Uddhav Thackeray : ठाकरेंनी सांगितलं तुम्हाला वाटेल ते करा, मग शिंदे गटात गेलो, श्रीरंग बारणेंचं स्पष्टीकरण

शिवसंपर्कचा अहवाल देखील दिला त्यात सुद्धा ही मागणी पुढे आली होती, उद्धव ठाकरेंशी शेवटपर्यंत चर्चा करत होतो. मात्र त्यांनी सांगितलं तुम्हांला योग्य वाटेल ते करा मग शिंदे गटात जायचा निर्णय घेतला, असे स्पष्टीकरण बारणे यांनी दिलं आहे.

Uddhav Thackeray : ठाकरेंनी सांगितलं तुम्हाला वाटेल ते करा, मग शिंदे गटात गेलो, श्रीरंग बारणेंचं स्पष्टीकरण
ठाकरेंनी सांगितलं तुम्हाला वाटेल ते करा, मग शिंदे गटात गेलो, श्रीरंग बारणेंचं स्पष्टीकरणImage Credit source: tv9
Follow us
| Updated on: Jul 22, 2022 | 5:04 PM

पुणे : शिंदे गटात गेलेले शिवसेनेचे (Shivsena MP) मावळचे खासदार श्रीरंग बारणे (Shrirang Barane) यांचं विमानतळावर जोरदार स्वागत झालं. बारणे यांचे समर्थक मोठ्या संख्येने पुणे विमानतळावर जमले होते. दिल्लीहून पुण्यात पोहोचतात श्रीरंग बारणे यांनी त्यांची शिंदे गटात जाण्याविषयीची भूमिका स्पष्ट केली. भाजप सोबत युती पाहीजे ही आमची भूमिका होती, वारंवार ही मागणी केली. मात्र मविआ आली. राष्ट्रवादीला सेनेला संपवायचं आहे म्हणून हे पाऊल उचललं. मी मावळ मध्ये पवार परिवारातल्या माणसालाला मोठ्या मताधिक्याने हरवलं. शिंदे सोबत जाण्याबाबत ठाकरेंना (Uddhav Thackeray) मेसेज केला. त्यांचा फोन आला. त्यात युतीची मागणी केली. शिवसंपर्कचा अहवाल देखील दिला त्यात सुद्धा ही मागणी पुढे आली होती, उद्धव ठाकरेंशी शेवटपर्यंत चर्चा करत होतो. मात्र त्यांनी सांगितलं तुम्हांला योग्य वाटेल ते करा मग शिंदे गटात जायचा निर्णय घेतला, असे स्पष्टीकरण बारणे यांनी दिलं आहे.

माझ्या विजयात जास्त वाटा हा भाजपचा

तसेच मावळ राष्ट्रवादीला सोडण्याची मागणी आहे, पण त्यावर सेनेने विरोध केला नाही, तसं होऊ शकते असं वाटलं. परंतु शिंदे गटात जाण्याचा त्याच्याशी संबंध नाही, असेही त्यांनी स्पष्ट केलं आहे. तसेच माझ्या विजयात भाजपचा 60 ते 70 टक्के वाटा होता, त्यामुळे कोर्टाचा निर्णय विरोधात गेला तर कोर्टाच्या निर्णयाचं पालन करणार, आमचा निर्णय झालेला आहे, आता संजय राऊत सतत काहीतरी बोलायचे. त्यामुळं या फुटील त्यांना जबाबदार धरलं जात आहे, असे म्हणात त्यांनी यावेळी राऊतांवरही निशाणा साधला आहे.

मी ईडीला घाबरत नाही

तर मला ED ची भीती नाही. भीतीमुळे भाजपसोबत गेलो असे नाही. पिंपरी चिंचवड मध्ये माझ्या विरोधात आंदोलन झालं. काही प्रमाणात उद्रेक असतो. मी 28 वर्षे राजकारणात आहे. माझ्या घरासमोर आंदोलन करण्याची आजवर कुणाची ताकद झाली नाही आणि होणार नाही, असा इशारीही त्यांनी दिला आहे.

अनेक नेत्यांनी ठाकरेंची साथ सोडली

आधी अनेक आमदारांनी ठाकरेंची साथ सोडली, त्यामुळे सरकार पडलं. राज्यात नवं सरकार आलं. मात्र त्यानंतर अनेक ठिकाणचे पदाधिकारीही आणि कार्यकर्तेही त्यांची साथ सोडत आहे. त्यामुळे त्यांच्या अडचणी वाढत चाललेल्या असातनाच आता खासदारही शिंदे गटात गेल्याने ठाकरेंची ताकद ही दिवसेंदिवस कमी होत चालली आहे. तर दुसरीकडे शिंदे गट हा मजबूत होत चालला आहे.

Non Stop LIVE Update
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.
'मुंडे 12 वर्ष वनवासात, बऱ्याच गोष्टी इच्छेविरुद्ध...',अंधारेंचा टोला
'मुंडे 12 वर्ष वनवासात, बऱ्याच गोष्टी इच्छेविरुद्ध...',अंधारेंचा टोला.
अजितदादांची शरद पवारांकडून पुन्हा भरसभेत नक्कल अन्..., बघा व्हिडीओ
अजितदादांची शरद पवारांकडून पुन्हा भरसभेत नक्कल अन्..., बघा व्हिडीओ.
रामटेकमध्ये वाद पेटला; 'सुनील केदार मारूतीच्या बेंबीतील विंचू अन्..'
रामटेकमध्ये वाद पेटला; 'सुनील केदार मारूतीच्या बेंबीतील विंचू अन्..'.
2014 नंतर मला त्या बाबत कोणी विचारले नाही...राज ठाकरे यांनी सांगितले..
2014 नंतर मला त्या बाबत कोणी विचारले नाही...राज ठाकरे यांनी सांगितले...
मुख्यमंत्रिपदावरून विनोद तावडेंचं वक्तव्य, दिल्लीत कोणता चेहरा फिक्स?
मुख्यमंत्रिपदावरून विनोद तावडेंचं वक्तव्य, दिल्लीत कोणता चेहरा फिक्स?.
अमित ठाकरेंविरोधात सरवणकर भिडल्या, देशपांडेंवरही निशाणा, 'लाथ घालून..'
अमित ठाकरेंविरोधात सरवणकर भिडल्या, देशपांडेंवरही निशाणा, 'लाथ घालून..'.
बटेंगे तो कटेंगेच्या वक्तव्यावरून पंकजा मुंडेंचा यू-टर्न? म्हणाल्या...
बटेंगे तो कटेंगेच्या वक्तव्यावरून पंकजा मुंडेंचा यू-टर्न? म्हणाल्या....
'पंकजाताईंनी मोठ मन केल म्हणून मी...', सभेतून धनंजय मुंडे काय म्हणाले?
'पंकजाताईंनी मोठ मन केल म्हणून मी...', सभेतून धनंजय मुंडे काय म्हणाले?.