआचा दावा आहे.

विधानसभा निवडणुकीआघी दोन्ही आघाड्यांमध्ये मोठ्या प्रमाणात इनकमिंग-आऊटगोईंग होऊ शकतं. त्याची सुरुवातही झाली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज धाराशिवमध्ये येत आहेत. त्याआधी ठाकरे गटाला एक मोठा झटका बसला आहे. शिवसेना ठाकरे गटाचे कळंब तालुकाप्रमुख शिवाजी कापसे यांनी राजीनामा दिला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत परंडा येथे ते शिवसेनेत पक्ष प्रवेश करणार आहेत. धाराशिव विधानसभा मतदारसंघात शिवाजी कापसे निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत.

आजच्या कार्यक्रमाला अजित पवार येणार का?

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांच्या परांडा विधानसभा मतदारसंघात येणार आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचे कार्यक्रम पत्रिकेत नाव आहे. आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांच्या राष्ट्रवादीबाबतच्या विधानानंतर अजित पवार कार्यक्रमाला उपस्थित राहणार का याकडे लक्ष लागले आहे. महिला सशक्तीकरण अभियानाच्या लाडकी बहीण योजनेच्या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज धाराशिव जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. लाडकी बहिणी योजनेच्या लाभार्थी महिलांशी मुख्यमंत्री संवाद साधणार आहेत. आरोग्य मंत्री तानाजी सावंत आज ‘राईट टू हेल्थ’ अभियानाची घोषणा करण्याची शक्यता आहे. लाडकी बहिणी योजनेच्या कार्यक्रमाद्वारे आरोग्य मंत्री तानाजी सावंत आज जोरदार शक्तीप्रदर्शन करतील.

भाजपचं ठरलं? विधानसभा निवडणुकीत 'इतक्या' जागा लढवणार
भाजपचं ठरलं? विधानसभा निवडणुकीत 'इतक्या' जागा लढवणार.
'महाराष्ट्र विकणाऱ्यांमध्ये शिंदेंचं नाव वर...', कोणी केला हल्लाबोल?
'महाराष्ट्र विकणाऱ्यांमध्ये शिंदेंचं नाव वर...', कोणी केला हल्लाबोल?.
अजित पवार गट भाजप नेत्यांची दिल्लीत तक्रार करणार, पण कारण नेमकं काय?
अजित पवार गट भाजप नेत्यांची दिल्लीत तक्रार करणार, पण कारण नेमकं काय?.
एकनाथ खडसेंचा चाकणकरांना खोचक टोला; म्हणाले, 'दुसऱ्याच्या घरात...'
एकनाथ खडसेंचा चाकणकरांना खोचक टोला; म्हणाले, 'दुसऱ्याच्या घरात...'.
चाकणकर अन् रोहिणी खडसेंमध्ये पुन्हा जुंपली, शाब्दिक वॉर बापापर्यंत...
चाकणकर अन् रोहिणी खडसेंमध्ये पुन्हा जुंपली, शाब्दिक वॉर बापापर्यंत....
मनोज जरांगे पाटलांची प्रकृती खालावली, आमरण उपोषण सुरूच
मनोज जरांगे पाटलांची प्रकृती खालावली, आमरण उपोषण सुरूच.
'मी मुख्यमंत्रिपदाचा चेहरा', जितेंद्र आव्हाड नेमकं काय म्हणाले?
'मी मुख्यमंत्रिपदाचा चेहरा', जितेंद्र आव्हाड नेमकं काय म्हणाले?.
तिकीट कन्फर्म! जागावाटपासंदर्भात बैठक,दादांकडून विद्यमान आमदारांना हमी
तिकीट कन्फर्म! जागावाटपासंदर्भात बैठक,दादांकडून विद्यमान आमदारांना हमी.
पुण्यात यंदा तब्बल 'इतके' तास विसर्जन मिरवणूक, 2 वर्षांचा रेकॉर्ड कायम
पुण्यात यंदा तब्बल 'इतके' तास विसर्जन मिरवणूक, 2 वर्षांचा रेकॉर्ड कायम.
'पोरांनो...'त्या' भानगडीत पडू नका', इंदुरीकरांचा तरूणांना काय सल्ला?
'पोरांनो...'त्या' भानगडीत पडू नका', इंदुरीकरांचा तरूणांना काय सल्ला?.