Uddhav Thackeray: उद्धव ठाकरेंचा ‘शरद पवार मोमेंट’, वर्षा ते मातोश्री, मुख्यमंत्र्यांची ती 25 मिनिटं ज्यात शिंदे आपोआप ‘व्हिलन’ झाले !

मुख्यमंत्र्यांवर या संपूर्ण प्रवासात शिवसैनिक त्यांच्यावर पुष्पवर्षाव करत होते. तिकडे हॉटेलमध्ये बसून हे पाहणाऱ्या एकनाथ शिंदेंना या अवकाळीतील गारा वाटत असतील. मात्र या पंचवीस मिनिटातच मुख्यमंत्र्यांनी शिवसैनिकांची मनं कशी जिकली, त्यांच्या काळजाला कसा हात घातला हे दिसून आलं.

Uddhav Thackeray: उद्धव ठाकरेंचा 'शरद पवार मोमेंट', वर्षा ते मातोश्री, मुख्यमंत्र्यांची ती 25 मिनिटं ज्यात शिंदे आपोआप 'व्हिलन' झाले !
उद्धव ठाकरेंचा 'शरद पवार मोमेंट', वर्षा ते मातोश्री, मुख्यमंत्र्यांची ती 25 मिनिटं ज्यात शिंदे आपोआप 'व्हिलन' झाले !Image Credit source: tv9
Follow us
| Updated on: Jun 23, 2022 | 12:28 AM

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून राज्याच्या राजकारणात पावसाळ्यात समुद्रात उठाव्या तशा मोठ्या लाटा उठल्या आहेत. राज्याचं राजकारण सध्या या किनाऱ्यावरून त्या किनाऱ्याला धडकताना पाहायला मिळत आहे. एकनाथ शिंदे यांच्या (Eknath Shinde) बंडाने शिवसेनेचं सरकार अडचणीत आणलं आहे. अशातच सायंकाळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Cm Uddhav Thackeray) यांनी आपल्या फेसबुक लाईव्हद्वारे (Cm uddhav Thackeray Facebook Live) शिवसैनिकांना भावनिक साद घातली. तसेच आपण आज वर्षा हा शासकीय बंगला सोडून आपल्या मातोश्री या बंगल्यावर मुक्कामाला जात असल्याचे जाहीर केले. त्यानंतर सर्व साहित्य घेऊन मुख्यमंत्री वर्षा बंगल्यावरून मातोश्री बंगल्याकडे रवाना झाले. मात्र मुख्यमंत्र्यांवर या संपूर्ण प्रवासात शिवसैनिक त्यांच्यावर पुष्पवर्षाव करत होते. तिकडे हॉटेलमध्ये बसून हे पाहणाऱ्या एकनाथ शिंदेंना या अवकाळीतील गारा वाटत असतील. मात्र या पंचवीस मिनिटातच मुख्यमंत्र्यांनी शिवसैनिकांची मनं कशी जिकली, त्यांच्या काळजाला कसा हात घातला हे दिसून आलं.

मुख्यमंत्री बाहेर पडताच फुलांचा वर्षाव

अनेकांना पावसात भाषण करणारे पवार आठवले

मुख्यमंत्र्यांचा हा प्रवास बघून अनेकांना शरद पवारांचं ते पावसातलं साताऱ्यातलं भाषण आलं. शरद पवारांच्या या भाषणाआधी राष्ट्रवादीला मोठं खिंडार पडलं होतं. अनेक दिग्गज नेत्यांनी भाजपच कमळ हाती घेतलं होतं. मात्र या पावसातल्या भाषणाने राज्यातल्या राजकारणाची समीकरणच बदलून टाकली. मुख्यमंत्र्यांचा आजचा वर्षा ते मातोश्री प्रवासही अनेकांना असाच काहीसा भासत होता.

शिवसैनिकांसाठी अत्यंत भावूक क्षण

पवारांच्या त्या भाषणाने राजकारण बदलून टाकलं

शरद पवारांच्या पावसातल्या भाषणाआधी राष्ट्रवादी संपली आहे. राष्ट्रवादी लढायला कोणी उतलेच नाही, अशी टीका होत होती. सध्या शिवसेनेवरही अशात प्रकारची टीका होत आहे. मात्र मुख्यमंत्र्यांची ही भावनिक साद पुन्हा राज्याचं राजकारण बदलू शकते हा विश्वास शिवसैनिकांमध्ये निर्माण करणारा हा प्रवास होता.

गाडीवरही फुलांचा वर्षाव

हजारो शिवसैनिक स्वागतासाठी

मुख्यमंत्र्यांच्या या प्रवासात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि त्यांचे कुटुंबियच नव्हते, तर या प्रवासात त्यांच्यासोबत अनेक हजारो निष्ठावंत शिवसैनिक होते. या शिवसैनिकांसाठी हा क्षण गहिवरून टाकणारा होता. ज्यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे मातोश्री परिसरात दाखल झाले. त्यावेळी हजारो शिवसैनिकांनी मुख्यमंत्र्यांचं जंगी स्वागत केलं. मंत्री आदित्य ठाकरे यांनी यावेळी गाडीबाहेर येत ठाकरे शैलीत सर्वांना पुन्हा एकदा अभिवादन केलं.

 वरळी सी-लिंकजवळ स्वागत

संपूर्ण प्रवासात शिवसैनिकांची घोषणाबाजी

या प्रवासात शिवसैनिक हे फुलांच्या वर्षावासोबत जोरदार घोषणाबाजीही करत होते. या घोषणा जरुर तिकडे हॉटेलात बसलेल्या एकनाथ शिंदे यांच्या काळजाला रानावनातले काटे बनून टोचत असतील.

आदित्य ठाकरे यांच्याकडून सर्वांना अभिवादन

मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.
मंत्रिमंडळात 39 पैकी 20 नव्या चेहऱ्यांना संधी, बघा कोणाची लागली वर्णी?
मंत्रिमंडळात 39 पैकी 20 नव्या चेहऱ्यांना संधी, बघा कोणाची लागली वर्णी?.
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन.
महायुतीचा अखेर मंत्रिमंडळ विस्तार, कोणत्या जिल्ह्यात किती मंत्री?
महायुतीचा अखेर मंत्रिमंडळ विस्तार, कोणत्या जिल्ह्यात किती मंत्री?.
अजित दादांनी आपल्याच मंत्र्यांचे टोचले कान, '... अन्यथा वेगळा निर्णय'
अजित दादांनी आपल्याच मंत्र्यांचे टोचले कान, '... अन्यथा वेगळा निर्णय'.
प्रचंड बहुमतानंतर बहुप्रतिक्षेत मंत्रिमंडळाचा विस्तार, कोणाची वर्णी?
प्रचंड बहुमतानंतर बहुप्रतिक्षेत मंत्रिमंडळाचा विस्तार, कोणाची वर्णी?.
33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ
33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ.